मंगळवार, २५ जुलै, २०२३
करू वन संवर्धन \ वृक्षारोपण
रविवार, २३ जुलै, २०२३
.श्रावण धारा .. नाचतआलाश्रावण \मन भावना श्रावण श्रावणी उत्सव
१
*नाचत आला श्रावण
सुरु झाला ऋतु वर्षा
नभ दाटले मेघांनी
दाहकता कमी भासे
आदित्याची नभांगणी
गर्दी जलदांची नभी
गर्जताती कृष्ण मेघ
झाली घाई बरसण्या
मधे चमके वीज रेघ
ढोल ताशांच्या गर्जना
धुवादार बरसात
भासे फाटले आभाळ
वारा वाहतो जोशात
घन आले ओथंबूनी
लपंडाव चाले खेळ
मेघ गातात मल्हार
जमे पावसाचा मेळ
कड्यातून वाहे झरे
जणू शुभ्र दुग्ध धारा
खाच खळगे भरले
शीळ घाली मंद वारा
जणु सरी मोतीयांच्या
भासताती जल धारा
वाहे ओहोळ सर्वत्र
ओली चिंब झाली धरा
वैशाली वर्तक
मनभावन श्रावण काव्य शृंखला
कल्पतरू जागतिक साहित्य मंच आयोजित
काव्य शृंखलेत स्मिता भिमनवार व अंजली देशपांडे (नाशिक) यांना आमंत्रित केले आहे
माझी रचना👇🏼
विषय... मनभावन श्रावण
*सणवार आनंदाचा श्रावण*मनभावन \
मास आषाढ सरला
सुरु झाल्या श्रावण धारा
रिमझिम पडे पाऊस
थंड झोबतो अंगा वारा
ऊन आले म्हणताच
सरी वर सरी बरसती
लपंडाव ऊन पावसाचा
पक्षी मजेत विहरती
वाहती खळखळ नद्या
उंच कड्यावरुनी प्रपात
किती मोहक सृष्टी सजली
गाणे गाई वारा जोरात
येता श्रावण महिना
येई उधाण उत्साहाला
असे सणांचा सोहळा
सीमा न उरे आनंदाला
होते श्रावणाची सुरुवात
दिव्याच्या आवसेने
दीप पूजन करती नारी
भाव कृतार्थ जागवणे
याच महिन्यात येतो
कृष्ण जन्म,बैलपोळा
अन् रक्षा बंधन दिनाला
आप्त जन होती गोळा
अशी सणांची रेलचेल
असे आवडीचा श्रावण
होती आप्त जनांच्या भेटी
मास असे *मन भावन*
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शनिवार, २२ जुलै, २०२३
पत्र लिहिण्यास कारण की...... आठवणी मनीच्या
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच बुलढाणा आयोजित उपक्रम
राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा
विषय..पत्र लिहिण्यास कारण की,
शीर्षक...*आठवणी मनीच्या*
दिन हरपले राहिल्या फक्त आठवणी
वाट पहात बसणे वाटे भारी
कधी येईल पोस्टमन
पत्र देण्या आपल्या दारी
विचार पूस होई एकमेकांना
आला का ग पोस्ट मन
पत्र नाही मुलांचे कधीचे
काळजीत जातात एक एक क्षण
आता नाही मजा पत्राची
तेच तेच पत्र वाचण्याची
वाचून घडी करुन जपून
ठेवलेल्या अनेक पत्रांची
आता केले विज्ञानाने
जग अतिशय सुलभ
प्रत्यक्ष पहाणे होते क्षणात
काळजी , चिंतेचे नुरे मळभ
लहान सहान गोष्टी पण
कळतात मिचकविता पापणी
थेट घरात पोहचून , शिरून
नजरेने होते प्रत्यक्ष देखणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शुक्रवार, २१ जुलै, २०२३
(12) पावसाच्या कविता 1बरसला घननिळा! 2हिरवळ दाटे चोहीकडे !3लपंडाव 4हाहाकार खेळपावसाचा त पाव. साचा
अ भा म सा परिषद शब्दभाव
आयोजित
काव्यलेखन
1विषय..बरसला घननिळा
शीर्षक...ऋतू हिरवा*
झाली मृगाची बरसात
तप्त अवनी तृप्त जाहली
दरवळला मृद्गंध आसमंती
वृक्ष लता फोफावली
गरजत बरसत या मेघांनो
नको नुसती गर्दी गगनात
गडगड करित बरसा रे
पेरणीची झाली वेळ शिवारात
वाहतील झरे खळखळ
भासतील शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस ते निसर्गाचे
गीत गाईल थंड मंद वारा
बळीराजा खुश होईल
काम करेल शिवारी
स्वप्न रंगवेल मनी
गोड लागेल भाकरी
वाहता जल कडे कपारीतून
होईल रंग धरेचा हिरवा
रानमाळ डोंगर सजतील
करु साजरा ऋतू बरवा
बरसला घन निळा
वाटे समाधान मना
दूर केली मरगळ सृष्टीची
सृजनता दिसे क्षणा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
2 हिरवळ चोहीकडे
===============
रुक्ष धरा येता वर्षा
पहा कशी बहरली
ओली चिंब झाली धरा
तृणांकुरे अंकुरित
रूप पहा वसुधेचे
किती भासे मनोहर
जणु हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर
चिंब भिजली अवनी
हिरवळ चहुकडे
मोह न आवरे मनी
वाटे पाहू कुणीकडे
रानमाळ हिरवट
वृक्ष वेली बहरल्या
रंग एकच धरेच्या
भासे पाचू पसरला
झरे वाही खळखळ
भासे शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस निसर्ग
गीत गाई थंड वारा
वाटे पहात रहावे
किती पाहू कुठवर
दृश्य पहाण्या मोहक
जन उभी क्षणभर
3. लपंडाव खेळत पावसाचा
प्रवासी
मिळेल आनंद मनोमनीमोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित उपक्रम ८२२
गुरुवार, २० जुलै, २०२३
आयुष्याच्या पानावर
अजून प्रश्न बाकी आहेत
भारतीय साहित्य वसआंमंच नाशिक
आयोजित उपक्रम
विषय...प्रश्न अजूनही बाकी आहे
आहे जो पर्यंत जीवन
प्रश्न येणार मनात
विचारांची प्रश्न मालिका
सदैव राहणार विचारात
कामच आहे मेंदूचे
विचार करी क्षणा क्षणाला
विचारात सदैव दंग
प्रश्न विचारी मनाला
जीवन आहे प्रश्न मालिका
एका नंतर एक सोडवावे
तरी न संपेल कधीही
दूस-या प्रश्ना तयार रहावे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अलिप्तता व दुर्लक्षता
अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत. .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही तो लहानाचा मोठा होतो. ...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...









