माझी अष्टाक्षरी कविता
उपक्रम
शीर्षक - अहिल्याबाई
शिंदे माणकोंची लेक
जन्म चौंडी नगरात
पुण्यश्लोके अहिल्याई
नाव केले घराण्यात
दिले पित्याने शिक्षण
सास-यांनी नेतृत्वात
दया,प्रेम,सेवाभाव
अंतरंगी हृदयात
खंडेराव धारातीर्थी
सती न जाता अहिल्या
राज्य कारभारी चोख
जन्म रयते वाहिला
सती प्रथा बंद झाली
केला स्त्रीयांचा उद्धार
शिकवण समानता
झाली दुबळ्या आधार....
साधी रहाणी सात्विक
दानधर्म हेच तत्व
सदा जनी रुजविले
कला ज्ञानाचे महत्त्व
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा