अखंडित कल्याणकारी काव्य
आयोजित उपक्रम
विषय..करू वन संवर्धन
*वृक्ष सोयरे साथी*
वेळ आली आहे आता
वनांकडे देणे लक्ष
राने वने केली नाश
वृक्षारोपण दुर्लक्ष
करा लगबग आता
लावा आपापल्या अंगणी
पुष्प भाज्यांची रोपे
पहा हिरवी धरणी
लावू वृक्ष सभोवती
निसर्गाचे संवर्धन
शुध्द हवेचे योजन
आरोग्यासाठी वर्धन
वृक्ष असती सोबती
देती अन्न न निवारा
करी माया देत छाया
जीवनासाठी सहारा
वृक्ष संवर्धन करा
-हास थांबवा वनांचा
येता संपुष्टात वायु
टाळा प्रसंग धोक्याचा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
आ भा म भा प शब्दभाव
आयोजित उपक्रम
विषय.. वृक्षारोपण
बरसत आहे सरीवर सरी
अलवार जणू रेशीम धारा
दिसतेय हिरवळ सर्वत्र
जणू पाचूचा पसरला पसारा
करा लगबग आता
लावा आपापल्या अंगणी
पुष्प भाज्यांची रोपे
पहा हिरवी धरणी
लावता वृक्ष सभोवती
वाढेल सुंदर पर्यावरण
शुध्द हवेचे नियोजन
आरोग्याचे करेल वर्धन
वृक्षारोपण केल्याने
मिळेल प्राणवायू आपणाला
प्रगतीच्या नावे केलीय वृक्ष तोड
आता दुःख होतय मनाला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा