रविवारीय साहित्य स्पर्धा क्रमांक 29
काव्य प्रकार अभंग
विषय - शारदा देवी
ब्रह्मा विष्णू शिव ।
करिती नमन।
तुझेच पूजन।
देवी माते ।। 1
श्वेत वस्त्र धारी ।
कांती ज्योत्स्नेपरी ।
शोभे वीणा करी ।
तुजनमो ।। 2
जडता मतीची ।
हरण्या स्तवन ।
करी सारे जन ।
देवी तुझे ।। 3
कमळा आसनी ।
वीणा झंकारते ।
मनास लोभते ।
रुप तुझे ।। 4
ज्योर्तीमय मूर्ती ।
गाते गुण गाथा ।
टेकविते माथा ।
तुझेपायी ।। 5
सोज्वळ ते रुप ।
मना समाधान ।
विद्या वरदान ।
देतअसे ।। 6
देवी सरस्वती ।
आले मी शरण ।
करीते वंदन ।
तुजलागी ।।
वैशाली वर्तक
अहमदाबाद
साहित्य कला यात्री महाराष्ट्र राज्य स्तरिय
ईशस्तवन स्पर्धा
सरस्वती स्तवन
ईशस्तवन स्पर्धा
सरस्वती स्तवन
माते देवी सरस्वती
तुज करिते नमन
तूच विद्येची दायिनी
तुला आले मी शरण
तुज करिते नमन
तूच विद्येची दायिनी
तुला आले मी शरण
शुभ्र शोभिवंत माळा
श्वेत वस्त्र परिधान
शांत सोज्वळ ते रुप
देई मना समाधान
श्वेत वस्त्र परिधान
शांत सोज्वळ ते रुप
देई मना समाधान
श्वेत कमळ आसन
हाती वीणा झंकारते
वसो चित्ती रुप तुझे
सदा मनास लोभते
हाती वीणा झंकारते
वसो चित्ती रुप तुझे
सदा मनास लोभते
ब्रह्मा विष्णू महेश ही
तुज करिती नमन
मंद मती हरण्यास
करु तुझेच पूजन
तुज करिती नमन
मंद मती हरण्यास
करु तुझेच पूजन
ज्योतिर्मय तव मूर्ती
किती गाऊ गुण गाथा
ठेवीतसे मी विनयाने
तव चरणी हा माथा
किती गाऊ गुण गाथा
ठेवीतसे मी विनयाने
तव चरणी हा माथा
वैशाली वर्तक 30/10/2019
काव्य निनाद साहित्य मंच पुणे
आयोजित
साहित्यिक नवरात्री उत्सव
काव्य प्रकार नवाक्षरी
विषय. देवी सरस्वती
स्तवन शारदेचे
माते देवी श्री सरस्वती
तुजला करिते नमन
तूची विद्येची ती दायिनी
तुला आलेची मी शरण
शुभ्र कुंद शोभती माळा
श्वेत वस्त्रात परिधान
शांत सोज्वळची ते रुप
देई मनास समाधान
श्वेत कमळाचे आसन
हातात वीणा झंकारते
वसो चित्तात रुप तुझे
सदैव मनास लोभते
ब्रह्मा विष्णू व महेश ही
तुज करिताती नमन
मंद मतीला हरण्यास
करुया तुझेच पूजन
ज्योतिर्मय तुझीच मूर्ती
किती गाऊया गुण गाथा
ठेवीतसे आम्ही विनयाने
तव चरणी सदा माथा
तव मूर्ती सदैव साजरी
पाहूनिया प्रसन्न मन
शांत भाव ते मूखावरी
पावती आनंद दर्शने
तुची असे ज्ञान दायिनी
वदती तुज भगवती
दूर करण्या जड मती
दे सदा जीवनी सुमती
तव गुण गाथा वदती
नित्य नेमे ज्ञान मंदीरी
मिळवती तव आशीष
असती तत्पर अंतरी
तव कृपेचा हातशिरी
राहो आम्हावर सर्वदा
नच भासे मग उणीव
जीवनात कदापि कदा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा