रविवार, २८ मार्च, २०२१

चित्र काव्य मानवाचा लोभ

सप्ताहिक रविवारीय  साहित्य 
लेखन स्पर्धा क्रमांक 38
साहित्य  प्रकार -- चित्र  काव्य    
      *मानवाचा लोभ*
मानवाचा लोभ
झळा ऊन्हाच्या साहूनी
धरा दिसते भकास 
दिसे   कोठेच न हिरवे
मन होतसे उदास 

 -हास करतो वनांचा
झाडे तोडून   कापून
प्राणी मात्र कोठे जाणार
पक्षी गण गेले त्रासून

नाही राहिला निवारा
वृक्षांची ती छत्र छाया
कुठे मिळणार तयांना
सावलीची प्रेमळ माया

पर्ण घेऊनी चोचीत
कष्टी पक्षीण दीनवाणी
देते सावली पिलांना 
वाहे डोळ्यातून पाणी.

स्वतःच आरंभिलास घात
तोडून सृष्टीचा प्रेम पाश
 उपयोग  काय आता
केला सृष्टी चा सर्व नाश

प्रगतीच्या गोड नावे
मानवाचा अती लोभ
ओढाविला निसर्ग  कोप
थांबव  मानवा हा क्षोभ


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
28/3/21

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...