सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

अभंग हरीची विविध रूपे

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

स्पर्धेसाठी अभंग 


अभंग लेखन स्पर्धा क्रमांक ४५

२\११\२५

विषय.  हरीची विविध रूपे 

    हरी पहा



करावे सत्कर्म.| वसे तो कर्मात |

नाही देव्हाऱ्यात | हरी सदा ||


गंध पसरला. | कळी उमलली |

हसत लाजली | हरी कृपे.     ||



हरीची किमया | सदा दिनरात |

शोधा निसर्गात | हरी रूप.   ||


भुकेल्यास देता |. आपुले कवळ. |

असे तो जवळ | तृप्त भावे.   ||


ओळखला नाही | जेवला. सुखात. |

तृप्त माणसात  |.हरी पहा ||. 


मानव देहाने. | कर्म करी सारी. |

करावी ती न्यारी | हरी भेटे. ||


न दिसे सहज |. दुधातले लोणी | 

देही चक्रपाणी. |. सदा साठी. ||


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०२५

वृत्तबध्द. वृत्त अनलज्वाला कविता १विषय पाऊस \२ गझल\. ३कविता आई

अनलज्वाला 8-8-8-=24मात्रा
         विषय  पाऊस 

मेघ दाटले सोसाट्याचा सुटला वारा 
नकोच नुसता तो गडगडाट गगनामधुनी  
या मेघांनो गर्जत बरसत  वाट पाहतो 
शेतकरीगण लावून नयन शेतातूनी

वर्षा धारा सरसर झरल्या तप्त धरेवर
खुशीत येती शेतकरीगण  मग मनोमनी
आनंदाने फुलून येई  मन कृषिकाचे 
दिवस सुगीचे दिसतील अता मला जीवनी

तृप्त जाहली तृषित धरित्री  जलधारांनी
जल  शोषूनी  वसुंधरेचा रंगच  हिरवा       
  सजले डोंगर कडे कपारी राने सारी
सुंदर ऋतु तो  दिसता मोहक वदती बरवा



जलधारेने  केली किमया अवनीवरती 
.चोहीबाजू  अवघा एकची   रंग पसरला 
  भिजली पाने भिजली राने झाली ओली
वरती खाली सर्व दिशांना मोद विहरला.  

काळे काळे जलद धावती  गगनातूनी
 पहा अंबरी मेघ दाटले गर्जना करी
मधेच दावी करिता चमचम  नृत्य दामिनी 
रिमझिम धारा सुरू जाहल्या सरीवर सरी

वैशाली वर्तक
==================================
गझल.....................
गझल
अनलज्वाला  ८-८-८

कष्ट करूनी यश मिळवाया झगडत गेलो
भौतिक सुखात नकळतची मी हरवत गेलो.

मान मिळविला  हजारो गुन्हे  करूनी जगी.  
  लोकांना मी सत्याचे पाठ शिकवत गेलो
                                            
 क्षणभर येता  दिन दु:खाचे  कष्टी जीवा
हास्य किस्से सांगूनी मी हसवत गेलो.

केला प्रयत्न सदा उजळण्या  जीवन सारे.        
कुसंगतीने  व्यसनात  पहा अडकत गेलो.

वृक्ष तोडून  सिमेंट राने किती बांधली
पर्यावरणा जपता धान्ये उगवत गेलो.




वृत्तबध्द कविता उपक्रम १४\४\२६
वृत्त अनलज्वाला 
मात्रा  ८-८-८
आई 

येता जन्मा आई असते  ही प्रथम गुरू. 
गुरू पदाची बोट धरूनी सुरुवात सुरू.   

  घेत आधार  टाकी बाळे.  पहिल पाऊल
सुखी आयुची सदैव लागे जीवा चाहुल   

 निराश होता अपयश येता देत उभारी    
पाठी असते सदैव आई  मने करारी

संस्काराचे  धडे शिकवता मना शिस्तता
भासे आई   खरोखर मनी जशी देवता. 

चुकताच कधी  घेते पदरी ती  बाळाला 
रागाने, प्रेमाने सांगे मग बाल्याला.     

झालो मोठे  पण तिजसाठी लहान असतो
अनुभवलेले  बोल तियेचे  महान वदतो



शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

वृत्तबध्द......वृत्तआनंद . .कविता विषय प्रेम.

*प्रेम* रचना

वृत्त आनंद
गागालगा लगागा
   विषय ...पहिले प्रेम  
लगावली   गागालगा लगागा 


आली सहज समोरच 
अवचित नजरच जाता
आशा मनी उगाचच 
भरली मनात आता.


माझे मला कळेना
शोधू कसा बहाणा
पाहू कधी तुला मी
झालो  तुझा दिवाणा.

सांगू तरी पहातो.   
हे भाव अंतरीचे
  वाटे सहज कळावे  
.  बोल तु जला मनाचे.
         
            
वाटे तुला पहावे
 नयनी तुझ्या ठसावे
हे वेड जीव घेणे
केव्हा तरी वदावे

 सांगेन चार गोष्टी 
घेऊन हात हाती
ये ना समोर आता                    
होशील का ग साथी .               

वैशाली       वर्तक 




आणि *प्रेम* रचना

वृत्त आनंद
गागालगा लगागा
   विषय ...पहिले प्रेम 
लगावली   गागा लगा लगागा 

गागा लगा लगागा 

आली सहज समोरच 
अवचित नजरच जाता
आशा मनी उगाचच 
भरली मनात आता.


माझे मला कळेना
शोधू कसा बहाणा
पाहू कधी तुला मी
झालो  तुझा दिवाणा.

सांगू तरी पहातो.   
हे भाव अंतरीचे
वाटे सहज कळावे  
बोल तुजला मनाचे.
         
            
वाटे तुला पहावे
 नयनी तुझ्या ठसावे
हे वेड जीव घेणे
केव्हा तरी वदावे

 सांगेन चार गोष्टी 
घेऊन हात हाती
ये ना समोर आता                    
होशील का ग साथी .  

 वैशाली वर्तक      
अहमदाबाद                               

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

१५ **पावसाच्या कविता** (१६)षडाक्षरी तृप्त झाली धरा येरे घना येरे घना आज पाऊस थोडा आहे










साहित्य दर्पण कला मंच नागपूर 
आयोजित काव्यलेखन उपक्रम क्रमांक ६१८
८\७\२६
विषय .. अतिवृष्टी
शीर्षक.  थांब ना जरासा
***********************

असूनही आवडता
जलचर ह्या सृष्टी चा
किती रे तू माजविला
हाहाःकार पावसाचा


असा कसा तू पर्जन्या
गरजेला  नसतोस
जरा सबुरीने घे ना
अती वृष्टी  का करतोस


सहवेना तुझा त्रास 
किती अंत पहायाचा
कसे म्हणू तुला त्राता
हाहाःकार पावसाचा


बस कर तुझा खेळ
थांब ना थोडा वेळ
तुझ्या  अशा वागण्याने
कधी होई सुखी मेळ


उभे पीक शिवारात
आहे पहा डौलदार 
नको आता बरसणे
ओल्या दुष्काळाचा भार


गेला संसार वाहूनी
मेहनत गेली वाया     
मूर्ती पण न राहिली
कसे पडू देवा पाया


ऐक विनवणी आता
हेच एकची मागणे
संयमाने वाग जरा
करा सुखाचे जगणे


वैशाली वर्तक 
अहमदाबादै
**************************
धबधबा प्रपात
**************************
आधी रिमझिम जलधारा
पसरला पाचूचा रंग हिरवा
खळ खळ वाहती नद्या नाले
जनांना आवडे ऋतु बरवा

ढोल ताशांच्या गर्जना
धुवादार   बरसात
भासे फाटले आभाळ
वारा वाहे जोशात 

जलाशय तुडुंब भरली सारी
दिसे टेकड्या डोंगर नितळ
 दुग्ध रुपी पडे हा जल प्रपात
 तर कुठे शुभ्र जलाचे ओहळ.


 जल तत्व पंचत्वातील
मुक्त हस्ते वरूणाचे दान
जलचर सृष्टीची गरज
जलप्रपात निसर्ग किमया महान.


 

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

वृत्तबध्द .... वृत उध्दव ( ३). विषय 1)पहाट.(2 देव पाहते उधद+उध्दव.३)ओढ जीवा

मात्रा वृत्त कविता उपक्रम क्रमांक ३
१२\१०\२५
मात्रा 2-8-4=14

वृत्त उध्दव 
विषय... पहाट 

तम निशेचा पहा सरता
खग नभात उडती  सारी   
किलबिलाट भासे सुंदर 
उठ ,प्रातः झाली न्यारी

पूर्व दिशा पहा उजळली
शीत मंद वाहे वारा
सुमनांचा गंध दरवळे
शुभ भासे परिसर  सारा

घर रांगोळीने सजले
स्वर भुपाळीचे कानी
प्रातः वेळी ऐकू  येते.   
सुमधुर स्वरांची गाणी

आशा रुपी कळ्या फुलती
होता रवीचे आगमन
दूर दूर होई   मरगळ
मनाने आनंदती जन

क्षण आनंदाचे भासे
नव आशा येती ध्यानी 
रामाचा गजर अंतरी
 भजन धून येते कानी              

वैशाली वर्तक




उध्दव वृत्तात
 कविता .
   शीर्षक...देव पाहते
मात्रा.  2+8+4. व.2+8+4. उद्धव+उद्धव 

मी व्रते नाहीच केली, ना नवस बोलले तुजला
तू पालक असशी अमुचा, दृढ ऐसी श्रद्धा  मजला

ना तीर्थ क्षेत्रास गेले, ना कधीच केली वारी
तू  विश्व धारका असता, मी सुकर्म करते सारी    

तो नित्य उगवता दिनकर,बघ  दर्शन क्षणात घडते .
मी वंदन तयास  करता,   तव स्वरूप मनात भरते.

कर्मात देव जर वसतो, मी सत्कर्मातच रमते   
मन  परोपकारी  व्हावे,  हा विचार सदैव *स्मरते*

फूल फुलता गंध पसरे सय तुझीच येते देवा
तव निर्मित नभात तारे ,हा तुझ्या कृपेचा ठेवा


वैशाली






ओढ जीवा 

उद्धव वृत्त 
मात्रा २-८-४
ओढजीवा

ती भेट आपुली पहिली   
मन माझे अगतिक पळभर
विचलित मी झाल्या वरती
मी सावरले  मज  क्षणभर

तव स्पर्श तो  प्रथम भेटी
वाटे आश्वासक अचला
जाहला आनंद हृदयी
मम रुधिरात असा रुजला

छंदची लागला आता           
अन कसे आवरू मजला  
तव सहवासाची गोडी 
त्या वेडात जीव  फसला

तव प्रितीचा गंध दरवळ
अंतरी  माझिया  राहे
बघ वसंत फुलला आता
आमोदरव नित्य  वाहे                 


ऐक ना तू अता  सखया
देशील  ना सदा   सोबत
मन तुझ्यात माझे  रमले
मी  मागते  तुझी संगत
               
वैशाली

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

पावसाच्या कविता. 1 . नको तो पाऊस . वृत्त बध्द कविता पाऊस

 विषय - विषय -  जा रे जा पावसा

वर्ल्ड व्हिजन पेपरात२९\९\२५


विषय -  जा रे जा पावसा

        
किती  रे बरसणार पावसा
परतीची झाली ना वेळ
बस कर तुझे पडणे
बंद कर बेभवशाचा खेळ.

बळीराजा  होईल नाखुष
अती वर्षावाने आता
मेहनत जाईल वाया
नको करू कष्टी जाता जाता
  
सुरू झाले नवरात्र 
खेळायचाय गरबा रास 
तुझ्या  पडण्याने पहा
मजा येत नाही खास

वेळवर न येता सदा
पळवितो तोंडचे पाणी
आता जायची वेळ झाली
 जाण्यासाठी गाऊ का गाणी ?

जा रे जा  पावसा  आता
आवर  मेघांचा पसारा
पुढल्या वर्षी भेटू  तेव्हा 
दाखव तुझा रंग न्यारा

झालय सर्वत्र  हिरवे गार
नको अती तुझा वर्षाव
रोग राई पसरण्या आधी
बस्तान  गुंडाळण्याचा कर प्रस्ताव


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


        




        


मनस्पर्शी पुष्प पाकळ्या व मराठी साहित्य परिषद तेलंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धा 
दि 6/7/26
काव्यप्रकार ..अष्टाक्षरी 
विषय... पाऊस 
शीर्षक.. *उशीरा आल्या मृग धारा*
 
काळ्या रंगाच्या मेघांनी
आले भरून  गगन 
मृग धारा बरसता
आनंदले जन मन.    1

तृप्त झाली वसुंधरा
 होता वरुणाची भेट 
वृक्षवल्ली तरारल्या 
 अंतरंगी दिसे थेट      2

मोह कसा आवरु मी
मनी भावतो पाऊस
गंध पसरे मातीचा 
भिजण्याची मनी हौस.   3

किती वर्णु मृग धारा.   
शब्द पडती तोकडे 
होता सुरू ऋतू वर्षा
हिरवाई चोहीकडे        4

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
8141427430
*****************.






फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रम 
8/7/26
अनलज्वाला 8-8-8-=24मात्रा
         विषय  पाऊस 

मेघ दाटले सोसाट्याचा सुटला वारा 
नकोच नुसता तो गडगडाट गगनामधुनी  
या मेघांनो गर्जत बरसत  वाट पाहतो 
शेतकरीगण लावून नयन शेतातूनी.

वर्षा धारा सरसर झरल्या तप्त धरेवर
खुशीत येती शेतकरीगण  मग मनोमनी
आनंदाने फुलून येई  मन कृषिकाचे 
दिवस सुगीचे दिसतील अता मला जीवनी.

तृप्त जाहली तृषित धरित्री  जलधारांनी
जल  शोषूनी  वसुंधरेचा रंगच  हिरवा       
  सजले डोंगर कडे कपारी राने सारी
सुंदर ऋतु तो  दिसता मोहक वदती बरवा.



जलधारेने  केली किमया अवनीवरती 
.चोहीबाजू  अवघा एकची   रंग पसरला 
  भिजली पाने भिजली राने झाली ओली
वरती खाली सर्व दिशांना मोद विहरला.  

काळे काळे जलद धावती  गगनातूनी
 पहा अंबरी मेघ दाटले गर्जना करी
मधेच दावी करिता चमचम  नृत्य दामिनी 
रिमझिम धारा सुरू जाहल्या सरीवर सरी


वैशाली वर्तक


गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

चित्र काव्य ..... ये बाहेर पिंजऱ्यातून झालीय शिक्षित

काव्य 

आज झालीय शिक्षित 
मिळे सन्मानाचा हात
पण विचारांचा गुंता 
 कधीच सोडत नाही साथ

नव विचारांची पालवी
बहरली कल्पनांची चाहुल
मार्ग पण मिळताहेत 
मग का अडतेय पाऊल

माझे मलाच कळेना
 का मला  खेचते मागे
लोक काय म्हणतील
याचे का मनी विणते धागे

आहे माझ्यात विश्वास 
घेण्या भरारी गगनी
असता मनात उभारी
 का मी अडली  जीवनी

आदी काळापासूनची
काय वर्णावी महती
नव्हती  नारी अबला
सर्व जग ते जाणती

उघडून येतेच  वैचारिक पिंजरा
एकवटुन बळ सारे
 प्रगतीचे मार्ग धरिते 
 आहेत अलौकिक न्यारे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...