गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

ललित लेखन. चिमणी




इथं इध बस ग चिऊ
       दाणा खा पाणी पी
      अन् बाळाच्या डोक्यावरून 
      भुर्रsssकन उडून जा.

      असे म्हणत विभावरी  बाळाला खेळवत होती. व तो पण हात पुढे करून करून पुन्हा पुन्हा विभावरीला  तिचा हात धरुन, स्वतः चा तळहात पसरवून तिचे बोट स्वतःच्या हातावर  नाचविण्यासाठी.. तिला खुणवित होता. 
आणि भुर्रकन म्हणताच हात डोक्यावरून वर  घेत होता.  खरच आहे... लहान बाळांना खेळविण्यात  सा-या ताई, माईं ,आईंनी आपापल्या लेकरांना रिझविण्यासाठी म्हटलेले हे पारंपरिक गाणे आहे.
      आणि सांगायचे की, खरच काळाच्या ओघात *ती चिऊ* खरच उडून गेली आहे.आता मुलांना एक घास चिऊचा म्हणायला.. चिऊच राहिली नाहीये. 
    त्यामुळे बाळांचे जेवण तसेच अडलय .बाळाच्या ताटलीतला शेवटचा घास चिऊ चा तसाच राहून जातोय.
      छोटेसे रुप असलेली ही चिमणी. किती पट पट पाऊल उचलते ना !   दाणे टिपते.  आत्ता ईथे. ... तर दुस-या सेकंदाला उडून जाते. चिमण्याच्या गळ्याचा पुढचा रंग काळा असतो.. पण  दिसतो कसा तरतरीत   व चिमणी तशी उजळी  भुरकट पांढरे ठिपके, चटपटीत असते. दोन पायांनी न चालता उड्या मारतच चालते.

     तसा चिमणी हा पक्षी मूळचा युरोप, भूमध्य प्रदेश आणि आशियातील आहे. 
चिमणी मानवी वस्तीजवळ राहण्यासाठी ओळखली जाते. 
चिमणी शहरी , शहरांमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातीं पैकी एक आहे. 
चिमणीची   निवासी वसाहत म्हणजे  बागा, शेत-तळे, कृषी क्षेत्रे, कार्यालयीन इमारती आणि जलद वाहतूक असलेल्या महामार्गांजवळ दिसते. 
चिमणीचे मुख्यतः धान्य आणि बिया खाणे, तसेच पशुधन खाते   आणि शहरांमध्ये टाकून दिलेले अन्न खाते. चिमणीचा विणीचा हंगाम वर्षभर दिसून येतो.
 
      पण खेदाची बाब आहे की , ही चिमणी सध्याच्या काळात दुर्मिळ होत चालली आहै.चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. सध्याच्या मोबाईल टॉवर्समधून होणाऱ्या विद्युत् चुंबकीय उत्सर्जनामुळे चिमण्यांच्या संख्येत घट होत आहे, याबाबत संशोधन सुरू आहेच.  चिमणीच्या संवर्धनासाठी दरवर्षी २० मार्च हा दिवस “जागतिक चिमणी” दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
  चिमणीचे आयुर्मान सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. चिमणीच्या डोक्यावर, मानेवर तसेच शरीरावर इतरत्र विविध रंगांचे आणि विविध आकाराचे ठिपके आढळतात. त्यावरून त्यांचे विविध जातींत वर्गीकरण करण्यात आले आहे .
अशी ही चिमणी काही काळा पूर्वी घरात नेहमी दिसायची.
        अशी चिमणीची कहाणी विभावरीने त्या बाळाला झोपविल्या नंतर बाळाच्या मोठ्या शाळेत जाणा-या ताईला  आईने सांगितली. आणि ताईने  पण लगेच आठोळी चिमणी वर लिहील्या.


चिव चिव चिमणी
करते चिवचिवाट
येते नाचत अंगणी
होता रोज पहाट.

नाचतच चालतेस
उचलते दाणे पटकन
घेते स्वतः भोवती गिरकी
उडून जाते झटकन.

   तर आईने.  तिला शाबासकी दिली तिचे कौतुक केले. पुढे  तिच  आठोळी वाढवून कविता पूर्ण केली .

दाणे घेउन जाते घरटी
पिल्लांना खाऊ घालण्या
घेते काळजी पिलाची,
शिकवते तया उडण्या.

रूप तुझे पिटूकले
परि आहे ते मोहक,
नाच तुझा विलीक्षण
नेहमी चित्त वेधक.


कुठे दूरवर गेली पळून 
बाळांना प्रिय रूप न्यारे
हवय ग आम्हा तव अस्तित्व 
घेऊ काळजी ,आता सारे .

        अशी चिमणी जी *घर चिमणी* म्हणून पण ओळखली जाते. आणि काय सांगू तुम्हाला ! अहो या चिमणी वर लिहीता मला पण खरंच चिमणी दिसली, तशी कधी तरी एखादीच दिसते. बागेत येते क्वचित . पण आता तिला पाहताच माझे मन आनंदाने सुखावले. व लगेच   लेखन थांबवून तिचा फोटो घेतला.
   करते ना फेसबुक वर लगेच पोस्ट.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...