अखंडिकल्याणकारीकाव्यसमुह 2
*स्पर्धेसाठी*
आयोजित
फेरी - 43
विषय - श्रावण मास आढावा काव्य.
*सण वार श्रावणात*
येता श्रावण महिना
येई उधाण उत्साहाला
असे सणांचा सोहळा
सीमा न उरे आनंदाला
वसुधा सख्याच्या येण्याने
दिसे हिरवाईने शृंगारलेली
शालु हिरवा नेसून कशी
नटून थटून बसलेली
होते श्रावण सुरुवात
दिव्याच्या आवसेने
दीप पूजन करती नारी
भाव कृतार्थ जागवणे
सण पहिला नागपंचमीचा
सारे पुजताती नागाला
नऊ नाग देवतांना
स्मरती त्या क्षेत्रपालाला
सण येतो मंगळा गौरीचा
नव वधू जमूनी पूजतात
सोळा पत्री फूले वाहून
पतीराजा साठी करतात
रक्षा बंधन असे सण
प्रतिक प्रेमाच्या बंधनाचे
उदंड औक्षवंत होण्या भाऊ
बहिण भावाच्या रेशीम धाग्याचे
अष्टमीला कृष्ण जन्म
दही हंडी चढे मजल्याने
गोपाल कृष्ण नावे गजर
होई शेवट गोपाल काल्याने
याच महिन्यात येतो
सण तो सर्जाचा बैलपोळा
गावात फिरवून बैलाला
दृष्ट काढण्या होती गोळा
अशी सणांची रेलचेल
आसे आवडीचा श्रावण
होती आप्त जनांच्या भेटी
असा मास मन भावन
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा