उपक्रम
विषय - आयुष्याच्या पानावर
रंगीत पाने
पाने उलगडली आयुची
प्रत्येक पान होते सुंदर
एक एक करीता सरली
अनुभवली ती मनोहर
बालपणीचे निरागस
होते पान आनंदित
नव्हते त्यात हेवेदावे
चिंता क्लेश विरहीत
यौवनाचे होते गुलाबी
रंगविली स्वप्ने मनी
कधी बागेत समुद्र किनारी
आता आठवणी, या क्षणी
आले कर्तव्य कर्तृत्वाचे
नजरे समोर ते पान
स्फुरण चढले मनात
कसा मिळविला जगी मान
रंगलेल्या, आनंदल्या जीवनी
पान आले समाधानाचे
दिधले सारेची विधात्याने
मानते आभार देवाचे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
वरची कविता अष्टाक्षरी त
रंगीत पाने
पाने चाळली आयुची
पान प्रत्येक सुंदर
निहाळली सरलेली
होती सारी मनोहर
बाल्यातले निरागस
होते पान आनंदित
नाही त्यात हेवेदावे
चिंता क्लेश विरहीत
यौवनाचे ते गुलाबी
रंगविली स्वप्ने मनी
कधी वनीं उपवनी
ताज्या झाल्या आठवणी
कर्तव्याचे ,कर्तृत्वाचे
नजरेत आले पान
आले स्फुरण मनात
मिळविला जगी मान
दंग सुखाच्या जीवनी
पान आले समाधानाचे.
दिले सारे विधात्याने
ऋण मानीते देवाचे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा