स्पर्धे साठी --चला आनंदाने साजरी करुया प्रदुषण मुक्त दिवाळी. खर आहे ..आता तोच क्षण आलाय ..जर आपले जीवन आपल्याला सुरक्षित करायचे असेल तर ... खरच ,चला आनंदाने साजरी करुया प्रदुषण मुक्त दिवाळी. हे फटाके फोडण्याने हवेत पसरणारे प्रदुषण बंद करुया. पूर्वी जन संख्या कमी होती. व फटाके उडवण्याचे प्रमाण कमी होते. आजकाल दसरा संपताच ..जशी दिवाळीची चाहूल लागताच फटाक्यांची दुकाने सजतात. काही नाही तर लहान मोठे फटाके उडविण्यास सुरुवात होते. आधीच हवा प्रदुषण युक्त आहेच ... फॕक्टरींचे प्रदुषण..वहाने इतकी चालतात की वहानांचे प्रदुषण असतेच त्यात फटाक्यांनी प्रदुषण वाढते. आजकाल किती पैसे फटाक्यात टाकायचे याला काही बंधनच नाही .बाजारात पण 500..1000 फटाक्यांची माळ मिळते .एकाने लावली की मी कसा कमी ....दुसरा लावतो. तसेच रात्रभर फटाके वाजविण्यात येतात. पण मग धुराच्या लोंढ्याने सर्व वातावरण धुराचे होते. जे हृदयास योग्य नाही, एवढेच काय आवाजाचा त्रास होतो. मोठे बाॕम लावून आवाजाचे प्रदुषण होते. कानठण्या बसतील असे आवाज .लहान बालकांना तर त्रास होतोच .तसेच वृध्दांना पण होतो. रस्त्यावर ट्राफीकला अडचण येते. पुढचा रस्ता दिसण्यात त्रास होतो. तसेच इतके धुराचे अच्छादन होते की खिडक्या पण उघडता येत नाही .हल्ली पूर्वी सारखी मोकळी घरे पण नाहीत ..सोसायटी त जागा नाही ..छोटे काॕमन plot त्यात दारु खाना उडवून सर्वत्र धुर होतो. त्यामुळे शोभेची दारु उडवावी .दिपोत्सव हा दीप लावून साजरा करायचा. आवाजाने आनंद मानण्यापेक्षा शोभेच्या फटाक्यांनी मजा लुटावी. स्वच्छ तेच्या अभियाना बरोबर प्रदुषण दूर करण्याचे पण अभियान केले पाहिजे, चला त्या प्रमाणे फटाक्या शिवाय दिवाळी साजरी करुया पर्यावरण जतन करु व त्याच बरोबर आरोग्य जताना साठी आनंददायी दिवाळी साजरी करु. वैशाली वर्तक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
सरत्या वर्षाने काय दिले
स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित झटपट काव्यलेखन स्पर्धा विषय सरत्या वर्षाने काय दिले विचार करता मनी काय मिळाले गत वर्षात दिले सुख आनं...
-
काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02 काव्य प्रकार -- अष्टाक्षरी 1 विषय -- उंच भरारी आकाशी आहे तुझ्यात कर्तृत्व घेण्या नभात भरारी दाव सामर...
-
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम 348 विषय. नारळ कल्पवृक्ष स्थान फळांत मानाचे असे सदा नारळाला श्री उपपद लावून वदती ...
-
इथं इध बस ग चिऊ दाणा खा पाणी पी अन् बाळाच्या डोक्यावरून भुर्रsssकन उडून जा. असे म्हणत विभावरी बाळाला खेळवत होती. ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा