शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

अष्टाक्षरी. सावळ बाधा..... राधा कृष्ण


 शब्दरजनी साहित्य  समूह

आयोजित  भव्य राज्यस्तरिय

झटपट काव्य उपक्रम  लेखन

विषय -- सावळ बाधा


       *राधा बावरी*

जळी स्थळी पाही राधा

कृष्ण हाची एकमात्र

दुजा कोणी न तिजला

दिसे श्यामच सर्वत्र 


ध्यानी मनी तो सावळा

मनी देवकी नंदन

हरी नाम सदा मुखी

जरी करिता मंथन


अविरत करी त्याचे

सदा मनीचे चिंतन

कृष्ण कृष्णची शब्द ते

सदा बोलती कंकण


सावळ बाधा राधेला

होई राधिका बावरी

कृष्णावरी तो भाळिली

मुरलीचा तो मुरारी



नाद मुरलीचा ऐकता

राधा हरपते भान

गोप गोपिका सवे

हरी कडे तिचे ध्यान

वैशाली वर्तक 

अहमदाबाद







सिद्ध  साहित्यिक  समूह 
आयोजित 
उपक्रम  क्रमांक ४७१
अष्टाक्षरी काव्या रचना
 
     *राधा बावरी*

जळी स्थळी पाही  तुज
कृष्णा  तुला एकमात्र
दुजा कोणी न मजला
दिसे श्यामच सर्वत्र 

ध्यानी मनी तू सावळा
मनी देवकी नंदन
हरी नाम सदा मुखी
जरी करिते मंथन

अविरत करी  तुझे
सदा मनात चिंतन
कृष्ण कृष्णची शब्द ते
माझे  बोलती कंकण

बाधा  झाली  राधिकेला
झाले मी आता बावरी
 ओढ लागली भेटीची
 ऐक रे कृष्ण  मुरारी

नाद मुरलीचा ऐकता   
 हरपते माझे भान        
गोप गोपिका सवे
हरीकडे  माझे ध्यान

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

ओंजळ

 अ भा म सा प ठाणे जिल्हा 2

विषय -ओंजळ



जोडुनिया दोन कर

होते ओंजळ हाताची

देण्या दान गरजुंना

भर भरूनी मानाची


बळ हवे मनगटी

नको दुजांची ओंजळ

कष्ट करता जीवनी

आयुष्यात  येते बळ


आई घालते तांदूळ

दोन करांना जोडून 

ओटी भरते मुलीची

देते आशीष भरून


रिक्त कधीच नसावी

देवा जीवनी ओंजळ

होण्या संतुष्ट  याचक

द्यावे दातृत्वाचे बळ


आपुल्याच ओंजळीत

भरा सुमने गंधित

अर्पू देवा  गणेशास

मन होई आनंदित


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

शाळा सुरु झाल्या

सिध्द साहित्यिक  समूह
विषय - शाळा सुरु झाल्या

     आतुरता शाळेची

कधी घेईन दर्शन
माझ्या शारदा मंदीराचे
असे झाले होते मनास 
कधी येतील दिन भाग्याचे    1

कधी येईल तो दिन
 टाकीन पाय वर्गात
जीवास लागलेली काहूर
उद्या आता शमेल मनात  2

  केली रात्रीच   तयारी
 नको होण्यास उशीर
गणवेश ठेविला उशाशी
मन घालण्यास अधीर  3

उद्या  भेटीन मैत्रीणींना
 वाटे मनास  आनंद भारी
का होत नाही    सकाळ
गुरुजींशी भेट न्यारी           4

असता टाळेबंदी शिपाई
सदा  खेदे विचारी मनाला
प्रेमाने कुरवाळीत घंटेला
उद्या  ऐकवीन घंटा नादाला


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

मनातले बोला जरा. //गैरसमज. \व्यक्त अव्यक्त


माझी  लेखणी --मी मराठी काव्य
विषय -- मनातले बोला जरा

 विचारांचा कोंडमारा
 करु नव्हे माणसाने
उगा गैर -समजाला
स्थान मिळते अशाने        1

मनातील विचारांना
व्यक्त करुन सांगावे
पारदर्शकता हवी
मत  स्पष्टच मांडावे          2

कधी केव्हा उपयोगी 
 मते होतील  जनांना
 मनातील बोला जरा
वाट द्यावी विचारांना         3  

कोंडमारा करण्याची
नाही कधीच गरज
मनातील बोला जरा
प्रश्न सुटती सहज               4

स्पष्ट व्यक्तता हवीच
  मनी कुढणे अयोग्य 
  नको गप्पच रहाणे
आरोग्यास नसे योग्य        5




शब्द येतात धावत
मदतीसाठी  मनाला 
व्यक्त करी भाव मनीचे 
वाटे हलके जीवाला


न बोलताची व्यथा 
राहणार दडून मनी
कसे कळणार जनांना
काय लपलय अंतर्मनी





वैशाली वर्तक 
अहमदाबाद









*स्पर्धेसाठी*
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा लातूर जिल्हा 
आयोजित 
दि १९\४\२३
विषय.व्यक्त अव्यक्त

विचारांचा कोंडमारा
 करु नव्हे माणसाने
उगा गैर -समजाला
स्थान मिळते अशाने .       

मनातील विचारांना
व्यक्त करुन सांगावे 
पारदर्शकता हवी
मत  स्पष्टची मांडावे          

कधी ,केव्हा ,उपयोगी 
 मते होतील  जनांना,
अव्यक्त व्यक्ती बोलता
वाट मिळे विचारांना.         

स्पष्ट व्यक्तता हवीच
  मनी कुढणे अयोग्य 
  नको गप्पच रहाणे
आरोग्यास नसे योग्य        

(स्वरचित )
वैशाली वर्तक 
अहमदाबाद
८१४१४२७४३०

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

श्रावण मास आढावा काव्य

अखंडिकल्याणकारीकाव्यसमुह 2
*स्पर्धेसाठी*
 आयोजित 
फेरी - 43
विषय -  श्रावण  मास  आढावा काव्य.

       *सण वार श्रावणात*

येता श्रावण महिना
 येई उधाण उत्साहाला
 असे सणांचा  सोहळा
सीमा  न उरे आनंदाला

वसुधा सख्याच्या  येण्याने
 दिसे हिरवाईने शृंगारलेली
शालु हिरवा नेसून  कशी 
नटून थटून बसलेली

होते श्रावण सुरुवात 
दिव्याच्या आवसेने
 दीप पूजन करती नारी
भाव कृतार्थ जागवणे

सण  पहिला  नागपंचमीचा
सारे पुजताती  नागाला
 नऊ नाग देवतांना
स्मरती त्या क्षेत्रपालाला

सण  येतो मंगळा गौरीचा 
नव वधू जमूनी पूजतात
सोळा पत्री फूले वाहून 
पतीराजा साठी करतात

रक्षा बंधन असे सण
प्रतिक प्रेमाच्या बंधनाचे
उदंड औक्षवंत होण्या भाऊ
बहिण भावाच्या  रेशीम धाग्याचे

अष्टमीला कृष्ण जन्म 
 दही हंडी चढे  मजल्याने
गोपाल कृष्ण नावे गजर
 होई शेवट गोपाल काल्याने


याच  महिन्यात येतो 
सण तो सर्जाचा बैलपोळा
गावात फिरवून बैलाला
दृष्ट काढण्या होती गोळा


अशी सणांची रेलचेल
आसे आवडीचा श्रावण
होती आप्त जनांच्या भेटी
असा मास मन भावन


वैशाली वर्तक
अहमदाबाद











बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

पंचाक्षरी -- निसर्ग चक्र

 माझी लेखणी सामाजिक  काव्य

उपक्रम 92

पंचाक्षरी

विषय - निसर्ग चक्र



ऋतु चक्रात

निसर्ग  देव

आहे किमया

अद्भुत  ठेव            1



बदले ऋतू 

किती सहज

आठवणीची   

नाही गरज             2


निसर्ग  चक्र

कोण  चालवी

कधी थांबावे

कोण ठरवी           3



येणार वर्षा

ग्रीष्मा नंतर

क्रमा क्रमाने

नित्य अंतर            4


आहे किमया 

देवाची सारी

*निसर्ग  चक्र* 

आहेची भारी            5



अवनी सजे 

येता वसंत 

बहरण्यात

नसे उसंत           6


आहे खरी ही

मजा आगळी

निसर्ग  चक्र  

दावी वेगळी           7


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

अष्टाक्षरी क्षमा.....आता क्षमा करु त्यांना

सिध्द  साहित्यिक  समूह
आयोजित  उपक्रम
अष्टाक्षरी
विषय - आता क्षमा करु त्यांना
        

केले संस्कार प्रेमाने
बालपणी आवर्जूनी
नको अती राग राग
 चूक घ्यावी  समजूनी          

चुक ही होत असते
अढी नसावी  मनात
मन हवे सदा मोठे
क्षमा करण्या क्षणात          


राहू आनंदी जीवनी
जन्म मिळाला मानव
लावू तयास सार्थकी
नाम घेऊया राघव         


 श्लोक मनाचे दासांचे
देती सहजची  बोध
सुखी जगण्या जीवनी
घेउ तयाचाच शोध              

भुतकाळ विसरून
डाव नवीन मांडुया
कोरी  करु मन-पाटी 
मोठ्या मनाने जगुया         

पराक्रमा संगे क्षमा
विद्या शोभे विनयाने
क्षमाशील होताचिया
रुप  उजळे गुणाने               

 वाढे प्रेम मनातून
माफ करिता चूकीला
आता क्षमा करु त्यांना
विसरुन त्या खेळीला          

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...