विषय. कवी मन
दि4/12/24
देण्यास स्फूर्ती सैनिकास
कधी रमते निसर्गात
तर कधी प्रबोधनात
कवी मन सदा गुंग विचारात
करते दालन उघडे विचारांचे
रचते मन सुंदर कविता
मनीचे गुढ सांगता
वाहते विचार सरिता
कवी मन काय सांगू
सदा हळवे विचारांचे
डोळे पाणावती क्षणात
पाहून दु:ख दलितांचे
समाजाचे गुणदोष दावता
लिखाण असे जणु आरसा
सहज देती उपदेश
चालू रहावा कवी मन वारसा
असेची असते कवी मन
उगा का वदती जन सारे
जे न दिसे रवी ते दिसे कवी
मन कवीचे क्षणोक्षणी न्यारे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कवी मन
देण्यास स्फूर्ती सैनिकास
कधी रमते निसर्गात
तर कधी प्रबोधनात
कवी मन सदा गुंग विचारात
करते दालन उघडे विचारांचे
रचते मन सुंदर कविता
मनीचे गुढ सांगता
वाहते विचार सरिता
कवी मन काय सांगू
सदा हळवे विचारांचे
डोळे पाणावती क्षणात
पाहून दु:ख दलितांचे
समाजाचे गुणदोष दावता
लिखाण असे जणु आरसा
सहज देती उपदेश
चालू रहावा कवी मन वारसा
असेची असते कवी मन
उगा का वदती जन सारे
जे न दिसे रवी ते दिसे कवी
मन कवीचे क्षणोक्षणी न्यारे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा