सिध्द साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
अष्टाक्षरी
विषय - आता क्षमा करु त्यांना
केले संस्कार प्रेमाने
बालपणी आवर्जूनी
नको अती राग राग
चूक घ्यावी समजूनी
चुक ही होत असते
अढी नसावी मनात
मन हवे सदा मोठे
क्षमा करण्या क्षणात
राहू आनंदी जीवनी
जन्म मिळाला मानव
लावू तयास सार्थकी
नाम घेऊया राघव
श्लोक मनाचे दासांचे
देती सहजची बोध
सुखी जगण्या जीवनी
घेउ तयाचाच शोध
भुतकाळ विसरून
डाव नवीन मांडुया
कोरी करु मन-पाटी
मोठ्या मनाने जगुया
पराक्रमा संगे क्षमा
विद्या शोभे विनयाने
क्षमाशील होताचिया
रुप उजळे गुणाने
वाढे प्रेम मनातून
माफ करिता चूकीला
आता क्षमा करु त्यांना
विसरुन त्या खेळीला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा