रविवार, ८ डिसेंबर, २०२४

आशीर्वाद सर्वांचे अंतरीच्या गाभाऱ्यात

 अभामसाप धुळे जिल्हा 

आयोजित अष्टाक्षरी 

काव्य लेखन 

विषय ... अंतरीच्या गाभाऱ्यात 

 शीर्षक.. आशीष सर्वांचे

    

बालपण निरागस

 मनी नसे हेवे दावे

सारे छानच भासले

दु:ख कधीच न ठावे



मोठे होताआई बाबा

अंतरीच्या गाभाऱ्यात 

आप्त जनासह वसे

मनोमनी आयुष्यात.


समाजात वावरलो

जसे  जलाशयी मीन

मान सदैव हृदयी  sada  sambhgav hrudayi

न मानता कधी दीन.  Manile namaste Kuna din


माता पिता बंधु ताई

सदा साठी अंतरात

गुरू पण देव स्थानी

ह्दयाच्या गाभाऱ्यात .


अंतरीच्या गाभाऱ्यात 

देवा तुझे अग्रस्थान 

तुची चालक पालक

तुझा करितो सन्मान 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

पावसाळ्याची तयारी

 मुक्त छंद साहित्य समूह 

शिवजयंती निमित्त काव्यलेखन स्पर्धा 

विषय..आता घर सावरायला हवे

        *तयारी पावसाळ्याची*


झाली वेळ मृग नक्षत्राची

चला लगबगीने करू तयारी

*आता घर सावरायला हवी*

आपणच आपले बनू कैवारी 


अलिशान घरांना नसते गरज

त्या घरांची जरी मजाआगळी 

घर सावरणे नसे गरजेचे 

पण मातीच्या घरांची शान वेगळी


आले मदतीला सखे सोबती 

झरझर कामे संपवली 

पाऊस पाण्याचे रक्षणा

कौलाने घरे साकारली


बांबू पट्टयांनी केली मजबूत 

कशी दिसताहे पहा टुमदार 

झावळ्यांचा केला उपयोग 

 मुसळधार पाऊस झेलण्या तयार




वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

ललित लेखन. चिमणी




ललित लेख 

चिमणी 

इथं इध बस ग चिऊ
       दाणा खा पाणी पी
      अन् बाळाच्या डोक्यावरून 
      भुर्रsssकन उडून जा.

      असे म्हणत विभावरी  बाळाला खेळवत होती. व तो पण हात पुढे करून करून पुन्हा पुन्हा विभावरीला  तिचा हात धरुन, स्वतः चा तळहात पसरवून तिचे बोट स्वतःच्या हातावर  नाचविण्यासाठी.. तिला खुणवित होता. 
आणि भुर्रकन म्हणताच हात डोक्यावरून वर  घेत होता.  खरच आहे... लहान बाळांना खेळविण्यात  सा-या ताई, माईं ,आईंनी आपापल्या लेकरांना रिझविण्यासाठी म्हटलेले हे पारंपरिक गाणे आहे.
      आणि सांगायचे की, खरच काळाच्या ओघात *ती चिऊ* खरच उडून गेली आहे.आता मुलांना एक घास चिऊचा म्हणायला.. चिऊच राहिली नाहीये. 
    त्यामुळे बाळांचे जेवण तसेच अडलय .बाळाच्या ताटलीतला शेवटचा घास चिऊ चा तसाच राहून जातोय.
      छोटेसे रुप असलेली ही चिमणी. किती पट पट पाऊल उचलते ना !   दाणे टिपते.  आत्ता ईथे. ... तर दुस-या सेकंदाला उडून जाते. चिमण्याच्या गळ्याचा पुढचा रंग काळा असतो.. पण  दिसतो कसा तरतरीत   व चिमणी तशी उजळी  भुरकट पांढरे ठिपके, चटपटीत असते. दोन पायांनी न चालता उड्या मारतच चालते.

     तसा चिमणी हा पक्षी मूळचा युरोप, भूमध्य प्रदेश आणि आशियातील आहे. 
चिमणी मानवी वस्तीजवळ राहण्यासाठी ओळखली जाते. 
चिमणी शहरी , शहरांमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातीं पैकी एक आहे. 
चिमणीची   निवासी वसाहत म्हणजे  बागा, शेत-तळे, कृषी क्षेत्रे, कार्यालयीन इमारती आणि जलद वाहतूक असलेल्या महामार्गांजवळ दिसते. 
चिमणीचे मुख्यतः धान्य आणि बिया खाणे, तसेच पशुधन खाते   आणि शहरांमध्ये टाकून दिलेले अन्न खाते. चिमणीचा विणीचा हंगाम वर्षभर दिसून येतो.
 
      पण खेदाची बाब आहे की , ही चिमणी सध्याच्या काळात दुर्मिळ होत चालली आहै.चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. सध्याच्या मोबाईल टॉवर्समधून होणाऱ्या विद्युत् चुंबकीय उत्सर्जनामुळे चिमण्यांच्या संख्येत घट होत आहे, याबाबत संशोधन सुरू आहेच.  चिमणीच्या संवर्धनासाठी दरवर्षी २० मार्च हा दिवस “जागतिक चिमणी” दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
  चिमणीचे आयुर्मान सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. चिमणीच्या डोक्यावर, मानेवर तसेच शरीरावर इतरत्र विविध रंगांचे आणि विविध आकाराचे ठिपके आढळतात. त्यावरून त्यांचे विविध जातींत वर्गीकरण करण्यात आले आहे .
अशी ही चिमणी काही काळा पूर्वी घरात नेहमी दिसायची.
        अशी चिमणीची कहाणी विभावरीने त्या बाळाला झोपविल्या नंतर बाळाच्या मोठ्या शाळेत जाणा-या ताईला  आईने सांगितली. आणि ताईने  पण लगेच आठोळी चिमणी वर लिहील्या.


चिव चिव चिमणी
करते चिवचिवाट
येते नाचत अंगणी
होता रोज पहाट.

नाचतच चालतेस
उचलते दाणे पटकन
घेते स्वतः भोवती गिरकी
उडून जाते झटकन.

   तर आईने.  तिला शाबासकी दिली तिचे कौतुक केले. पुढे  तिच  आठोळी वाढवून कविता पूर्ण केली .

दाणे घेउन जाते घरटी
पिल्लांना खाऊ घालण्या
घेते काळजी पिलाची,
शिकवते तया उडण्या.

रूप तुझे पिटूकले
परि आहे ते मोहक,
नाच तुझा विलीक्षण
नेहमी चित्त वेधक.


कुठे दूरवर गेली पळून 
बाळांना प्रिय रूप न्यारे
हवय ग आम्हा तव अस्तित्व 
घेऊ काळजी ,आता सारे .

        अशी चिमणी जी *घर चिमणी* म्हणून पण ओळखली जाते. आणि काय सांगू तुम्हाला ! अहो या चिमणी वर लिहीता मला पण खरंच चिमणी दिसली, तशी कधी तरी एखादीच दिसते. बागेत येते क्वचित . पण आता तिला पाहताच माझे मन आनंदाने सुखावले. व लगेच   लेखन थांबवून तिचा फोटो घेतला.
   करते ना फेसबुक वर लगेच पोस्ट. आपण पण पहा. तुम्हाला पण माझ्या सारख आनंद होईल.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
गुजरात 
8141427430

कवी मन



सारस्वतांची मांदियाळी (R)
विषय.  कवी मन
दि4/12/24


देण्यास स्फूर्ती सैनिकास
कधी रमते निसर्गात
तर कधी  प्रबोधनात
कवी मन सदा  गुंग विचारात 

 
करते दालन उघडे विचारांचे
रचते  मन सुंदर कविता 
मनीचे गुढ  सांगता
वाहते विचार सरिता 

 कवी मन  काय सांगू 
सदा हळवे विचारांचे
डोळे पाणावती क्षणात 
पाहून दु:ख दलितांचे 


समाजाचे गुणदोष दावता
लिखाण असे जणु आरसा
सहज देती उपदेश 
चालू रहावा कवी मन वारसा



असेची असते कवी मन
उगा का वदती जन  सारे
जे न दिसे रवी ते दिसे कवी
मन कवीचे क्षणोक्षणी न्यारे




वैशाली वर्तक 
अहमदाबाद







कवी मन

देण्यास स्फूर्ती सैनिकास
कधी रमते निसर्गात
तर कधी  प्रबोधनात
कवी मन सदा  गुंग विचारात 

 
करते दालन उघडे विचारांचे
रचते  मन सुंदर कविता 
मनीचे गुढ  सांगता
वाहते विचार सरिता 

 कवी मन  काय सांगू 
सदा हळवे विचारांचे
डोळे पाणावती क्षणात 
पाहून दु:ख दलितांचे 


समाजाचे गुणदोष दावता
लिखाण असे जणु आरसा
सहज देती उपदेश 
चालू रहावा कवी मन वारसा


असेची असते कवी मन
उगा का वदती जन  सारे
जे न दिसे रवी ते दिसे कवी
मन कवीचे क्षणोक्षणी न्यारे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

अबोला तुझ्या माझ्यातला

सिद्ध साहित्यिक समूह आयोजित 
उपक्रम क्रमांक 573
विषय .... अबोला तुझ्या माझ्यातला
शीर्षक..  देना मनाचा विसावा 

लावूनिया प्रीत वेडी
दाविलीस रे माया
 सोडून मज एकटीला
गेला कुठे माझा  राया

किती वाट पाहू तुझी
कशी साहू  रे दुरावा
येना जवळी माझ्या
देना  मनाचा विसावा

दोन शब्द ते वदले
तर केवढा कहर.      
जणू घोर अपराध          
हरविला प्रेम बहर ?

वाटे मनी  तूची सदा
मज समीप असावा
नको धरुस अबोला
कर दूर  हा दुरावा

जोडी  जणू तुझी माझी
शशी चांदणी नभीची
रोजच येउनी नभी
ओढ लागे ती भेटीची

रात्र  वैरीण सदाची
येत नाही  का माझी कीव
अंत नको पाहू आता
 तळमळे सदा जीव

क्षणभर न पटता ही
जोडी आपुली आगळी 
जन  वदती कौतुके
जोडी तुमची जगा वेगळी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

विचार वणवा

सिद्ध साहित्यिक समूह आयोजित
उपक्रम
विषय .. विचार वणवा

होते बसले निवांत
 मनी माजले काहूर
 सुरू  थैमान विचारांचे
  झाला  मेंदूचा चक्काचूर 

 किती किती हा भ्रष्टाचार
 लहानांपासून मोठे सारे
 सर्व क्षेत्रात माजलेलाच
 रूप प्रत्येकाचे न्यारे

 सारे व्यवहार चालती
 टेबलाच्या खालूनी  सदा
 निती नियमांची नसे चाड
 स्वतःचा फायदा पाहती सर्वदा

कधी, कसे, केव्हा थांबणार
  जाळे  हे भ्रष्टाचाराचे 
जो तो  सांगे येथे विचार 
आपल्याच मोठेपणाचे

विचार करून करुन
पेटला वणवा विचारांचा
सांगा उपाय कसा मिळवू
मनी विचार ,निवांतांचा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

आभाळ माया. मायेची पखरण

सायबर क्राईम ३\६\२५.... 


मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 
आयोजित साप्ताहिक स्पर्धा उपक्रम क्रमांक 21
27/11/24
विषय ...आभाळमाया
शीर्षक... मायेची पखरण


माया असते आईची
नाही होऊ देत आबाळ 
अहोरात्र तिज चिंता 
सुखी राहो तिचा बाळ.

आभाळाची विशालता
कशी करणार मोजणी
भाव मातेचे प्रेमळ ,मायेचे
अशक्यची, शब्दांत मांडणी .

माता असो पशू पक्ष्यांची
माया उरात आभाळभर
जरी ,गगनी घेतसे भरारी
मायेची नजर पिलावर .

गुरू शिष्याचे प्रेम 
असतेच मनी खास 
अर्जुन शिष्यास, कृष्णाने
विश्वरूप दाविलेच ना हमखास!.

निर्मिले एकची आभाळ 
विधात्याचे, असे ते वरदान 
सारे विश्व एकची कुटुंब 
समतेची देत शिकवण महान.

आभाळ माया ईश्वराची 
किती वर्णावी तिची महती
लिहीता संपेल जीवन काळ 
शब्द ते   तोकडे भासती.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





काव्य स्पंदन राज्यस्तरीय स्पर्धा 02. झटपट स्पर्धा 
काव्यलेखन स्पर्धा 
प्रकार अष्टाक्षरी 
विषय माया

शीर्षक... मायेची पखरण


माया असते आईची
कधी न होता आबाळ
अहोरात्र तिज चिंता 
सुखी राहो तिचा बाळ.

आभाळाची विशालता
कशी करावी मोजणी
भाव मातेचे मायेचे
 नसे शब्दात मांडणी


माता   पशू  वा पक्ष्यांची
माया ती आभाळभर
जरी ,गगनी  भरारी
 लक्ष मायेचे पिलावर


गुरू शिष्याची माया ही
असतेच मनी खास 
   शिष्य पार्थास.   कृष्णाने
विश्वरूप दावी खास!.


 माया  अगाध देवाची
किती वर्णावी  महती
    काळ संपे जीवनाचा
शब्द    तोकडे भासती.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


चित्र काव्य करू हितगुज

शब्द रजनी साहित्य समूह पुणे  चित्र काव्य  अष्टाक्षरी  शीर्षक  ... करु हितगुज  हात  हातात घेतला जाऊ समुद्र  किनारी मौज लाटांची पहात बसु बाळुत...