रोही पंचाक्षरी
स्पर्धा क्र 23
विषय -- पर्यावरण
हिरवे रान
हरपे भान
असता वृक्ष
अवनी छान 1
थांबवा -हास
वृक्षाची आस
पर्यावरण
वाढवू खास 2
जिवाणू सृष्टी
वृध्दीची दृष्टी
पर्यावरण
मिळेल तृष्टी 3
पाणी वाचवा
वृक्ष वाढवा
वातावरण
छान बनवा 4
पक्षांचा थवा
निसर्ग नवा
जीव सृष्टीत
बदल हवा 5
करा प्रगती
हवी जगती
राखू निसर्ग
सदा भोवती 6
वृक्षा रोपण
चिंता हरण
पर्यावरणे
न प्रदुषण 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा