गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९
ललित लेख तुझ्या आठवात
बुधवार, ३० ऑक्टोबर, २०१९
सरस्वती स्तवन अभंग शारदादेवी
ईशस्तवन स्पर्धा
सरस्वती स्तवन
तुज करिते नमन
तूच विद्येची दायिनी
तुला आले मी शरण
श्वेत वस्त्र परिधान
शांत सोज्वळ ते रुप
देई मना समाधान
हाती वीणा झंकारते
वसो चित्ती रुप तुझे
सदा मनास लोभते
तुज करिती नमन
मंद मती हरण्यास
करु तुझेच पूजन
किती गाऊ गुण गाथा
ठेवीतसे मी विनयाने
तव चरणी हा माथा
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९
चला आनंदाने साजरी करुया प्रदुषण मुक्त दिवाळी
स्पर्धे साठी --चला आनंदाने साजरी करुया प्रदुषण मुक्त दिवाळी. खर आहे ..आता तोच क्षण आलाय ..जर आपले जीवन आपल्याला सुरक्षित करायचे असेल तर ... खरच ,चला आनंदाने साजरी करुया प्रदुषण मुक्त दिवाळी. हे फटाके फोडण्याने हवेत पसरणारे प्रदुषण बंद करुया. पूर्वी जन संख्या कमी होती. व फटाके उडवण्याचे प्रमाण कमी होते. आजकाल दसरा संपताच ..जशी दिवाळीची चाहूल लागताच फटाक्यांची दुकाने सजतात. काही नाही तर लहान मोठे फटाके उडविण्यास सुरुवात होते. आधीच हवा प्रदुषण युक्त आहेच ... फॕक्टरींचे प्रदुषण..वहाने इतकी चालतात की वहानांचे प्रदुषण असतेच त्यात फटाक्यांनी प्रदुषण वाढते. आजकाल किती पैसे फटाक्यात टाकायचे याला काही बंधनच नाही .बाजारात पण 500..1000 फटाक्यांची माळ मिळते .एकाने लावली की मी कसा कमी ....दुसरा लावतो. तसेच रात्रभर फटाके वाजविण्यात येतात. पण मग धुराच्या लोंढ्याने सर्व वातावरण धुराचे होते. जे हृदयास योग्य नाही, एवढेच काय आवाजाचा त्रास होतो. मोठे बाॕम लावून आवाजाचे प्रदुषण होते. कानठण्या बसतील असे आवाज .लहान बालकांना तर त्रास होतोच .तसेच वृध्दांना पण होतो. रस्त्यावर ट्राफीकला अडचण येते. पुढचा रस्ता दिसण्यात त्रास होतो. तसेच इतके धुराचे अच्छादन होते की खिडक्या पण उघडता येत नाही .हल्ली पूर्वी सारखी मोकळी घरे पण नाहीत ..सोसायटी त जागा नाही ..छोटे काॕमन plot त्यात दारु खाना उडवून सर्वत्र धुर होतो. त्यामुळे शोभेची दारु उडवावी .दिपोत्सव हा दीप लावून साजरा करायचा. आवाजाने आनंद मानण्यापेक्षा शोभेच्या फटाक्यांनी मजा लुटावी. स्वच्छ तेच्या अभियाना बरोबर प्रदुषण दूर करण्याचे पण अभियान केले पाहिजे, चला त्या प्रमाणे फटाक्या शिवाय दिवाळी साजरी करुया पर्यावरण जतन करु व त्याच बरोबर आरोग्य जताना साठी आनंददायी दिवाळी साजरी करु. वैशाली वर्तक
सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९
चाराक्षरी सुर्योदय/भाज्या/देददेवता/चित्र काव्य
गगनात सदा मान करी जन कोणी नाही असा पडू
येता झाली तया विना तोचि असे नाही दया पाहुनिया
सुप्रभात. रिते पान गजानन कोणालाही येते रडू
पूर्व दिशा असे जोडी हनुमान न रहाता नियमित
उठा आता जेवणात सदा उभा झालो मीच मन होते
सरे निशा आणी गोडी बलवंत हीची माता प्रफुल्लित
पुष्प फूले निगा राखा योगेश्वर रोज तिला पाणी पाणी
वा-यावरी पाले भाज्या जगताचा न समजे परिस्थिती
पर्ण डुले सदा चाखा तू ईश्वर काही तिला दीन वाणी
असशी तो आवडीची तू शारदा कोणी करी थोडा वेळ
चित्रकार नसेजरी कर कृपा मिळे तेव्हा नको दावू
महान तो सात्त्विक ती तू ज्ञानदा अन्न तरी तुझा खेळ
पसरली सदाभारी तू श्रीराम तान्हुल्यास अती वृष्टी
वसुंधरा गरिबांचा तोचि हारी आई सम नाश करी
उजळली तो कैवारी क्रोध काम दोन घास सारी सृष्टी
जाता थेट चहा साठी दिगंबर नको देवा जोरदार
क्षितीजाला न असता घेऊ नाम काय करु ठप्प केला
घेई भेट भाळी आठी निरंतर सांग सेवा व्यवहार
दरी खोरी गमे ज्याला अंतरात दिनभर येता पाणी
काळोखाची कधी व्याधी नका शोधू नसे शांति सुरु झाली
झाली चोरी नसे त्याला देवळात पळभर आणिबाणी
नदी सदा नका पुसु कोणा दीन दुःखावले
न स्वस्थता भाजी साठी हे मागणे धंदा विना
जीवा कदा नका रुसु प्रतिदिन वैतागले
चाराक्षरी नऊ रंगाची
चाराक्षरी
नव रंगांची नवरात्रीच्या नउ रंगांची
भगवा तो
रंग असे
त्याग भाव
दावीतसे 1
लाल कुंकू
लावितसे
भाळी सदा
शोभतसे 2
पीत वर्णी
ती शेवंती
मंद गंध
उधळती 3
रंग निळा
आभाळाचा
घनःश्याम
पहायाचा 4
श्वेत वर्ण
चित्त शांत
मनोहर
ती निवांत 5
मोरपंखी
मयुराचा
शोभे सदा
पदराचा 6
हिरवाई
गवताची
शोभा न्यारी
वसुधेची 7
वैशाली वर्तक
चाराक्षरी/ गोड पदार्थ /आलंकार/वाद्ये/द्वदगीत
चाराक्षरी
लेखाचे रसग्रहण गोड पदार्थ । अलंकार । वाद्ये । द्वंदगीत
जन्म मृत्यू यश मिळे हवी मला बासरीचे अग बस
जोडण्याचा द्यावे पेढे कर्ण फूले स्वर गोड किती वेळ
काळ असे जास्त नको रोज नवे कशाचीही चालणार
जीवनाचा खाऊ वेडे रुप खुले नाही तोड तुझा खेळ
बालपण किती त-हा छुमछुम तबल्याचे नसे खेळ
रम्य असे हलव्याच्या पैंजणांची जोरदार माझा कधी
कसलीही सदा प्रिय वाटे मोद बोल वाजे तुम्ही येता
चिंता नसे गाजराचा ऐकताची वारंवार सदा मधी
मायबाप खाऊ नका काळी पोत गाणे रंगे जरा बस
देती सुख लाडू फार सौभाग्याची तालावर मज पाशी
सारुनिया शरीरास ग्वाही देते तबल्याच्या थट्टा मस्ती
दूर दुःख होई भार सवाष्णीची बोलावर करु अशी
काळअसे रेलचेल तन्मणीला मंत्र मुग्ध वाट पाही
प्रौढत्वाचा श्रावणात असे मान करी ताना माझी काम
सुख दुःख बालूशाही मराठी ची स्वर येता तुम्हा नाही
झेलण्याचा जेवणात दिसे शान जेव्हा काना काम धाम
सत् कर्म जन्म दिनी गोठ तोडे सतारीची सदा मग्न
खरा देव हवा केक पहाताची एक तान साहित्यात
तीच मोठी नको काही हौस होते हरपते चाराक्षरी
असे ठेव इतरेक नटण्याची देहभान लिहीण्यात
जोडीदार शिरा सदा साज असे टाळ हवी तुम्ही पण
हवा असा आवडीचा कोल्हापूरी भजनाला सदालीन
सुख देई गोड लागे शोभे सदा गोड वाटे वाचनात
सदा कसा प्रसादाचा गळा भारी गायनाला रात्रंदिन
विश्वासाने खीर पुरी अंगठीची मीरेची ती उपक्रम
सदा चाला खावयाची शोभान्यारी एकतारी रोज चाले
असत्याला मस्त झोप भेट देण्या ऐकताच ध्यानी तुझ्या
आळा घाला काढायची सदा प्यारी चित्त हारी कधी आले
तडजोड पेढे हवे बाजु बंद परब ची मजा येते
संसाराला भजनाला दंडावर ढोलकी ती लिखाणात
बहरण्या देवळात शोभतसे माना सारे जशी तुम्हा
वसंताला प्रसादाला साडी वर डोलवती वाचनात
जीवनाचे जिलबीच्या भाळी कुंकू शुभ कार्य मनातला
हेची सार संगतीला शोभतसे पाही वाट राग सोड
ध्यानी ठेवा मठा हवा तया विण सनईने तुझी छबी
हा विचार पंगतीला शोभा नसे सुरवात दिसे गोड
पेटीवर हळु बोला
घेता तान ऐकतील
. हरपते नातवंडे
सदा भान हसतील
.....वैशाली वर्तक 23/8/2019
Sent via iBall Slide
मन अष्टाक्षरी..मनोवृत्ती खंबीरमन मन माझे फुलपाखरु/ मन हळवे / हे मना \मन
राज्य स्तरीय काव्य लेखन स्पर्धा
१)विषय - मन
तरी मन दावी तयाचे महत्त्व
जन म्हणती ते वसे हृदयात
कर्मातूनी दिसे त्याचे अस्तित्व .
तना करवी, काम होई क्षणात
, येता विचार मन धावे सैरावैरा
नसे कोणी इतके, गतीशील जगात.
पाखरु असे मन सदा चंचल
फिरुन येती जरी बसता घरी
भिरभिरे फुला वरुनी त्या फूली
तसेच येई फिरुनी क्षणात जगभरी.
न जडावे तयास मनो-विकार
काम क्रोध मोह माया लोभ पासूनी
दूर रहाण्या, करावा सद् विचार
मिळते तयातच समाधान
सर्व ईच्छा वसती मनातच
तेचि सर्व सिध्दीचे साधन.
चित्र काव्य करू हितगुज
शब्द रजनी साहित्य समूह पुणे चित्र काव्य अष्टाक्षरी शीर्षक ... करु हितगुज हात हातात घेतला जाऊ समुद्र किनारी मौज लाटांची पहात बसु बाळुत...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
समजून घे तू सुखी जीवन जगण्या स्वभावही हवी तडजोड समजूनी घेता एकमेका जीवन आंब्याची फोड नको आपलाच हेका ऐका दुसऱ्यांचे पण ठरत...

