अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित षडाक्षरी काव्य लेखन
स्पर्धा
क्रमांक 6
विषय -- *आता बस झाले*
*नको गुणगान*
नको एक दिन
कौतुकाचे गान
रोज लिहा बोला
वाढवण्या शान
माय-बोलीनेच
जपली संस्कृती
ठेवा तिची जाण
वाढवुया किर्ती
तिच्या अस्तित्वाची
ठेवा भ्रांत मनी
*आता बस झाले*
विचारु या क्षणी
ती समृद्धतेत
आहेचिया खाण
साहित्यात नसे
कुठलीच वाण
तिच्या बळावर
मिळविता मान
जगतात करु
तिचाच सन्मान
सुवर्णाचा दिन
रोजची आणुया
*बस झाले आता*
शिखरी नेऊया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा