..
दरवर्षी तुझे येण्याचे नक्की असते .पण तू ठरला ...फारच खट्याळ. तू तुझेच चालावितो. तू तुझ्या मर्जीचा मालक .,,असे वागतोस
तुझे नेहमीचे येण्याचे वेळापत्रक तूच आखून दिले आहेस ना ?. मग... का .बरे उगाच वाट पहावयास लावतो.
तू येणार या विचाराने मनात विचारांची दाटी भरते ... जशी आकाशी मेघांची...
रवी राज त्याच्या कामात मशगुल असतो. व सा-या धरेला त्रस्त करण्यात मागे पुढे
पहात नसतो. आधीच रवीराजांनी जन समुदायाला त्रस्थ केलेले असते ...व तू असा बे भरवशाचा. ...किती डोळ्यात तेल घालून वाट पहायची,.. अरे मी च नाही सारी प्रजा ...वाट पहात असते. तुझ्या वाटे कडे वसुंधरा तर डोळे लावून बसली असते .बळीराजा तर सदा नभाकडेच पहाता असतो.
आणि खर सांगू ...गेल्या वर्षी अशीच वाट पहात असता..तू अचानक आला .ऋतु खात्याला ... काहीच कल्पना ... अंदाज न देता. त्यांची केवढी तारांबळ उडली.
सर्वत्र गार वारा ..सोसायट्याचा वारा, वाळलेली पाने धरती वरची फेर धारुन नाचु लागली. काही इतकी हलकी की वा-यावर स्वार होऊन ..वर वर उडत गेली आणि मोहक गिरक्या घेत खाली आली..
पक्षी तर मोद भरे पंख पसरवून एकमेकास साद घालत... समुहाने इकडून तिकडे स्वैर करु लागले. आता पाणी पडेल या आनंदानं ती मस्त निळ्या अंबरी पंख विस्तारुन हवेत तरंगु लागली .मोर त्याच्या आवाजाची साद घालीत ..लांडोर समोर तिला आकर्षित करण्यास ... स्वतः चा डौलदार पिसारा फुलवून डौलाने नाचु लागला. मुले तर ...".आला रे आला "म्हणून भान विसरून घरा बाहेर उघडी बागडी आनंदाने तुझ्या स्वागतास आली .
असे सर्व आनंदमय वातावरण असता ....माझा प्रियाकर पण मनकवडा
तुझ्या स्वागतास आला . तुझे स्वागत आम्ही दोघांनी पण हर्षाने उल्हासाने ..
तुला कवेत घेउन स्वागत करण्यास आतुर . दोन्हीही हात पसरवून तुला आलिंगन देण्यास .... तीच आठव आता पण येत आहे तर त्या आठवणींना पुन्हा चिंब भिजविण्यास
येना व आठवांची बरसात कर ना
.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा