रातराणी कोमेजली**
मने जुळूनी आपुली , वेडी मी कुठे फसली
माझे मलाच कळेना , प्रीत अशी का रुसली ।। धृवपद
दिली घेतली मिळूनी वचने ती उमजूनी
चंद्र असता नभात, चांदण्यात त्या रमूनी
रातराणी हळुवार लाजतच बहरली
माझे मलाच कळेना , प्रीत अशी का रुसली 1
लाट जशी सागराची,वाट पाही किना-याची
ओढ तुझ्या त्याभेटीची भासे सदा सहा-याची
तुझ्या येण्याची अजुनी ,आस सखया लागली
माझे मलाच कळेना प्रीत अशी का रुसली .... 2
किती दावलीस स्वप्ने सख्या भाबड्या मनाला
उगा दिधले बहाणे भेटण्यास न येण्याला
नको मज दावू आता रातराणी कोमेजली
माझे मलाच कळेना प्रीत आशी का रुसली... 3
वैशाली वर्तक.
अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित उपक्रम
स्पर्धेसाठी अष्टाक्षरी रचना
**गंधाळली रातराणी**
परसात रातराणी
उभी कशी डौलदार
असो किती दुजी फुले
सदा ती बहारदार
होता सांजवेळ रोज
सुरु होते बहरणे
तिन्ही सांजचा दिव्याला
परिमल गंधाळणे.
जसा वाढतो काळोख
वाढे मंद दरवळ
थंड वा-याची झुळूक
पसरतो परिमळ
आसमंत सुगंधित
केला पहा रातराणी
आता मज सांगे कशी
नीज गात गोड गाणी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा