शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

आता बस झाले

अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित  षडाक्षरी काव्य लेखन
स्पर्धा  
क्रमांक 6
विषय -- *आता बस झाले*


*नको गुणगान*

नको  एक दिन  
कौतुकाचे गान
रोज लिहा बोला
वाढवण्या शान

माय-बोलीनेच
जपली संस्कृती 
ठेवा  तिची जाण
वाढवुया किर्ती


तिच्या अस्तित्वाची
ठेवा भ्रांत मनी
 *आता बस झाले*
विचारु या क्षणी

 ती समृद्धतेत
आहेचिया खाण
साहित्यात  नसे 
कुठलीच वाण

तिच्या बळावर
मिळविता मान
जगतात करु
तिचाच सन्मान

सुवर्णाचा दिन
रोजची  आणुया
*बस झाले आता*
शिखरी नेऊया


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २८ मार्च, २०२१

चित्र काव्य मानवाचा लोभ

सप्ताहिक रविवारीय  साहित्य 
लेखन स्पर्धा क्रमांक 38
साहित्य  प्रकार -- चित्र  काव्य    
      *मानवाचा लोभ*
मानवाचा लोभ
झळा ऊन्हाच्या साहूनी
धरा दिसते भकास 
दिसे   कोठेच न हिरवे
मन होतसे उदास 

 -हास करतो वनांचा
झाडे तोडून   कापून
प्राणी मात्र कोठे जाणार
पक्षी गण गेले त्रासून

नाही राहिला निवारा
वृक्षांची ती छत्र छाया
कुठे मिळणार तयांना
सावलीची प्रेमळ माया

पर्ण घेऊनी चोचीत
कष्टी पक्षीण दीनवाणी
देते सावली पिलांना 
वाहे डोळ्यातून पाणी.

स्वतःच आरंभिलास घात
तोडून सृष्टीचा प्रेम पाश
 उपयोग  काय आता
केला सृष्टी चा सर्व नाश

प्रगतीच्या गोड नावे
मानवाचा अती लोभ
ओढाविला निसर्ग  कोप
थांबव  मानवा हा क्षोभ


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
28/3/21

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

रंग उधळुया आनंदाचे

अ भा म सा प डोंबिवली शाखा आयोजित 
रंग उधळूया आनंदाचे स्पर्धा 
स्पर्धेसाठी
     रंग उधळूया आनंदाचे
        
           *आयुष्य सप्तरंगी*
       
जीवन करण्या  सप्तरंगी
करा उधळण रंगाची
जगुया आनंदी स्वच्छंदाने
गाऊया गाणी आनंदाची

रंगची देती मोद जीवा
पहाताची मन होते दंग
किती मोहक दिसतात
एकाहून एक सुंदर  रंग

सृष्टी ने केली उधळण 
येताच हा ऋतू  वसंत
नानारंगी फुले फुलवून
फूले फुलवण्या नसे उसंत

सूर्य  येता  प्रभाती नभी
दिसे छटा  केशरी रंगाची
होतो आनंद जन मनाला
पाहू रंग उधळण निसर्गाची


मिळाला जन्म मानवाचा
करु सोने  आयुष्याचे
कशाला खंत निराशा मनीं
रंग उधळूया आनंदाचे

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
26/3/2021













सोमवार, २२ मार्च, २०२१

अंगणी दरवळला चाफा

यारिया साहित्य  कला समूह
उपक्रम - ओळ काव्य
विषय -- अंगणी चाफा दरवळला

लागता चाहुल वसंताची
नानाविधी फुले फुलली
*अंगणी दरवळला चाफा*
सारी सृष्टी पहा बहरली

हिरव्या पानातूनी डोकवी
फुले चाफ्याची हळुवार 
शुभ्र फुले हरित पाने
वा-यासंगे डोले अलवार

घनदाट झाड चाफ्याचे
अंगणी उभे डौलदार 
करि गंधित आसमंत सारा
सदा बहरे पहा शानदार

हिरव्या चाफ्याच्या गंधाने
प्रसन्न होई वातावरण
अलगद घेता हाती तयांना
गंधित करि पर्यावरण

किती होती फुले पुजेस्तव
पण सोन चाफा दिसे सुंदर 
मोग-या शेवंती सम तयाचे
गंधित रुप भासे मनोहर


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २१ मार्च, २०२१

(7कवितेचा गाव/कवितेच्या प्रेमात/काव्य असेजीवन..बयो कविते / कविते सुंदरी

महाराष्ट्र  साहित्य  सुगंध
.   (१) कवितेचे गाव

येता सहज विचार 
कवितेचे  वसे गाव
असे ते सदा वेगळे 
कवी मनी घेता ठाव

झरतात शब्द जेव्हा
कवी हृदयाचे भाव
नांदी नवरस येथे
दावी अंतरीचा ठाव

वाहे भावनांची नदी
कवितेच्या गावातूनी
जसे भाव उमटती
वाहे त्या रसा तूनी

भाव दाविते शौर्याचे 
स्फूर्ती  देण्या सैनिकास
तर  भक्ती रस भाव
दिसे भोळ्या त्या भक्तास 

कवितेचा गाव पहा 
देतो आनंद मनास
मनी न राखता खंत
करी उत्साहीजनास

वैशाली वर्तक



काव्य पुष्प साहित्य  मंच समूह
स्पर्धा  क्रमांक  ३६
विषय - कवितेच्या जगात
      
      *मनास उभारी*

आला  सहज विचार   
घ्यावा आनंद वेगळा
जावे जगी कवितेच्या
रस चाखण्या आगळा

शब्द झरता दिसती 
कवी हृदयीचे भाव
दिसे नवरस  त्यात
दावी अंतरीचा  ठाव

वाहे भावनांची नदी
कवितेच्या जगातूनी
जसे भाव उमटती
वाहे त्या त्या रसातूनी

भाव दाविते शौर्याचे 
स्फूर्ती  देण्या सैनिकास
तर  भक्ती रस-भाव
भाव भोळ्या त्या भक्तास 

कवितेचे जग पहा 
देते आनंद मनास
मनी न राखता खंत
करी उत्साही जनास

 मिळे कवितेच्या जगी
मानसिक सुख भारी
  सहजची विहरता
येई मनास उभारी  

वैशाली वर्तक
अहमदाबाद







माझी  लेखणी सप्तरंगी=3
विषय- (२)  कवितेच्या प्रेमात


येता विचारांचे वादळ
  गूज  मनीचे सांगू  कसे 
 मम भावनांना दावण्या
  हाती लेखणी घेत असे

झरे लेखणी झरझर
देत   शब्दांना  आकार 
खेळ चालतो शब्दांचा
होते कविता  साकार

छंद जीवाला जडला
सखी झाली  लेखणी
नित्य नेमाने करी मदत
झाली सखी ती देखणी

नकळत  कवितेच्या प्रेमात
विचार  येती मनात 
डौलते सुमन पाहूनी
ओळी झरती क्षणात

रोजचेच झाले आता
लेखणी स्फुरते सहज
देता शब्दही कुठला
 विचाराची नुरते गरज

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कल्याण डोंबिवली महानगर 2
जागतिक कविता दिन निमित्त 
विषय - (३)काव्य म्हणजे जीवन.     .....सायबर क्राईम           
.            साहितत्य तेज धो



       शब्द झरती काव्यातूनी

सुख दुःख  भावनांचे
वाहती जीवनी ओघळ
जीवन असे कविता
शब्दांनी भरते ओंजळ 

नवरसाने परिपूर्ण 
असे जीवनाचे  काव्य
कधी  खंत  तर मोद 
तरी करावे सदा सुश्राव्य


जीवन असते  गाणे
नसे निरंतर रडणे
निशे  नंतर  उषःकाल
नकोच मनी ते कुढणे

वीर  भक्ती शांत विरह
नवरस  युक्त जीवन
रमावे  आनंदाने सदैव 
घेत   धडे  मनोमन


काव्य मय जीवन जगता
येता भाव मनी दाटूनी
जशी लाट विरते किनारी
शब्द झरती काव्यातूनी

वैशाली वर्तक 
                                  

सायबर क्राईम पेपरात ७\७\२५



       (६)   *माझे लेखन.  \कविता माझी ओळख 
करिते लिखाण मी नेमाने
मज मिळे आत्म समाधान
माझ्या मनीचे भाव उमटे
मानते  मी शारदेचे वरदान

सहज घडते लिखाण 
जसा मिळता  विषय
करुनिया विचार  मंथन
घेते ध्यानी आधीच आशय

कधी लेखणी रंगवी शब्द
प्रबोधन वा जपण्या संस्कृती 
तर कधी महत्त्व  आरोग्याचे
पण लिखाण  ही झालीय प्रवृत्ती 
  

माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
 सुंदर कसे ठेवावे पर्यावरण

मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे

देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची


वैशाली वर्तक
अहमदाबाद

साहित्य लीला १५\५\२५

                                       

     


सिद्ध  साहित्यिक  समूह 
आयोजित 
जागतिक कविता दिना निमित्त 
विषय -- बयो कविते.....

      कविते तव प्रेमात

तूची माझी  खरी सखी
बयो कविते  तू देतसे साथ
गुज मनीचे सांगण्या
धरी लेखणीचा हात

तूच केले मज बोलते
तुझ्या मुळे मी झाले व्यक्त
तुझ्या  विणा शब्द  अधरीचे
राहिले होते ते अव्यक्त

जशी आलीस मम जीवनी 
निसर्ग  मज खुणावे
संगतीत तुझ्या  मी ही
तयासवे हर्षे रमावे

दाविलेस  तू सौंदर्य
संध्या समयी नभाचे
खगांची सुंदर  नक्षी अन्
जलातील  रवी किरणाचे


  कवितेच्या प्रेमात  नकळत
विचार  येती मनात 
डौलते सुमन पाहूनी
ओळी झरती क्षणात

रोजचेच झाले आता
तव  साकारणे सहज
देता शब्द  कुठलाही
 विचाराची नुरते गरज


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


अखिल भारतीय मराठी साहित्य  परिषद मुंंबई प्रदेश वनवी मुंबई जिल्हा
आयोजित 
उपक्रम क्र ७२८
काव्य लेखन
विषय - कविता सुंदरी

 आहेसच ग खरच
तू   कविता सुंदरी
किती  नटविती तुज
अलंकारे खरोखरी

कवी मनी गर्दी जमे
अर्पण्या तुज शब्दालंकार
मन धावे शोधण्या सदैव
 नवनवीन  कल्पना अविष्कार

कधी लाडिक लडिवाळे
तर कधी प्रबोधक वचने
देऊन साज मौलिक
सजवूनी तूजकरवी  कथने

 बसतेस कधी कधी  का ?
रुसूनी अल्लड होऊनी
साथ न देता यमकाची
गंमत पहाते अडूनी

होता साकार तू सुंदरी
लाभे मना समाधान
सादरी करणास तू तयार
शारदेचे लाभो  वरदान

वैशाली वर्तक





भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक
आयोजित उपक्रम क्रमांक ४३
२१\३\२३
*जागतिक कविता दिना निमित्त* 

  विषय...जेव्हा ती  मनात पिंगा घालते
 शीर्षक,,, आणि ती  येते शब्द रूपात

    होते बसले बागेत
   झुळूकेच्या तालावर
    पुष्पे  होती सुंदर डौलत
    भान  मी हरपले क्षणभर

    पुष्पे  कानात सांगती
    बघ ती पिंगा घालते मनी
     रेखाट ना आमचे रुप 
    तव  विचार काव्यातूनी

    मज राहवेना त्या क्षणी
     माळ शब्दांची  गुंफली
    भाव मनीचे झरता
    कविता पहा साकारली 
    
     एक एक सुमनांचे
    दाविले रूप मनोहर
    ओविता शब्दांचा गजरा
    कविता शोभे खरोखर.

     घालता  ती पिंगा मनात
     बसवेना स्वस्थ पळभर
     तिला शब्दभावात सजवता
      ती संतोषते हेच खर
 

वैशाली वर्तक
अहमदाबाद


भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच 🇧🇴
आयोजित उपक्रम
जागतिक कविता दिना निमित्त
विषय ..माझी पहिली  कविता 
 शीर्षक... गर्विता

जपलीय  मनात मी
*माझी पहिली कविता*
अगणिक जरी रचल्या
तीच ठरली *गर्विता*

केले होते वर्णन तयात
माझ्या  बागेतील फुलांचे
एका एका फुलांनी वर्णिले
महत्त्व  आपापले स्वतःचे

लिहीली होती कन्येसाठी
भावली  तिला अतिशय
सहज केली तिने तोंडपाठ
समजून घेऊन आशय

साध्या सोप्या शब्दात 
केली शब्दांची  मांडणी
बालभारती पुस्तकासाठी
आली की, तिजला मागणी

खुष झाले मी  मनातून
पहिली रचिलेली, कविता सहज 
रंगवूनी  भावना  मनीच्या
 गुण गाण्याची नुरली गरज


पहिल्या कवितेची ही कहाणी 
  रचल्या अनेक कविता नंतर
  झाला आनंद उत्सव मनात
  पहिल्या रचनेचा आनंद मनी निरंतर



वैशाली वर्तक 
अहमदाबाद
############################

काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक 782
विषय ..पंख मिळाले शब्दांना 
शीर्षक..  मिळते उभारी लेखणीला 

 मनी  पिंगा घाली शब्द 
 मन गुंगे विचारात 
 माळ मनी विचारांची 
 साकारली लेखनात

 शब्द शब्दास जोडून 
 वाक्ये  अनेक गुंफली
कधी काव्यात गद्यात
शब्दे साहित्यी झरली. 

मन धावे सैरा वैरा
 मिळे गती विचारांना
अंतरात येता लाटा
पंख  फुटती शब्दांना

   खेळ चालतो शब्दांचा
  शब्द येतात धावून 
   यमकी अलंकारिक 
  उचित जागा पाहून 

पंख फुटता शब्दांना
 वेळ काळ प्रसंगात
सदा रमे सारस्वत 
शब्दांच्याची गाभाऱ्यात 


वैशाली वर्तक
 अहमदाबाद




गुरुवार, १८ मार्च, २०२१

फुलांच्याकविता|रातराणी/ मोगरा|गुलाबाची कळी| मोह सुमनांचा|गंध फुलांचा|चाफा



            1   रातराणी

      उभी रातराणी
       किती डौलदार                                    
       सदैव भासते 
       ती बहारदार

         होता सांजवेळ 
         सुरु बहरणे
         सांजच्या दिव्याला 
         तिचे गंधाळणे

           वाढता काळोख
           मंद दरवळ
           झुळुक पसरे
           तिचा परिमळ
                    
           पहा अंगणात
            फुले रातराणी
            जणु गोड गाई
           प्रीतीचीच गाणी

           गंध   दरवळ
          मोहवी मनाला
          मन हे आतुर 
           भेटण्या क्षणाला

            रातराणी सांगे
           झाली सांजवेळ
           नभांगणी  पहा
           चंद्रमाचा खेळ

           पहा  रातराणी
           सावळी गंधात 
           भासे उतरले
           तारे अंगणात

           करि सुगंधित
           पहा  रातराणी
            मज सांगे कशी 
           नीज आता राणी


   2  
अष्टाक्षरी रातराणी

गंधाळली रातराणी**

परसात रातराणी
उभी कशी डौलदार
असो किती दुजी फुले
सदा ती बहारदार

होता सांजवेळ रोज
सुरु होते   बहरणे
तिन्ही  सांजचा दिव्याला
 परिमल गंधाळणे.

जसा वाढतो काळोख
वाढे मंद दरवळ
थंड वा-याची झुळूक
पसरतो परिमळ

आसमंत सुगंधित
केला पहा रातराणी
आता मज सांगे कशी
नीज  गात गोड गाणी

वैशाली वर्तक




   3  मोगरा

               मोगरा*

पानातून डोकावून हसे
टपोरा फुललेला मोगरा
शुभ्र पांढ-या रंगात
पाहून चेहरा होतो हसरा

मोहक  गंधित मोगरा
हसे पाना पानात
गंध दरवळे तयाचा
गंधित आसमंत क्षणार्धात 

रुपे मोहकमोहवतो
हा सुगंधी मोगरा
गंध पसरे  सभोवती
मन होते गुंफण्या  गजरा

नारी नेमाने माळीती
येता जाता  प्रसंगात
मानी सौभाग्याचे वाण
देण्या चैत्री हळदी कुंकुवात

हा सुगंधी मोगरा
हवा सदैव गजरा
मन रहाते प्रसन्न 
पहा वळती नजरा

वैशाली वर्तक


4   सदाफूली


प्रेमाची अक्षरे बालगीत
णकारी
दूर करी सहज मधुमेह 
अशी तुझी ख्याती न्यारी

शोभा वाढविण्या अंगणाची
 नितांत भासे तुझीच गरज
  कमी पाणी असता देखील 
 बहरते तू नेहमी सहज

वैशाली वर्तक
5      गुलाब

काव्स्पंदन राज्य स्तरीय स्पर्धा
विषय- गुलाब 
*स्पर्धेसाठी*

फुले विविध
दिसे बहुरंगी मोहक
तयात चित्तवेधक
गुलाबाचे                       1

फुल गुलाबाचे 
सर्व  फुलात शोभिवंत
गंध दरवळे 
आसमंत                        2

गुलाबाच्या रोपांना
म्हणती जन ताटवे
गाती गोडवे
गुलाबाचे                         3

सर्व  फुलात 
गुलाब दिसे रूपवान
म्हणूनच मान
राजाचा                         4

प्रेमाचे प्रतिक
लाल गुलाब मनोहर
देती प्रेमिक
सुंदर                              5

फुलतो गुलाब
काटेरुपी  संकट असून
देई संदेश 
हसून                            6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





चाराक्षरी
      6  मी गुलाब

मी गुलाब
माझा दिन
नसतो मी
कधी क्षीण


रंग  माझा
नसे एक
लाल श्वेत
ते अनेक

रुपाने मी
  समर्पक
गंध माझा
आकर्षक

सुगंधात
गुणवंत
दरवळे
आसमंत


कधी लाल
रंगी वसे
गणेशाला
प्रिय असे

राजा असे
मी फुलांचा
नेहरूंचा
तो लाडाचा


सर्व  फुले
देती मान
राजा मीच
माझी शान

वैशाली वर्तक
येथे फेब्रुवारी १६, २०२० 


7
प्रजित साहित्यिक  समुह
अष्टाक्षरी काव्य रचना
विषय - गुलाबाची कळी
  
किती सुंदर   टपोरी
रसरसलेली कळी
पहाताच चित्त वेधी
 असे गुलाब  पाकळी

      
झाले हर्षित अंगणी
कळी फुलली लाजत
काल होती बंद कळी
पाही मजला हासत


श्वेत तांबूस गुलाबी
 रंग भासती मोहक 
फुल शोभिवंत असे
सदा चित्तास वेधक


फिरविले बोट हळू
किती मऊ कोमलता  
एक एक पाकळीत
वसे रम्य सुंदरता

काय जादू निसर्गाची
घट्ट पाकळ्या मिटल्या
म्हणतसे तिला कळी
होता उषा उमलल्या


वैशाली वर्तक 
अहमदाबाद




8

प्रज्ञा महिला मंच
विषय - मोह सुमनांचा (अष्टाक्षरी)
       आवडे पुष्प

प्रसन्नता  मिळे जीवा
पाहताच सुमनाला
सुगंधित आसमंत
उमलत्या त्या क्षणाला      1

 मोह आवरेना कधी   
रंग तयाचे मोहक
मन धावे सदाकाळ
पुष्पे चित्ताला वेधक     2


म्हणूनच देती पुष्पे   
करण्यास आनंदित 
पाहुनिया  सुमनांना
होई रूग्ण प्रफुल्लित     3

दोन फुलले गुलाब
छान टपोरे  अंगणी
   मन मोहवे माळण्या  रो
वाहु का? देवा चरणी     4

उगा नाही पसंतीस
भावे    कमळ लक्ष्मीला 
 रंगे रुपाने मोहक
मोह सुमनांचा तिला

सुगंधीत मोग-याचा
मोह पाडतो गजरा
माळताच पहा कशा
 वळताती त्या नजरा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद
9
षडाक्षरी 
गुलाब दिवस 



गुलाब दिवस 
दिन असे खास
प्रेम व्यक्त होई 
देता हमखास

फुले ती अनेक
गुलाब मोहक
फुले बहुरंगी
तो चित्त वेधक

फुल गुलाबाचे 
असे शोभिवंत
 तयाच्या सुगंधे
खुले आसमंत

गुलाब रोपाचे
असती ताटवे
 राजा गुलाबाचे
गातात गोडवे

सगळ्या फूलात
तोची रुपवान
मिळतो राजाचा
गुलाबास मान          

फूल गुलाबाचे
प्रेमाचे प्रतिक
दिसे मनोहर
अर्पीती प्रेमिक

फुलतो गुलाब
काट्यात असून
देतसे संदेश 
सदैव हसून


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 


10
अ  भा  म सा प समूह02 
उपक्रम
चित्र  काव्य 
*गुलाब   वर्णन*

उगीचच  नव्हे तुजला मान 
फुलांचा राजा म्हणून 
हृदयात भरतो परिमल अन्
उमलतोस  अनेक रंगातून

काय  मोहक रंग रुप तव
किती रे तुज रुपाचा ठेवा
गुलाबी रंगात  तर 
सौंदर्याला  पण वाटे तुझा हेवा

विविधता  दावी रंगाची 
अग्रस्थानी  सौंदर्यात 
पाकळ्या नाजूक   सुगंधी 
भासे वदती  सुप्रभात

रुप तव मनोहर सुंदर  
पहाताच मन होई प्रफुल्लित
परिमलाने गंधित आसमंत
करितो सकाळ उल्हासित

काय ऐटदार रुबाब तुझा
सहज भाळतात  जन तव रूपास
रंगात तर आहेचा बहारदार 
म्हणूनच काया राखतो काटे रक्षणास 



वैशाली वर्तक
,

11
कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम क्रमांक 550
विषय.  गंध फुलांचा
          
अर्पण  करण्या देवा चरणी               
गंध गुलाबाचा सांगू  पाहे                    
सदैव मी लावितो हजरी                   
सौंदर्यात माझ्या  ऐट आहे                  

फुलला टपोरा मोगरा 
दिसतोय किती छान
गंध दरवळे आसमंतात
हरपते सा-यांचे भान

चाफ्याच्या सुगंधाने
प्रसन्न  केले वातावरण
अलगद घेता  हाती तयांना
गंधित झाले  पर्यावरण 

रातराणीचा तो गंध
मंद हवेत दरवळत होता
आज विसावलो त्याच गंधात
गंध फुलांचा सांगत होता



वैशाली वर्तक
अहमदाबाद

12
मुक्ताई फाउंडेशन जागतिक साहित्य मंच या चोपडा जळगाव
आयोजित उपक्रम
काव्यलेखन
विषय .. मधुमालती

अंगणी उभी मधुमालती
दिसे किती कमनीय
हरित पर्णांनी बहरली
भासे सदाची विलोभनीय.

सुमने फुलली गुच्छात
श्वेत  लाल  रंगात फांदीवर
सुगंध दरवळे आसमंती
आनंद देई  रात्र भर

रुप सुमनाचे असे सुंदर
पाच दलात फुले शोभती
येता वा-याची झुळुक
फांदीवर पुष्पे  डुलती


मोहक वेणी सम गुंफणे
लांब देठ असता सुमनास
सुंदर मोहक गजरा तयार
नारींसाठी मिळण्यास

वैशाली वर्तक
अहमदाबाद

13
ओळ काव्य
विषय -- अंगणी चाफा दरवळला

लागता चाहुल वसंताची
नानाविधी फुले फुलली
*अंगणी दरवळला चाफा*
सारी सृष्टी पहा बहरली

हिरव्या पानातूनी डोकवी
फुले चाफ्याची हळुवार 
शुभ्र फुले हरित पाने
वा-यासंगे डोले अलवार

घनदाट झाड चाफ्याचे
अंगणी उभे डौलदार 
करि गंधित आसमंत सारा
सदा बहरे पहा शानदार

हिरव्या चाफ्याच्या गंधाने
प्रसन्न होई वातावरण
अलगद घेता हाती तयांना
गंधित करि पर्यावरण

किती होती फुले पुजेस्तव
पण सोन चाफा दिसे सुंदर 
मोग-या शेवंती सम तयाचे
गंधित रुप भासे मनोहर


वैशाली वर्तक 
अहमदाबाद



















मुक्ताई जागतिक साहित्य मंच आयोजित उपक्रम
 चित्र काव्यलेखन   पारिजातक 
*शिकवण प्राजक्ताची*


टपोरे शुभ्र प्राजक्त
फुलले मम अंगणी
किती मोहक रूपाने 
पाहता आनंद  मनी

देठ शोभते केसरी
शुभ्र पाकळ्या मोहक
 पडे  सहज भुवरी
सडा चित्ताला वेधक.

गर्द हरित पर्णात
शोभे प्राजक्त सुंदर
सडा पाहुनिया वाटे
वेचूया ओंजळभर 

अल्प काळाचे आयुष्य
आनंद देणे दुसऱ्यास
घ्यावी शिकवण त्याची
उपयोगी जगण्यास

वेचली प्राजक्त फुले
अर्पिली श्रीहरी चरणी
  दिसे शोभिवंत देवा-ही
आनंदात मनोमनी

वैशाली वर्तक
अहमदाबाद


अभा म प सा ठाणे जिल्ला 2
आयोजित 
उपक्रम 
विषय - रंग

     किमया  निसर्गाची.    विविध फुले 

निसर्गाची पहा किमया
फुले फुलली विविध रंगात
लाल पिवळी श्वेत निळी
 तितकीच   असे नाना गंधात


फुलांचा राजा गुलाब
रंगे, रुपे, गंधे, रुबाबदार
फुलतो विविध  मोहक  रंगात
 पहा त्याची ऐट शानदार


फुलला   मोगरा  श्वेतरंगी
माळिता तयाचा  गजरा
 गंधे चित्ताला वेधक
  सहजची  वळती नजरा

 चाफा  शेवंती  कह्णेरी
असती  विविध रंगात
असे मान तयांचा खास
खुलून दिसती गंध रूपात


  रंगात बकुळी रातराणी 
 जरी पडती   जरा मागे
सुगंधात आसती वरचढ
 आठवणींचे विणती धागे


सारी किमया विश्वंभराची
केवढी केली सृष्टी  तयार
आहे का तया निर्मीतीची भ्रांत
 पण सुख दिधले आपणा अपार


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

                              वर्ल्ड व्हिजन टाईम्स मध्ये प्रकाशित 
                                                                             
                                                                          

भा म सा  परिषद समूह 2
विषय -- फुलांचा सुगंध

*गंध फुलांचा सांगून गेला*
          
अर्पण  करण्या देवा चरणी               
गंध गुलाबाचा सांगू  पाहे                    
सदैव मी लावितो हजरी                   
सौंदर्यात माझ्या  ऐट आहे                  

फुलला टपोरा मोगरा 
दिसतोय किती छान
गंध दरवळे आसमंतात
हरपते सा-यांचे भान

चाफ्याच्या सुगंधाने
प्रसन्न  केले वातावरण
अलगद घेता  हाती तयांना
गंधित झाले  पर्यावरण 

रातराणीचा तो गंध
मंद हवेत दरवळत होता
आज विसावलो त्याच गंधात
गंध फुलांचा सांगत होता

अशी सारीच सुमने
आली एकानंतर एक
वर्णिले आपापले महत्त्व 
सा -या सृष्टीत फुले कित्येक 


अशी सारीच सुमने
आली एकानंतर एक
वर्णिले आपापले महत्त्व 
सा -या सृष्टीत फुले कित्येक 




वैशाली वर्तक







भा म सा  परिषद समूह 2
विषय -- फुलांचा सुगंध

*गंध फुलांचा सांगून गेला*
          
अर्पण  करण्या देवा चरणी               
गंध गुलाबाचा सांगू  पाहे                    
सदैव मी लावितो हजरी                   
सौंदर्यात माझ्या  ऐट आहे                  

फुलला टपोरा मोगरा 
दिसतोय किती छान
गंध दरवळे आसमंतात
हरपते सा-यांचे भान

चाफ्याच्या सुगंधाने
प्रसन्न  केले वातावरण
अलगद घेता  हाती तयांना
गंधित झाले  पर्यावरण 

रातराणीचा तो गंध
मंद हवेत दरवळत होता
आज विसावलो त्याच गंधात
गंध फुलांचा सांगत होता

अशी सारीच सुमने
आली एकानंतर एक
वर्णिले आपापले महत्त्व 
सा -या सृष्टीत फुले कित्येक 


वैशाली वर्तक







Borderless panthers 

शनिवार कवितेचा
विषय चित्र काव्य 
     *जास्वंद*
जास्वंदीचे फूल पहा
किती दिसते  मोहक
श्वेत लाल गुलाबी पीत
रंगी चित्ताला वेधक

किती पाकळ्या तलम
मधे पराग डौलदार
शोभनीय  पुष्पदलावर
दवबिंदू  चमकदार 

पहा किमया निसर्गाची
लाल रंगी छटा सुंदर 
जास्वंद फूलाची शोभा
भासे फार मनोहर

फुल लाल जास्वंदी 
असे फार गुणकारी 
कुंतलाची निगा राखण्या
आहे  उपयोगी भारी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




उपक्रम - ओळ काव्य
विषय -- अंगणी चाफा दरवळला

लागता चाहुल वसंताची
नानाविधी फुले फुलली
*अंगणी दरवळला चाफा*
सारी सृष्टी पहा बहरली

हिरव्या पानातूनी डोकवी
फुले चाफ्याची हळुवार 
शुभ्र फुले हरित पाने
वा-यासंगे डोले अलवार

घनदाट झाड चाफ्याचे
अंगणी उभे डौलदार 
करि गंधित आसमंत सारा
सदा बहरे पहा शानदार

हिरव्या चाफ्याच्या गंधाने
प्रसन्न होई वातावरण
अलगद घेता हाती तयांना
गंधित करि पर्यावरण

किती होती फुले पुजेस्तव
पण सोन चाफा दिसे सुंदर 
मोग-या शेवंती सम तयाचे
गंधित रुप भासे मनोहर


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गंध फुलांचा सांगून गेला*
          
अर्पण  करण्या देवा चरणी               
गंध गुलाबाचा सांगू  पाहे   
ऋतुची मला न गरज
 अन् सौंदर्यात माझ्या  ऐट आहे  .           

सदैव मी लावितो हजरी                   
रूप निहाळा  विविध  रंगात  
लाल पित सफेद गुलाबी
मान राजाचा आहै फुलात

फुलला टपोरा मोगरा 
दिसतोय किती छान
गंध दरवळे आसमंतात
हरपते सा-यांचे भान.

चाफ्याच्या सुगंधाने
प्रसन्न  केले वातावरण
अलगद घेता  हाती तयांना
गंधित झाले  पर्यावरण .

रातराणीचा तो गंध
मंद हवेत दरवळत होता
आज विसावलो त्याच गंधात
गंध फुलांचा सांगत होता.

अशी सारीच सुमने
आली एकानंतर एक
वर्णिले आपापले महत्त्व 
सा -या सृष्टीत फुले कित्येक 





सोमवार, १५ मार्च, २०२१

संस्कार तिचे संस्कार दशाक्षरी

शब्दसेतू साहित्य  मंच
रविवारीय  स्पर्धेसाठी
साहित्यप्रकार  -- दशाक्षरी  काव्य  लेखन

विषय -- तिचे संस्कार 


संस्कार 


असे मन  मातीचाच गोळा
 माता करीते  सदा चिंतन                    
जीव प्राण तिच्या उदरात
 मनी सद्विचारांचे मंथन


गर्भातून  करी ती संस्कार 
करी सदा सात्त्विक  विचार
जन्म  देऊनीया अर्भकास
माता होते त्याची शिल्पकार 


  संस्काराच्या बळावर पाल्य
    घडवी भवितव्य   उज्वल
मिळवितो किर्ती जीवनात      
   हेची  गुढ खरेची प्रांजल


  देई कुंभार  जसे मातीला
  प्रेमभावे देऊन आकार
देत असताना  मनाजोगा
घटास करितो तो साकार
 

 करीतात शाळेत शिक्षक 
 तीच संस्काराची उजळणी
सदा जीवनात उपयोगी 
राहती कायम आठवणी


मानवी जीवनी  आहे असे
संस्काराचे तयात महत्त्व 
होउनिया सदाची यशस्वी
मिळवितो जगी तो श्रेष्ठत्व


वैशाली वर्तक..

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...