शब्दसेतू साहित्य मंच पूणे
साप्ताहिक उपक्रम क्रमांक 3/22
विषय - नदी
जोडाक्षर व जोड शब्द सहित पाच चारोळ्या
1
असो ऋतू ग्रीष्म वा शरद
झर - झर वहाणे हेची कर्म
देणे जीवन जल -चर प्राण्यास
हेच तिच्या जीवनाचे असे मर्म
2
भरोत कुणी घागर वा पखाली
पहाण्यास तिज नसे उसंत
कधी शांत तर रौद्र रुपात
धावता सरितेस नसे मनी खंत
3
करोत विसर्जन ताबुत वा गजानन
वा करा आस्थि विसर्जन जलात
स्विकारते मोठ्या मनाने सरिता
सदा प्रेमळ भाव मनात
4
जीवन सरितेचे असे संतान् सम
न करिता उच- नीच भेद भाव
सज्जन , दुर्जन तिजसी समान
संजीवन देणे एकची ठाव
5
पाहूनी हिरवळ मनी संतुष्ट
वाहे कधी कधी सरिता संथ
येते धावत कडे- कपारीतुनी
आक्रमिते सतत निज पंथ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा