काव्य स्पंदन 02 राज्यस्तरा
उपक्रम अष्टाक्षरी
विषय -- मावळत्या दिनकरा
दिनभर प्रकाशूनी
सूर्य निघाला अस्ताला
क्षणभर घे विश्रांती
सृष्टी सांगे आदित्याला
जाता जाता दिनकरे
रंगविले नभांगण
जशी सकाळी प्राचीला
केशराची उधळण
दाही दिशा हळदीच्या
संधी प्रकाशे धुंदल्या
मंद थंड पवनाने
तप्त झळा निवळल्या
गाई चालल्या गोठ्यात
नभी मोहक ती नक्षी
दिनकर मावळता
परताती सारे पक्षी
अर्ध्यदान देती जन
दोन्ही करांना जोडून
सांजवात वृंदावनी
माय नित्याने लावून
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा