काव्यस्पंदन राज्य स्तरीय 02
काव्या प्रकार --काव्यपूर्ती
विषय - हिरव्या हिरव्या पाती वरती
शीर्षक-- *पाती वरचा दव बिंदू*
हिरव्या हिरव्या पाती वरती
दव बिंदू पडले नाजूक
मन वेडावले माझे
रूप पाहून त्याचे साजूक
पातीवरचे दव बिंदू
भासे मज मोती समान
काय करता येईल तयातून
विचार आले अनेक महान
भासत होता पा-यासम
घ्यावा तया नळीत भरुन
ताप मापक बनवू ज्ञानदेण्या
शिक्षकी विचार आला उचंबळून
भक्त मन माझे झाले जागृत
शोभिवंत दिसेल मम कान्ह्यास
सहज आला मनी विचार
लावूया मस्तकीच्या मयूर पिसास
जवळ जाऊनी होते निरखत
शोभेल की मम गळ्याच्या हारात
लाविला अलवार हात तयास
मनीचे विचार राहिलेची मनात
निसटले की हो पातीवरूनी
निखळावे मोती धाग्यातूनी
गेले विचार क्षणात विखरुनी
घरंगळले मनाच्या ओंजळीतूनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा