सिध्द साहित्यिक समूह
विषय - शाळा सुरु झाल्या
आतुरता शाळेची
कधी घेईन दर्शन
माझ्या शारदा मंदीराचे
असे झाले होते मनास
कधी येतील दिन भाग्याचे 1
कधी येईल तो दिन
टाकीन पाय वर्गात
जीवास लागलेली काहूर
उद्या आता शमेल मनात 2
केली रात्रीच तयारी
नको होण्यास उशीर
गणवेश ठेविला उशाशी
मन घालण्यास अधीर 3
उद्या भेटीन मैत्रीणींना
वाटे मनास आनंद भारी
का होत नाही सकाळ
गुरुजींशी भेट न्यारी 4
असता टाळेबंदी शिपाई
सदा खेदे विचारी मनाला
प्रेमाने कुरवाळीत घंटेला
उद्या ऐकवीन घंटा नादाला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा