क्षमतेने आपल्या नजरेच्या
दूरवर दृष्टीला रेषेचा आभास
अन पृथ्वीचा गोलाकाराने
भासे भेटली अवनी नभास
याची आभासी रेषेला
क्षितीज असेची वदती
होता अस्त उदय रवीचा
सुंदर रंग क्षितीजा वरती
बसता समुद्राच्या किनारी
भासे भेटले नभ सागरास
परि दिसते तसे नसते
असे काल्पनिक विचारास
रंग उमटती क्षितिजावर
निसर्गाची पहा किमया
विश्वंभर निर्मिली सृष्टी
त्याच्याच कृपेची माया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा