समजून घे तू
सुखी जीवन जगण्या
स्वभावही हवी तडजोड
समजूनी घेता एकमेका
जीवन आंब्याची फोड
नको आपलाच हेका
ऐका दुसऱ्यांचे पण
ठरती मार्गदर्शक मते
राखावे दुजांचे मन.
समजून घे तू थोडे
नसे सदा आपलेच खरे
नीट विचारांती कळे
समजून घेतले झाले बरे
समजून घे क्षणाला
विचार करिता झणी
विचारांनी उमजेल
उगाच हटृ धरीला मनी.
वैशाली वर्तक
सिध्द साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम आठोळी लेखन
विषय... माझिया मना जरा बोलना
नको ठेवू मनी किंतू परंतु
माझिया मना जरा बोलना
तव हृदयीचे दडलेले गुज
अलवार मजला सांग ना
स्थान नुरते गैर -समजाला
नित्य रहा स्पष्ट बोलण्यात
नको विचारांचा कधी कोंडमारा
हीच समजूत ठेव मनात
वैशाली वर्तक
अहमदाबाद
जगाचा पोशिंदा साहित्य मंच
आयोजित उपक्रम सहाक्षरी काव्य लेखन
विषय. समजून घ्यावे
शीर्षक सुखमय जीवन
सुखाने जगण्या
हवी तडजोड
होतसे जीवन
आंब्याची फोड
ऐकता दुजांचे
गवसे कल्पना
देत असे आशा
नव्या संकल्पना
़
घ्यावे समजून
उत्तमच ठरे
नसे आपलेच
सदा साठी खरे.
समजून घेता
कळते क्षणात
उगाच धरिला
हट्टची मनात.
मीपणा सोडून
घे ना समजून
सुसंबद्ध वाद
दोघां च्या कडून
माझे तुझे सोड
व्हावे सहमत
व्हा समजदार
होते एकमत
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430
###############################
!माझी लेखणी साहित्य मंच शहापूर , जिल्हा ठाणे
काव्य रचना
उपक्रमासाठी
विषय - समजून घे ना
*समजूतदारपणा हवा*
एकमेका समजून
घेणे चांगला विचार
होतो सुखाचा संसार
नको कोणा अत्त्याचार
चुक ही होत असते
अढी नसावी मनात
मन हवे सदा मोठे
क्षमा करण्या क्षणात
असे समजून रहाता
वेळ येत नाही कधी
*समजून घे ना* शब्द
बोलणे येते, कधी- मधी
पण होत नाही तसे
शब्द शब्दाला लागतो
खरा मीच दाविण्यात
समजुतीचा प्रश्नच संपतो.
समजूत दार पणा हवाच
कालांतराने येता समज
येत जातो तो स्वभावात
*समजून घे ना* ची नुरते गरज
वैशाली वर्तक
अहमदाबाद
16/12/21


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा