गुरुवार, २० जुलै, २०२३

आयुष्याच्या पानावर


अभा ठाणे जिल्हा समूह १
उपक्रम 
विषय - आयुष्याच्या पानावर

      रंगीत पाने

पाने उलगडली आयुची
प्रत्येक  पान  होते सुंदर 
एक एक करीता सरली
अनुभवली ती मनोहर

बालपणीचे निरागस
होते पान आनंदित
नव्हते त्यात हेवेदावे
चिंता क्लेश विरहीत

यौवनाचे होते गुलाबी
रंगविली स्वप्ने मनी
कधी बागेत समुद्र  किनारी
आता आठवणी, या क्षणी

 आले कर्तव्य  कर्तृत्वाचे 
 नजरे समोर  ते पान
 स्फुरण चढले मनात
कसा मिळविला जगी मान

रंगलेल्या, आनंदल्या जीवनी
पान आले समाधानाचे
दिधले सारेची विधात्याने
मानते आभार देवाचे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वरची कविता अष्टाक्षरी त



रंगीत पाने


पाने चाळली आयुची
पान  प्रत्येक सुंदर 
निहाळली सरलेली
होती सारी मनोहर 


बाल्यातले निरागस
होते पान आनंदित
नाही त्यात हेवेदावे
चिंता क्लेश विरहीत


यौवनाचे  ते गुलाबी
रंगविली स्वप्ने मनी
 कधी वनीं उपवनी
ताज्या झाल्या आठवणी 

  कर्तव्याचे ,कर्तृत्वाचे 
 नजरेत आले  पान
  आले स्फुरण मनात 
 मिळविला जगी मान
  
 दंग सुखाच्या जीवनी
पान आले समाधानाचे. 
दिले सारे विधात्याने
ऋण मानीते देवाचे


वैशाली वर्तक 
अहमदाबाद




अजून प्रश्न बाकी आहेत

 भारतीय साहित्य वसआंमंच नाशिक

आयोजित उपक्रम

विषय...प्रश्न अजूनही बाकी आहे


 आहे जो पर्यंत जीवन

 प्रश्न येणार मनात

विचारांची प्रश्न मालिका

सदैव राहणार विचारात


कामच आहे मेंदूचे

विचार करी क्षणा क्षणाला 

विचारात सदैव दंग

प्रश्न विचारी मनाला 


जीवन आहे प्रश्न मालिका

एका नंतर एक सोडवावे

तरी न संपेल कधीही

दूस-या प्रश्ना तयार रहावे 


वैशाली वर्तक

अहमदाबाद

मंगळवार, १८ जुलै, २०२३

नदी.

शब्दसेतू साहित्य  मंच पूणे
साप्ताहिक उपक्रम क्रमांक  3/22
विषय - नदी
जोडाक्षर   व जोड शब्द सहित पाच चारोळ्या

1
असो   ऋतू ग्रीष्म वा शरद
झर - झर वहाणे हेची कर्म
देणे जीवन जल -चर प्राण्यास
हेच तिच्या  जीवनाचे  असे मर्म

2

भरोत कुणी घागर वा पखाली
पहाण्यास तिज नसे उसंत
कधी शांत तर रौद्र रुपात
 धावता   सरितेस नसे मनी खंत


3
करोत विसर्जन  ताबुत वा गजानन
वा करा आस्थि विसर्जन  जलात
स्विकारते मोठ्या मनाने सरिता
सदा प्रेमळ भाव  मनात

4

जीवन  सरितेचे असे संतान् सम
न करिता उच- नीच भेद भाव
सज्जन , दुर्जन तिजसी समान
संजीवन देणे एकची ठाव

5

पाहूनी हिरवळ मनी संतुष्ट 
वाहे कधी कधी सरिता संथ
येते धावत कडे- कपारीतुनी
 आक्रमिते  सतत निज पंथ

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

रविवार, १६ जुलै, २०२३

भक्षक नाही रक्षक हवा

क्षमतेने आपल्या नजरेच्या
दूरवर दृष्टीला   रेषेचा आभास 
अन पृथ्वीचा गोलाकाराने
भासे भेटली अवनी नभास

याची आभासी रेषेला
क्षितीज  असेची वदती
 होता अस्त उदय रवीचा
सुंदर रंग क्षितीजा वरती


 बसता समुद्राच्या किनारी
भासे भेटले नभ सागरास
 परि  दिसते  तसे नसते
 असे  काल्पनिक विचारास

रंग उमटती क्षितिजावर
निसर्गाची पहा किमया
विश्वंभर निर्मिली सृष्टी
त्याच्याच कृपेची माया



क्षितीज

क्षमतेने आपल्या नजरेच्या
दूरवर दृष्टीला   रेषेचा आभास 
अन पृथ्वीचा गोलाकाराने
भासे भेटली अवनी नभास

याची आभासी रेषेला
क्षितीज  असेची वदती
 होता अस्त उदय रवीचा
सुंदर रंग क्षितीजा वरती


 बसता समुद्राच्या किनारी
भासे भेटले नभ सागरास
 परि  दिसते  तसे नसते
 असे  काल्पनिक विचारास

रंग उमटती क्षितिजावर
निसर्गाची पहा किमया
विश्वंभर निर्मिली सृष्टी
त्याच्याच कृपेची माया


काव्य पुष्प साहित्य मंच समूह आयोजित 
60 वी राज्य स्तरीय मासिक काव्यलेखन 
स्पर्धेसाठी 
विषय ... क्षितिज 

क्षमतेने  नजरेच्या आपल्या
दूरवर दृष्टीला ,  रेषेचा आभास 
अन पृथ्वीचा गोलाकाराने
भासे भेटली अवनी नभास.

याची आभासी रेषेला
*क्षितीज*  असेची वदती
 होता अस्त उदय रवीचा
सुंदर रंग क्षितीजा वरती

 बसता समुद्राच्या किनारी
भासे भेटले नभ सागरास
 परि  दिसते  तसे नसते
 भासे  काल्पनिक विचारास

रंग उमटती क्षितिजावर
निसर्गाची पहा किमया
विश्वंभर निर्मिली सृष्टी
त्याच्याच कृपेची माया

जसा घेण्या  शोध सुखाचा
फोल ठरले साहाजिक
असे असते हे *क्षितिज*
असते तेही काल्पनिक 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, १३ जुलै, २०२३

उन्हाचे चांदणे व्हावे.. कष्टाचे मोल


 स्वराज्य लेखणी मंच

आयोजित उपक्रम

विषय.. उन्हाचे चांदणे व्हावे


        **कष्टाचे मोल*


काळ्या मातीला कसून

घाम गाळीतो शिवारी

परिश्रम घेतो सदा

पहाण्यास राशी दारी


वाट पाहतो जलाची

बरसण्या मृग धारा

करण्यास पेरणीला

सोसतो गर्म वारा


येता वेळेवर वर्षां 

पहा  माती अंकुरली

पाहुनीया  बीजांकुरे

बळी मने संतोषली


जसा पडता पाऊस

रोपे वाढली जोमाने

झाले उन्हाचे चांदणे

मन डोले आनंदाने


येता दिन ते सुगीचे

भासे उन्हाचे चांदणे

कष्ट आलेत फळाला

हेची देवास सांगणे


वैशाली वर्तक

अहमदाबाद

बुधवार, १२ जुलै, २०२३

म्हणीवरून. खाण तशी माती

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच
धुळे जिल्हा
आयोजित उपक्रम क्रमांक १६७
चारोळी लेखन
विषय. ...खाण तशी माती

खाण तशी माती
कथन असे उचित 
जे पेराल तेच उगवेल
त्यात बदल नसे खचित

चांगले संस्कार देता
 घडे उज्वल भाग्य पाल्याचे
होई. मोठा कर्तबगार 
नशीब उजळे माता पित्याचे

तसेच असे कर्माचे
जैसे करु कर्म जीवनी
मिळे फळ आपणासी
मर्म जाणा मनोमनी

लाविता रोप मधूर फळांचे
वृक्ष वाढिता देई फळ
कधीच न मिळती काटे
कितीही येता. संकट रुपी  वादळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...