अ भा म सा प डोंबिवली शाखा आयोजित
रंग उधळूया आनंदाचे स्पर्धा
स्पर्धेसाठी
रंग उधळूया आनंदाचे
*आयुष्य सप्तरंगी*
जीवन करण्या सप्तरंगी
करा उधळण रंगाची
जगुया आनंदी स्वच्छंदाने
गाऊया गाणी आनंदाची
रंगची देती मोद जीवा
पहाताची मन होते दंग
किती मोहक दिसतात
एकाहून एक सुंदर रंग
सृष्टी ने केली उधळण
येताच हा ऋतू वसंत
नानारंगी फुले फुलवून
फूले फुलवण्या नसे उसंत
सूर्य येता प्रभाती नभी
दिसे छटा केशरी रंगाची
होतो आनंद जन मनाला
पाहू रंग उधळण निसर्गाची
मिळाला जन्म मानवाचा
करु सोने आयुष्याचे
कशाला खंत निराशा मनीं
रंग उधळूया आनंदाचे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
26/3/2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा