मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

स्फुट लेखन

अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित 
  उपक्रम  स्फूट विचार  लेखन  
विषय -- परिवर्तन

परिवर्तन 

 एका नंतर एक ऋतू  येती.. परिवर्तन  हा तर नियम सृष्टीचा. काळानुसार  आपण ही करावा बदल विचारांचा , पहाण्याचा दृष्टी  कोनाचा!
आठवा कविता केशवसुतांची
         जुने जाऊद्या मरणा लागुनी
          जाळून किंवा पुरुनी टाका
          सडतन ऐका ठायी ठाका
          सावध ऐका पुढल्या हाका.
      खरच बदलत्या काळानुसार विचारांचे  परिवर्तन  होणे गरजेच आहे. जुन्या  चालीरीतीत  केलेले परिवर्तन  म्हणजे स्रीशिक्षण ...उंच  माझा  झोका मालिकेत
रमाबाई रानडे यांचे  परिवर्तनशील विचार .. तसेच सध्याचे मुली ला पण समानतेची वागणूक.. हे सारे विचारच  परिवर्तन घडवू शकतील. एका पीढीने दुस-या पिढीकडे पहाण्याचा विचाराचा बदल हेच परिवर्तन .

वैशाली वर्तक  
शब्द 72

स्फुट लेखन 
विषय 
*मुलगा मुलगी असमानता*

  अरे काय ? पुन्हा  मुलगी..?
  म्हणजे वंशाचा दिवा नाहीच  !
  हे विचार अजून समाजात मुरलेलेच आहेत. त्यांना मुळासकट मनातून उपटले    पाहिजेत . अजून ही समाजाची मानसिकता जुन्याच रुढी रिवाजात जगतेय. ती
जेव्हा जाईल तेव्हा ही असमानता जाईल .व त्यासाठी स्त्रीया  अजूनही शिक्षीत
नुसत्या शिक्षीत म्हणजे पुस्तकी  नाही तर, मानासिक तेने बदलल्या पाहिजेत तरच असमानता जाईल. स्त्रीयांना कर्तृत्वाची जाण आहेच. 
शब्द संख्या 56

वैशाली वर्तक
1/2/2021

सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

भित्रट ससा

अ .भा म सा प समूह 2 
उपक्रम 85 
चित्र काव्य *भित्रा ससा*
 1/2/2021 
 घाबरुन जातो क्षणात 
इतका तू भित्रट कसा 
जरा पान पडताच सश्या
 बिचकून जातो असा 

 मऊ मऊ अंग तुझे 
 शुभ्र कापसाचे गोळे 
रूप तुझे सदा आवडे
 लाल चुटुक त्यात डोळे

 मारतो टुण टुण उड्या 
हिरव्या गार गवतात 
जरा खुट्ट् आवाज होता 
पळ काढतो क्षणार्धात 

 कान सतत टकवारुन 
घेत असतो तू चाहुल 
कोणी येत आहे कळताच 
काढतो तेथून पाऊल 

 तुला तुझ्या चपळतेचा
 झाला होता गर्व एकदा
 पण शिकवण मिळाली आम्हा ! 
गर्व नसे हो चांगला कदा ..

.......वैशाली वर्तक अहमदाबाद 1/2/2021

रविवार, ३१ जानेवारी, २०२१

गीत.....रातराणी कोमेजली / रातराणी अष्टाक्षरी

रातराणी कोमेजली**

  मने  जुळूनी आपुली , वेडी मी कुठे फसली
  माझे मलाच कळेना , प्रीत अशी का रुसली     ।।   धृवपद

       दिली  घेतली मिळूनी वचने ती उमजूनी
      चंद्र  असता नभात, चांदण्यात त्या रमूनी
       रातराणी हळुवार  लाजतच बहरली
      माझे मलाच कळेना , प्रीत अशी का रुसली         1

      लाट जशी सागराची,वाट पाही किना-याची
       ओढ तुझ्या त्याभेटीची भासे सदा सहा-याची
       तुझ्या येण्याची अजुनी ,आस सखया लागली
       माझे मलाच कळेना प्रीत अशी का रुसली     ....      2

       किती दावलीस स्वप्ने सख्या भाबड्या मनाला
       उगा दिधले बहाणे  भेटण्यास न येण्याला
      नको मज दावू आता रातराणी कोमेजली
       माझे मलाच कळेना प्रीत आशी का रुसली...     3


वैशाली वर्तक. 

अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित उपक्रम 
स्पर्धेसाठी अष्टाक्षरी रचना
**गंधाळली रातराणी**

परसात रातराणी
उभी कशी डौलदार
असो किती दुजी फुले
सदा ती बहारदार

होता सांजवेळ रोज
सुरु होते   बहरणे
तिन्ही  सांजचा दिव्याला
 परिमल गंधाळणे.

जसा वाढतो काळोख
वाढे मंद दरवळ
थंड वा-याची झुळूक
पसरतो परिमळ

आसमंत सुगंधित
केला पहा रातराणी
आता मज सांगे कशी
नीज  गात गोड गाणी

वैशाली वर्तक

शनिवार, ३० जानेवारी, २०२१

अष्टाक्षरी...मावळत्या दिनकरा

काव्य स्पंदन 02 राज्यस्तरा 
उपक्रम अष्टाक्षरी
विषय -- मावळत्या दिनकरा

दिनभर  प्रकाशूनी
सूर्य  निघाला अस्ताला
क्षणभर घे विश्रांती 
सृष्टी  सांगे आदित्याला

जाता जाता दिनकरे
रंगविले नभांगण
जशी सकाळी   प्राचीला
केशराची उधळण

दाही दिशा  हळदीच्या
संधी प्रकाशे धुंदल्या
मंद थंड पवनाने
तप्त झळा निवळल्या

गाई चालल्या गोठ्यात
नभी मोहक ती नक्षी
दिनकर मावळता
परताती सारे पक्षी

अर्ध्यदान देती जन 
दोन्ही करांना जोडून 
 सांजवात वृंदावनी
माय नित्याने लावून

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

अभंग अधीर

अधीर  झाले मी ! तव दर्शनास  
मनी एक ध्यास ! सदासाठी             1

मुखी नाम घेते ! करिते रटण
दाखव चरण! तूची आता                 2

कसे आले दिन ! गाठ भेट नाही 
मन वाट पाही  ! भेटण्याची              3

आप्त जना साठी ! जीव हा तुटतो
धीर हा सुटतो  !सदाकाळ                 4

 काय वेळ आली! कशी महामारी !
 कोण आम्हा तारी !तुजवीण              5

 कसा राखू धीर  !  मन  हे अधीर
 जरी मी सुधीर !   ठेवूकैसे               6

करीती प्रयास ! जरी सारे जन
निराशले मन! सकळांचे  !                    7


मन हे अधीर !ये ना उध्दाराया  !
तूच रामराया ! जगताला      !!            8    



वैशाली वर्तक

साथ देवाची

शब्दरजनी साहित्य  समूह 
विषय --- साथ


साथ तुझी असेल तर
नसे जगी काही अशक्य
फक्त तू हवा पाठीशी
 मला होईल सारे शक्य

येवोत कितीही संकटे
होणार नाही मी भयभीत
यश मिळणार मला खचित
विश्वासाने राहीन उल्हासित

तुझ्यावरचा दृढ विश्वास
देतो मनी सदा प्रेरणा
अपयशाला नसे थारा
तूची देतो मनाला चेतना

येवो किती महामारी
सर्व होऊनी आत्म निर्भय
तूझी साथ तर असणारच
नाही आम्हाला कशाचे भय

साथ तुझी असेल तर
 भय चिंता नुरते उरी
कठीण न वाटे मनी
कितीही आपत्ती आली तरी

म्हणती जन तुझ्या कृपेने
पंगु पण सहज चढे गिरी
साथ तुझी असेल तर
जीवन नौका नेशील पैल तीरी

काय सांगू देवा तुजला
तूची आमुचा कर्ता करविता
साथ तुझी सदैव राहो
शरण तुजला भगवंता

वैशाली वर्तक

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

स्फुट लेखन ,.,,,,, रुसवा फुगवा

रुसवा फुगवा
  रुसवा फुगवा ही सर्व  सामान्य  मानसिक स्वभावाची वृत्ती .लकब .! 
  ती मानवातच आढळते असे नव्हे..तर पशु पक्षात पण,... दिसते. ....!  
आणि अगदी देव देवता पासून ती दृष्टीत ., पहाण्यात आलेली आहे. 
बालपणी हटृ पुरे  करुन घेताना दिसते. रुसून   फुगून बसता हवी ती गोष्ट प्राप्त  करण्याचा जालीम उपाय असतो. तसे तर रुसणे -फूगणे तरुण पणात तर पदोपदी चालते. व त्या रुसण्याच्या मोहक लाडिक अदेवर  खुश होऊन रुसव्याचा फुगवा होण्याची वेळ पण कितीदा येत नाही. तर रूसवा फुगवा यात गोडवा असे पर्यत मजा असते. नाहीतर पुढे  वाद विवाद होतो. .



वैशाली वर्तक

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...