अ भा म भा प समूह2
आयोजित
उपक्रम
विषय ..भरारी पतंगासारखी
पाहूनिया पतंगास
मनी मिळते उभारी
आता होता भूमीवर
घेतली की उंच भरारी
जातो वर वर नभात
येता जरी अडचणी
मात करीतो त्यांना
शोभे डौलात गगनी
जीवन असते असेच
खेळ उन पावसाचा
न होता कधी हतबळ
यत्न हवा नित्य नेमाचा
मनी हवी प्रबळ ईच्छा
अपेक्षा हवी यशाची
तीच देते मनाला उभारी
पतंगासम उंच जाण्याची
चढ उतार जीवनी
येणार हे तर खचित
करा मनापासून यत्न
भरारी घेणे हे उचित
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा