कला, यात्री महाराष्ट्र आयोजित
राज्य स्तरीय काव्य लेखन स्पर्धा
राज्य स्तरीय काव्य लेखन स्पर्धा
स्पर्धे साठी
विषय - मन
विषय - मन
मन कधीच न असे दृश्य
तरी मन दावी तयाचे महत्त्व
जन म्हणती ते वसे हृदयात
कर्मातूनी दिसे त्याचे अस्तित्व .
तरी मन दावी तयाचे महत्त्व
जन म्हणती ते वसे हृदयात
कर्मातूनी दिसे त्याचे अस्तित्व .
मन असे बुध्दी च्या कह्यात
तना करवी, काम होई क्षणात
, येता विचार मन धावे सैरावैरा
नसे कोणी इतके, गतीशील जगात.
तना करवी, काम होई क्षणात
, येता विचार मन धावे सैरावैरा
नसे कोणी इतके, गतीशील जगात.
पाखरु असे मन सदा चंचल
फिरुन येती जरी बसता घरी
भिरभिरे फुला वरुनी त्या फूली
तसेच येई फिरुनी क्षणात जगभरी.
मन ठेवावे सदा निर्मल
न जडावे तयास मनो-विकार
काम क्रोध मोह माया लोभ पासूनी
दूर रहाण्या, करावा सद् विचार
न जडावे तयास मनो-विकार
काम क्रोध मोह माया लोभ पासूनी
दूर रहाण्या, करावा सद् विचार
मन ठेवावे सदा काळ प्रसन्न
मिळते तयातच समाधान
सर्व ईच्छा वसती मनातच
तेचि सर्व सिध्दीचे साधन.
मिळते तयातच समाधान
सर्व ईच्छा वसती मनातच
तेचि सर्व सिध्दीचे साधन.
वैशाली वर्तक.......4/9/2019 (अहमदाबाद )गुजरात
अष्टाक्षरी
माझी अष्टाक्षरी कविता
विषय - मन
मन असते अदृश्य
तरी दाखवी महत्त्व
वसे मन हृदयात
दिसे कर्मात अस्तित्व 1
मन बुध्दीच्या काबुत
गतीशील ते जगात
मन धावे सैरावैरा
तन करवी क्षणात 2
मन चंचल पाखरु
जरी राही सदा घरी
भिरभिरे सर्व स्थळी
घेते धाव जगभरी 3
मन असावे निर्मल
नको मनाचे विकार
दूर राहो षडरीपू
सदा करु सद्विचार 4
मन राखावे प्रसन्न
मिळे सुखाची घागर
तेच सिध्दीचे साधन
मन इच्छेंचे आगर 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भा म सा प समूह 2
विषय - खंबीर मन
*मनोवृत्ती*
योग्य अगदी कथन
असता मन खंबीर
येता प्रसंग कठीण
मन होत नाही गंभीर
बालपणी शिकवण
देतात सदा मायबाप
रहा मनाने सशक्त
होत नाही डोक्यास ताप
रहा विचाराने सकारात्मक
दृढ विश्वास ठेवा प्रयत्नावर
निग्रही मन कधी न विचारी
पाणी तर फिरणार नाही कामावर
राखावी मनोवृत्ती धाडसी
उत्साही मनास मिळे प्रेरणा
येता प्रसंग कठीण तरीही
विचारास मन देई चालना
असे महत्व खंबीर मनाचे
सांगे सदा संतांचीवाणी
मन चंगा तो सब चंगा
गावी जीवनी गोड गाणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सिध्द साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्र ४०९
चित्र आठोळी लेखन
विषय - मन झाले फुलपाखरू
मन झाले फुलपाखरु
भिरभिरे क्षणाक्षणाला
अवखळ अल्लड सदैव
आवरु शकेना मनाला
अनुभवे जाता काळ
मन संतोषाने आनंदले
प्रसन्नता लाभे जीवा
हर्षे मन विसावले
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विषय - मन सुंदर हळवे
*मन सुंदर हळवे**
नसे रुप रंग आकार
मातीच्या गोळ्या सम
नित्य काम करे फार
मात - तात करी माया
मिळे मनास विसावा
तयासंगे रममाणहोता
सहवास नित्यची असावा
जडण घडण संस्काराची
माताची असे शिल्पकार
माया ममता प्रेम भाव
अलवार होतात साकार
देई माता शिकवण
मनी असावा दया भाव
दूर सारूनी द्वेष राग
दाखव प्रेमाचे गाव
वृक्ष लता वेली सुंदर
पशु प्राणी मुक असती
घेता काळजी प्रेमळ मने
निसर्ग फूलतो भवती
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित
विषय ..हे मना
किती रे लिहावे तूजवर
तरी पूरे न होणारं कवन
असशी तू अती अवखळ
आधी करावे लागे स्थिर मन
दासांनी दिली शिकवण
श्लोक लिहूनी तुजवर
सांग आता कसे आवरु
हे मना समजेना क्षणभर
नुसता करीता विचार
नेशी, तू जनास भुतकाळात
क्षणात घरात तर क्षणात
विचारांनी पोहचवी भविष्यात
खरच, हे मना तू स्वच्छंदी
किती रंगविशी स्वप्नं मनी
पण तुझ्या अवखळतेने
आनंद विहरतो क्षणो क्षणी
हे मना तू जात्या निर्मळ
जणु असशी मातीचा गोळा
होता जडणघडण संस्काराची
जन उजविती जीवन सोहळा.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा