धाव दयाघना
मरणाचे अंक । विचलित मन ।
भयभीत जन । सर्वत्र ची ।। धृपद
उजाड नगरे । अवकळा आली ।
झळाळी उडाली । नगरांची ।।
दिन निराशेचे । आली अवदसा ।
दिसो कवडसा । आशेचा तो ।।
मरणाचे अंक विचलत मन
काय मांडियला । विनाशाचा खेळ ।
कठिण ही वेळ । आणियली ।।
दुःखाची ही निशा । संपवावी आता ।
चरणी हा माथा । ठेवीतसे ।।
मरणाचे अंक विचलत मन 2
संयम राखण्या । जनांना दे बळ ।
सहण्यास झळ । तूची देवा ।।
क्षणोक्षणी घाव । बिथरले गाव ।
मदतीस धाव । दयाघना ।।
मरणाचे अंक 3
वैशाली वर्तक
अहमदाबाद
17/4/21
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा