गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

चित्र कविता

सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित
उपक्रम क्रमांक 485
विषय ....चित्र काव्य

दोन गोड छकुल्यांना
सोडण्या शाळेला वेळेवर
पहा हसतमुखाने पिता
स्वार झाला सायकलवर.

शाळेचा गणवेष टापटीप
केली वेणी फणी आईने 
मागे वळूनी निरोप देता
घेतले दप्तर पाठीला ताईंने.

लेकी शिकूनी सवरुनी
तयार व्हाव्यात  साक्षर
मनी दृढ आशा आईची
शोभतील उच्च पदावर

 साधी राहणी  कुटुंबाची
 उच्च भावना विचारात
 सुसंस्कृत करूनी मुलींना
 भरारी घेण्या जीवनात .

हिरवळ आहे दाटलेली
केळीचे लांब लांब पान
झुकलेली डोक्यावर
पडवीत शोभती छान.

सुखी समाधानी भाव
दिसताती मुखावरी
होवो स्वप्न पूर्ती त्यांची
हेच शब्द येती अधरी.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...