बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

आभाळ माया. मायेची पखरण

सायबर क्राईम ३\६\२५.... 


मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 
आयोजित साप्ताहिक स्पर्धा उपक्रम क्रमांक 21
27/11/24
विषय ...आभाळमाया
शीर्षक... मायेची पखरण


माया असते आईची
नाही होऊ देत आबाळ 
अहोरात्र तिज चिंता 
सुखी राहो तिचा बाळ.

आभाळाची विशालता
कशी करणार मोजणी
भाव मातेचे प्रेमळ ,मायेचे
अशक्यची, शब्दांत मांडणी .

माता असो पशू पक्ष्यांची
माया उरात आभाळभर
जरी ,गगनी घेतसे भरारी
मायेची नजर पिलावर .

गुरू शिष्याचे प्रेम 
असतेच मनी खास 
अर्जुन शिष्यास, कृष्णाने
विश्वरूप दाविलेच ना हमखास!.

निर्मिले एकची आभाळ 
विधात्याचे, असे ते वरदान 
सारे विश्व एकची कुटुंब 
समतेची देत शिकवण महान.

आभाळ माया ईश्वराची 
किती वर्णावी तिची महती
लिहीता संपेल जीवन काळ 
शब्द ते   तोकडे भासती.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





काव्य स्पंदन राज्यस्तरीय स्पर्धा 02. झटपट स्पर्धा 
काव्यलेखन स्पर्धा 
प्रकार अष्टाक्षरी 
विषय माया

शीर्षक... मायेची पखरण


माया असते आईची
कधी न होता आबाळ
अहोरात्र तिज चिंता 
सुखी राहो तिचा बाळ.

आभाळाची विशालता
कशी करावी मोजणी
भाव मातेचे मायेचे
 नसे शब्दात मांडणी


माता   पशू  वा पक्ष्यांची
माया ती आभाळभर
जरी ,गगनी  भरारी
 लक्ष मायेचे पिलावर


गुरू शिष्याची माया ही
असतेच मनी खास 
   शिष्य पार्थास.   कृष्णाने
विश्वरूप दावी खास!.


 माया  अगाध देवाची
किती वर्णावी  महती
    काळ संपे जीवनाचा
शब्द    तोकडे भासती.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वप्न नव भारताचे

स्वप्न नव भारताचे      काल पाहिले सुंदर स्वप्न   मन माझे  आनंदले केले वंदन देवाला  अन् काव्यातून रेखाटले.           स्वप्नी होता  सुंदर स्वच...