शुक्रवार, ११ जून, २०२१

अष्टाक्षरी मायबाप ..माझे दैवत

माझी  लेखणी अष्टाक्षरी मंच
विषया - जन्मदाता
शीर्षक - *माझे दैवत*

मायबाप देवा सम
किती वर्णावी महती
खूप कष्ट साहुनिया
केले महान जगती

सदा चिंता लेकरांची
मनी एकची तो ध्यास 
होवो मुले यशवंत
हीच असे मनी आस

खत पाणी संस्काराचे
देऊनिया केले मोठे
घडविले भवितव्य 
कोठे न पाडण्या खोटे

सारुनिया हौस मौज
सदा घडविण्या दक्ष
पुरविले हट्ट  लाड
गुणी बाळाकडे  लक्ष

किती  ऋण मजवरी
कधी न व्हावा विसर
फेडण्यास त्यांचे ऋण
घडो सेवा निरंतर

नको करु कोणा देवा
जगताती निराधार
नसे मामबाप त्यांचा
तूची आसशी आधार

जया संगे मायबाप 
तेची खरे भाग्यवान
गेल्या जन्माची पुण्याई 
होवो सारे पुण्यवान

वैशाली वर्तक

रविवार, ६ जून, २०२१

नशा तुझ्या प्रेमाची

यारिया साहित्य  कला समूह
विषय - नशा तुझ्या  प्रेमाची

नशा तुझ्या  प्रेमाची
*निसर्गा*  वसे मनात
होताची सकाळ मी
येते तुझ्या  सानिध्यात

किती आनंद मिळतो
नभी पाहूनी आदित्य
आनंदाने पुलकित
होते माझे मन नित्य

हळुवार पसरे पसारा
रवी सोनसळी किरणांचा
होई लाजत  प्रभात
क्षण प्रफुल्लित होण्याचा

नशा सृष्टीच्या प्रेमाची
चढे वसंत ऋतु येता
पहा कशी धरा सजली
नशा चढते  प्रेमाची आता

हरएक ऋतु  असे 
आगळाची अवर्णनीय
किती करावे गुणगान
नशा तव प्रेमाची रमणीय

वैशाली वर्तक

शनिवार, ५ जून, २०२१

हिराव्या हिरव्या पाती वरती. पानावरचा बिंदू

काव्यस्पंदन राज्य स्तरीय 02

  काव्या प्रकार --काव्यपूर्ती
विषय - हिरव्या हिरव्या पाती वरती
 शीर्षक--     *पाती वरचा दव बिंदू*
      
हिरव्या हिरव्या पाती वरती 
दव बिंदू पडले नाजूक
मन वेडावले  माझे 
रूप  पाहून त्याचे साजूक

पातीवरचे दव बिंदू  
भासे मज मोती समान
काय करता येईल तयातून
विचार  आले अनेक महान

भासत होता पा-यासम 
 घ्यावा तया नळीत  भरुन
 ताप मापक बनवू ज्ञानदेण्या
शिक्षकी विचार  आला उचंबळून

भक्त मन माझे झाले जागृत 
शोभिवंत दिसेल मम कान्ह्यास
सहज आला मनी विचार 
  लावूया मस्तकीच्या मयूर पिसास

जवळ जाऊनी होते निरखत
शोभेल की मम गळ्याच्या हारात
लाविला अलवार हात तयास
मनीचे विचार  राहिलेची मनात


निसटले की हो पातीवरूनी
निखळावे मोती धाग्यातूनी
गेले विचार  क्षणात विखरुनी
घरंगळले मनाच्या ओंजळीतूनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, ४ जून, २०२१

रोही पंचाक्षरी पर्यावरण


रोही पंचाक्षरी
स्पर्धा क्र 23
विषय -- पर्यावरण

हिरवे रान
हरपे भान
असता वृक्ष 
अवनी  छान           1

थांबवा -हास 
वृक्षाची आस
पर्यावरण
वाढवू खास              2

जिवाणू  सृष्टी 
वृध्दीची दृष्टी 
पर्यावरण 
मिळेल तृष्टी             3

पाणी वाचवा
वृक्ष  वाढवा
वातावरण 
छान बनवा         4

पक्षांचा थवा
निसर्ग  नवा
जीव सृष्टीत
बदल हवा                5

करा प्रगती
हवी जगती
राखू निसर्ग 
सदा भोवती       6

वृक्षा रोपण
चिंता हरण
पर्यावरणे
न प्रदुषण            7


वैशाली वर्तक 
अहमदाबाद











बुधवार, २ जून, २०२१

पावसाची सर

 महाराष्ट्र  साहित्य  सुगंध 

उपक्रमासाठी

विषय - पावसाची सर



कृष्ण  मेघांचे आभाळ

वारा वाहतो जोरात

उडे पाने चोहीकडे 

मेघ गर्जती नभात


मोर नृत्य  मनोहर

पक्षी झेलती थेंबांना

धारा पडता अंगणी

हर्ष  होई बालकांना



सर  पावसाची  येता

मृदगंध   पसरला 

तृप्त जाहली अवनी

मोद भरूनी उरला


 लता वृक्ष  तरारल्या

दारी पागोळ्या पडती

मुले ओंजळ भरुनी

मोदे पाण्यात खेळती


जो तो जाई भारावूनी

मजा  पावसाची  वेगळी

मन होई उल्हासित

चव भज्यांची आगळी.


राहे स्मरणी पाऊस

आठवांना येई पूर

 घडो जरी गतकाळी

  येतो भरुनिया ऊर


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

मंगळवार, १ जून, २०२१

करु सुखाची कल्पना

 करु सुखाची  कल्पना


  मनी सुखाची कल्पना

  असे सर्वांच्या मनात

  येतो सहज विचार 

   सदासाठी विचारात

   

   कल्पनेत  रमण्यात

   मिळे वैचारिक सुख 

   दोन मिनीटे आनंद

   देत करी, दूर दुःख 


    पहा संपले अरिष्ट

  समृद्धीचे वाहे वारे

  सुरु झाल्या भेटी गाठी

  आनंदेल जग सारे


   करु सुखाच्या कल्पना

   देती मनास उभारी

   येता आनंदी विचार 

   मनी लाभे सुख भारी




वैशाली वर्तक


अष्टाक्षरी आहिल्याबाई होळकर


माझी अष्टाक्षरी कविता
उपक्रम
शीर्षक - अहिल्याबाई


शिंदे माणकोंची लेक 
जन्म चौंडी  नगरात
पुण्यश्लोके अहिल्याई
नाव केले घराण्यात


दिले पित्याने शिक्षण
सास-यांनी नेतृत्वात
दया,प्रेम,सेवाभाव
अंतरंगी  हृदयात

खंडेराव  धारातीर्थी
सती न जाता अहिल्या 
राज्य कारभारी चोख
जन्म रयते  वाहिला


सती प्रथा बंद झाली
केला स्त्रीयांचा उद्धार
शिकवण समानता
झाली दुबळ्या आधार....

साधी रहाणी सात्विक
दानधर्म हेच तत्व
सदा जनी रुजविले
कला ज्ञानाचे महत्त्व 

वैशाली वर्तक

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...