शुक्रवार, ११ जून, २०२१

अष्टाक्षरी मायबाप ..माझे दैवत

माझी  लेखणी अष्टाक्षरी मंच
विषया - जन्मदाता
शीर्षक - *माझे दैवत*

मायबाप देवा सम
किती वर्णावी महती
खूप कष्ट साहुनिया
केले महान जगती

सदा चिंता लेकरांची
मनी एकची तो ध्यास 
होवो मुले यशवंत
हीच असे मनी आस

खत पाणी संस्काराचे
देऊनिया केले मोठे
घडविले भवितव्य 
कोठे न पाडण्या खोटे

सारुनिया हौस मौज
सदा घडविण्या दक्ष
पुरविले हट्ट  लाड
गुणी बाळाकडे  लक्ष

किती  ऋण मजवरी
कधी न व्हावा विसर
फेडण्यास त्यांचे ऋण
घडो सेवा निरंतर

नको करु कोणा देवा
जगताती निराधार
नसे मामबाप त्यांचा
तूची आसशी आधार

जया संगे मायबाप 
तेची खरे भाग्यवान
गेल्या जन्माची पुण्याई 
होवो सारे पुण्यवान

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...