चाराक्षरी
नव रंगांची नवरात्रीच्या नउ रंगांची
भगवा तो
रंग असे
त्याग भाव
दावीतसे 1
लाल कुंकू
लावितसे
भाळी सदा
शोभतसे 2
पीत वर्णी
ती शेवंती
मंद गंध
उधळती 3
रंग निळा
आभाळाचा
घनःश्याम
पहायाचा 4
श्वेत वर्ण
चित्त शांत
मनोहर
ती निवांत 5
मोरपंखी
मयुराचा
शोभे सदा
पदराचा 6
हिरवाई
गवताची
शोभा न्यारी
वसुधेची 7
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा