मिळेल आनंद मनोमनीमोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित उपक्रम ८२२
काव्यलेखन
विषय.. प्रवासी
आपण सारे प्रवासी
आलो या भू तलावरी
कोण कुठला कोठूनही आला
आहे का जाण कुणा तरी?
जीवन असे प्रवास एक
असती तयाते टप्पे तीन
बाल्य ,तारुण्य ,वार्धक्य
आनंदाने जगू न होता दीन
लेकरे सारी आपण ईश्वराची
नाते जडले विश्व बंधुत्वाचे
मानवता हाची धर्म आपुला
सहप्रवासी सारे जीवन यात्रेचे
कुणास नसतेची ठाव
कोण केंव्हा उतरणार
गुण्या गोविंदाने चालता
कोणाची यात्रा संपणार
जीवन यात्रेत नक्की करू
भार देऊन सत्कर्मावर
मदतीचा हात देता
जीवन प्रवास होईल सुखकर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा