उपक्रम 85
चित्र काव्य
*भित्रा ससा*
1/2/2021
घाबरुन जातो क्षणात
इतका तू भित्रट कसा
जरा पान पडताच सश्या
बिचकून जातो असा
मऊ मऊ अंग तुझे
शुभ्र कापसाचे गोळे
रूप तुझे सदा आवडे
लाल चुटुक त्यात डोळे
मारतो टुण टुण उड्या
हिरव्या गार गवतात
जरा खुट्ट् आवाज होता
पळ काढतो क्षणार्धात
कान सतत टकवारुन
घेत असतो तू चाहुल
कोणी येत आहे कळताच
काढतो तेथून पाऊल
तुला तुझ्या चपळतेचा
झाला होता गर्व एकदा
पण शिकवण मिळाली आम्हा !
गर्व नसे हो चांगला कदा
..
.......वैशाली वर्तक
अहमदाबाद 1/2/2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा