सिद्ध साहित्यिक समूह आयोजित
उपक्रम क्रमांक 573
विषय .... अबोला तुझ्या माझ्यातला
शीर्षक.. देना मनाचा विसावा
लावूनिया प्रीत वेडी
दाविलीस रे माया
सोडून मज एकटीला
गेला कुठे माझा राया
किती वाट पाहू तुझी
कशी साहू रे दुरावा
येना जवळी माझ्या
देना मनाचा विसावा
दोन शब्द ते वदले
तर केवढा कहर.
जणू घोर अपराध
हरविला प्रेम बहर ?
वाटे मनी तूची सदा
मज समीप असावा
नको धरुस अबोला
कर दूर हा दुरावा
जोडी जणू तुझी माझी
शशी चांदणी नभीची
रोजच येउनी नभी
ओढ लागे ती भेटीची
रात्र वैरीण सदाची
येत नाही का माझी कीव
अंत नको पाहू आता
तळमळे सदा जीव
क्षणभर न पटता ही
जोडी आपुली आगळी
जन वदती कौतुके
जोडी तुमची जगा वेगळी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा