अभामसाप धुळे जिल्हा
आयोजित अष्टाक्षरी
काव्य लेखन
विषय ... अंतरीच्या गाभाऱ्यात
शीर्षक.. आशीष सर्वांचे
बालपण निरागस
मनी नसे हेवे दावे
सारे छानच भासले
दु:ख कधीच न ठावे
मोठे होताआई बाबा
अंतरीच्या गाभाऱ्यात
आप्त जनासह वसे
मनोमनी आयुष्यात.
समाजात वावरलो
जसे जलाशयी मीन
मान सदैव हृदयी sada sambhgav hrudayi
न मानता कधी दीन. Manile namaste Kuna din
माता पिता बंधु ताई
सदा साठी अंतरात
गुरू पण देव स्थानी
ह्दयाच्या गाभाऱ्यात .
अंतरीच्या गाभाऱ्यात
देवा तुझे अग्रस्थान
तुची चालक पालक
तुझा करितो सन्मान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा