सिद्ध साहित्यिक समूह आयोजित
उपक्रम
विषय .. विचार वणवा
होते बसले निवांत
मनी माजले काहूर
सुरू थैमान विचारांचे
झाला मेंदूचा चक्काचूर
किती किती हा भ्रष्टाचार
लहानांपासून मोठे सारे
सर्व क्षेत्रात माजलेलाच
रूप प्रत्येकाचे न्यारे
सारे व्यवहार चालती
टेबलाच्या खालूनी सदा
निती नियमांची नसे चाड
स्वतःचा फायदा पाहती सर्वदा
कधी, कसे, केव्हा थांबणार
जाळे हे भ्रष्टाचाराचे
जो तो सांगे येथे विचार
आपल्याच मोठेपणाचे
विचार करून करुन
पेटला वणवा विचारांचा
सांगा उपाय कसा मिळवू
मनी विचार ,निवांतांचा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा