सोमवार, ११ जानेवारी, २०२१

ललित लेख चित्रावरुन

सुंदर  डोंगर माथा  पहा  कसा सर्वत्र सजला आहे  हिरवा गार....वर्षा धारा बरसता धरेवर   झालाय  धरेचा एकच रंग...  भेटता धरेला तिचा प्रियकर  पर्जन्य ... धरा अंकुरली....  .....रानफुले पण डौलूनी हसती सभोवताली . छोट्या रोपांना पण एक वेगळेच तेज तरारले .  हिरव्या पोपटी रंगात  रान माळ हिरवळले. डोंगर उता-यावर वृक्ष डौलात उभी. जणु तट रक्षणास  उभी असलेले सज्ज  सैनिकच
      नील नभी मेघ दाटून आले ...मेघातून आदित्य मधेच  डोकावून पहात आहे. त्याची किरणे रानामाळावर पडल्याने ती सोनसळी रुपात चमकत आहेत. भासत आहे .....जणु रवीच धरेचे फोटो घेतोय की काय ...असा मधूनच प्रकाशाचा झोत येत आहे.  
      खरच निसर्गाचीच ही सारी अद्भूत किमया आहे. वर नीळे 
मेघांनी दाटलेले अंबर....मधून गाणे गात हुंदडणारा वारा...व त्याच्या तालावर पानांची  सळसळ ..ती वेगळेच गीत गात आहेत वा जणू टाळ्या वाजवून साथ देत आहेत. 
खरच निसर्गा तूच खरा चित्रकार आहे . व 
हे पाहून सहज गाण्याच्या ओळी ओठी येतात
   निळे निळे अंबर वरती
  मेघांची स्वारी जाई तयातूनी
    दाही दिशा उजळल्या रवीने
      कोणी हास्य भरले या फुला फुलातूनी
        
वैशाली वर्तक

मोबाईल शाप की वरदान

मोबाईल शाप की वरदान

      अरे  ! काय हा त्रास ... दोन घास सुखाने  खाऊ पण देत नाही. आताच्या आता 
तीस-यांदा जेवतांना उठत आहे. 
 हं हलो ....कोण ..good after noon ...
..हा s हा 
क्या काम  है बोलो....
कौनसी बँक  ...अरे बाबा नही नही ...काही  investment नाही करायची
आधीच पेंनशनर .
फोन कट करुन टाकला.
 ह्या फोनचा मोबाईलचा कंटाळ आला.उठ सुट .. नव्या स्कीम  वा आणखीन  काही ..
   कुठून मिळतात यांना नं . 
     अशी स्थिती झालीय या मोबाईलची. 
तेवढ्यात मैत्रिणी चा फोन आला .... घेतला व इतक्या गप्पा रंगल्या ... ब-याच नव्या 
खुशखबरी कळल्या .. रविवारी कुठे भेटायचे  ते ठरले. मान वाकडी करत व  खांद्याच्या आधाराने बेसनशी जाऊन तोंड धूवून तोंड साफ केले. मग जरा आडवी होते तर आईचा फोन मग काय ....माहेरच घरी आल वा माहेरात गेल्याचा आनंद मिळवत   ....दहादा उठून बसत ...एकदा या हातात तर एकदा त्या हातात करत फोन चालूच  ..तेव्हा जराही कंटाळा नाही ...तर असे आहे या मोबाईलचे.
           तस पाहिले तर कामाचा ....वरदान रूपच आहे. घर बसल्या whatsapp
 मधून थेट हजारो मैल दूर असलेल्या लेकी सुनांच्या थेट कीचन मधे जाऊन येतो. आपण  तर  मघेच छोट्या नातवंडाचे खेळ ..प्रगती.. त्यांचे सोहळे.. सर्व  कार्यक्रम  घर बसल्या पाहू शकतो. त्यामुळे आप्तजन कितीही दूर असले तरी सहज  मनी येईल तेव्हा भेट घेऊ शकतो. मग वरदानच आहे ना!
    या लाॕकडाऊनच्या काळात तर मेंदी लावणे पासूनसारे..  सारे लग्न विधी हजारो मैल दूरच्या कार्यक्रमात   लोक सहभागी  झालेत व आनंद लुटला. 
  आपणही  साहित्यिकांनी  किती कार्यक्रम  प्रत्यक्ष  सहभागी  झाल्या सारखे  अनुभवले. व सहभागी  झालो. 
      आता मोबाईल  शाप वाटणे कधी तरी शक्य आहे ... पण ...जशी चांगली  बाजु तशी वाईट असतेच ना. मुले सतत त्यावर गेम खेळतात... ज्या मुळे डोळ्यास विकार ...मैदानी खेळ न खेळल्याने शरीरास कसरत नाही  व शाररिक  हानी...
माणुस सतत मोबाईल मधे व्यस्त त्यामुळे  घरात , बाहेर संवाद साधत नाहीत..  एकल कोंडा बनत आहे. ...आई बाबांशी बोलण्यात वेळ न देणे... 
     या सा-या वाईट बाजु नक्कीच  ...पण देवने मेंदु बहाल केला आहे तर किती मोबाईल वापराचा याचा विचार  पण केलाच पाहिजे ,....मुलांना शिस्त ता लावली पाहिजे.. 
    आपण रोग बरे करण्यास औषधे घेतो. तेव्हा डाॕ. औषधे देतात त्या औषधांनी आपण बरे होतो. तेव्हा त्या औषधात , काही औषधे फार  strong असल्याने डाॕ  त्या औषधांचा side effect नको म्हणून जोडीस दुसरे औषध देतातच ना.! तेव्हा औषध  किती strong तरी  घेतोच ना  का औषध टाळतो. 
     तसे आहे .... चांगल्या बरोबर  काय वाईट याचा विचार  करतच मोबाईलचा वापर केला तर   वरदानच ठरेल


वैशाली वर्तक.

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

पानगळ

शब्दरजनी साहित्य  समुह
कमळविश्व  राज्य स्तर  स्पर्धा  समूह आयोजित 
राज्य स्तरीय  मासिक काव्य लेखन स्पर्धा 
 कमळविश्व राज्यस्तर स्पर्धेसाठी 
विषय -- पानगळ

    शीर्षक -  *नियम सृष्टीचा*
   
    येते ऐकू एका वेळी
    सळसळ ही पानांची
    सुरु होता  *पानगळ* 
    शोभा जाते त्या वृक्षाची 

   होता पाने ती पिवळी
   जागा करी  हिरव्यास
   नियमच तो सृष्टीचा     
   होत नाहीत उदास      

  घेत गिरक्या  पडते
  पान  पिवळे भु -वरी
  मिसळूनी मातीतूनी
  खतासाठी काम करी      

   सहा ऋतूंचे सोहळे 
  अपूर्वाई निसर्गाची
   वर्षा दावी हिरवाई 
   सृष्टीवर तारुण्याची..

   शरदात पानगळ 
   निस्तेजता वृक्षावरी      
   पाचोळ्याचा पसा-याने                                      
   पीत रंग भुभीवरी

   येतो वसंत डौलाने        
   संपतेच मरगळ
   बहरती वृक्ष पुन्हा 
   विसरुनी पानगळ   

    

       ........  वैशाली वर्तक
अहमदाबाद  7/1/2021



पानगळ

निसर्गच शिकवतो
कसे  जगायचे हसत
येतो पानगळ नंतरच
 ऋतू बहरण्या वसंत

देत जागा हरित पर्णा
 निखळे पिवळे पान
 मनी  असे प्रबळ आशा
पुन्हा नव्याने बहरीन छान

 सोडता फांदी न खंत मनी
घेते पर्ण गिरकी मजेत 
 जीवन चक्र चालणार
हजर होऊ नव्याने सेवेत

 असे सार जीवनाचे
 मानवाने घ्यावं ध्यानात
ओलाव्यात बहरायचे
जीवन मंत्र सदा मनात

वैशाली वर्तक
 अहमदाबाद
    
       .

क्षणभर थांब/ घे मना क्षणभर विश्रांती

काव्य स्पंदन  राज्यस्तरीय  समूह 02
काव्य स्पंदनी रविवारीय  स्पर्धा
काव्य प्रकार - षडाक्षरी 
विषय - क्षणभर थांब 

     *निवांत*
किती पळशील
 सदा जीवनात
क्षणभर थांब
जरा निवांतात      1

बघ उगवता
सूर्य  गगनात
निहाळ तयाच्या
प्रभा आनंदात       2

पहा झुळुझुळु
वाहे तो निर्झर
 निनाद ऐकण्या
थांब   क्षणभर      3

सांजवेळी बघ
नभातील पक्षी
किती मनोहर
दिसतेय नक्षी        4

येता रवी  नभी 
कळ्या अलवार
फुलूनी डौलती
 फुले  हळुवार       5

बघ ही किमया
पहा  खरोखर 
क्षणभर थांब
आहे मनोहर          6
 

वैशाली वर्तक
अहमदाबाद







विश्व शारदा सा म ( गुजरात)
ओळ काव्य लेखन उपक्रम
ओळ - घे  मना क्षणभर विश्रांती

      *क्षण निवांताचा*

*घे मना  क्षणभर*
विश्रांतीचा* वेळ
निर्भेळ आनंद
जुळवावा मेळ

किती पळशील
 सदा जीवनात
क्षणभर थांब
जरा निवांतात      

बघ उगवता
सूर्य  गगनात
निहाळ तयाच्या
प्रभा आनंदात       

पहा झुळुझुळु
वाहे तो निर्झर
 निनाद ऐकण्या
थांब   क्षणभर      

सांजवेळी बघ
नभातील पक्षी
किती मनोहर
दिसतेय नक्षी       

येता रवी  नभी 
कळ्या अलवार
फुलूनी डौलती
 फुले  हळुवार      

बघ ही किमया
पहा  खरोखर 
क्षणभर थांब
आहे मनोहर          


वैशाली वर्तक
अहमदाबाद






सदाफुली

प्रेमाची अक्षरे बालगीत
विषय - सदाफुली

नावच तुझे सदाफुली
आहेच तुला समर्पक
बारा ही महिने बहरून
करते तू नावाचे सार्थक

पाच पाकळ्या मोहक
 गुलबाक्षी, धवल, गुलाबी   रंगात
पाने पण मस्त गर्द  हिरवी
शोभते रोप वेगळ्या ढंगात

जरी न तुजला असता गंध
शोभा फुलांची  आगळी
कितीही फुलली फुले भवती
सदाफुली  सदाहरित वेगळी


सेवन करिता नियमित
पाने पण तुझी गुणकारी
दूर करी सहज मधुमेह 
अशी तुझी ख्याती न्यारी

शोभा वाढविण्या अंगणाची
 नितांत भासे तुझीच गरज
  कमी पाणी असता देखील 
 बहरते तू नेहमी सहज

वैशाली वर्तक

मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

यशाची महती

असे यशाची महती
 फार वाटते आगळी
 जेव्हा प्राप्त होते यश
 त्याची मजा जगा वेगळी

यश  मिळताच   मना
वाटे सारे प्रफुल्लित
यश दाखवी चमक
मन होते आनंदित

प्रयत्नांची पराकाष्ठा
सदा करावी लागते
 मिळे  तेव्हा  यश हाती
  यश महती सांगते


  यश देते मनी सुख
  करे प्रेरित मनास 
  होते श्रमाचे साफल्य
  लागे मना एक ध्यास

  किती मिळो यश जरी
  होऊ नये  अहंकारी
  विनयात शोभे यश
  तेची सदा सुखकारी 

वैशाली वर्तक












रविवार, ३ जानेवारी, २०२१

संकल्प नववर्षाचासंकल्प.\ नव वर्ष मनी हर्ष


सावली प्रकाशन  समुह 
विषय -- नववर्षाचा संकल्प
   
       *          *संकल्प*
    करु स्वागत  नव्या वर्षाचे
    हर्ष  उल्हासाच्या जल्लोषात
    उगवतीचा  भास्कर  देई रोज
    नव्या आशा अन् दिशा जीवनात 

    पर्यावरणाची घेऊ काळजी
    देऊया लक्ष वृक्षा रोपणी
   वसुंधरेची वाढवण्या शान
    करु नवे संकल्प  जीवनी
      
      जागवुया मानवता मनातूनी
      माणुसकी हाच धर्म खरा
      विसरुनी भेदभाव सारे
      संकल्पाने वाहेल झरा
      
       संकल्प नारी सन्मानाचा
       भृणहत्या नकोची कदा
       स्त्री  शिक्षणावर देऊ भार
       प्रगतीशील होवो देश सदा
     
वैशाली वर्तक
  
       



*नव वर्ष मनी. हर्ष*
अष्टाक्षरी

नव वर्ष मनी हर्ष 
आतुरता स्वागताची
चालू वर्ष संपताच
 दिसे उत्कंठा नव्याची


गोड कटु आठवणी
 संकलन त्यांचे मनी
सय सरल्या काळाची
 येती नजरेला क्षणी

झाल्या चुकां सुधारूनी
   नको त्यांची उजळणी 
 ध्यानी घेऊया नव्याने 
शाळा अनुभवी  मनी

देऊ निरोप वर्षाला
नव्या हर्ष ऊल्हासाने
नव वर्ष स्वागताला 
उत्साहाच्या अत्तराने


करु नवीन संकल्प 
वाहो उत्साहाचे वारे
आत्म निर्भर बनूया
 सुखी सदा राहू सारे



नको कटु आठवणी
होवो सुखे सुरुवात
 सुख येवो नव वर्षी
आनंदाची बरसात


करु स्वागत नव्याचे
मोद मिळो या वर्षात
सारे जन जगातील
राहो सदाची हर्षात






नको नवे संकल्प नको नव्या योजना
मनमुराद जग तू आता रे माझ्या मना

जीवन जगलास औताच्या बैला सारखा
कर्तव्यपूर्तीत झालास स्वच्छंदास पारखा

नको आशा अपेक्षा नको पोचपावती
घाल गवसणी जगातास मनाजोगती

करोनी शुभारंभ आजच्याच सुदिनी
नववर्षही जाईल आनंदूनी मनोमनी

✍️ उल्का मानकर
1.1.24/12.29

येता नवे वर्ष येती नवीन कल्पना 
काही विशेष करावी ह्याची संकल्पना

  जनांना बरे सुचतात  तर्क वितर्क  
आजवर मला आलाच नाही हा तर्क 

केले विचार ,मनी करण्या शुभारंभ 
 येईल  का पूर्णत्वास नव कार्यारंभ 

     आधीच मिळत नाही जीवास  उसंत 
न होता  पूर्ण संकल्पना  मनाला खंत 

   ठेवले अनंते तैसेची जगावे मस्त 
 नवं  वर्ष येणार पुढे जगा बिनधास्त


 नवे वर्ष येता , नवीन कल्पना 
 विशेष करूया, ह्याची संकल्पना

कोणाच्या मनात, गायन शिकावे
बरे सुचतात , जनांना वितर्क .
कोणाचे संकल्प, वाचन करणे
मला आजवर , सुचले न तर्क 



आधीच मिळेना, कधी तो निवांत
पूर्णत्वात कशी, मिळेल उसंत 
उगा विचारांचे , लागे सदा घोर
पूर्तता करण्या , मानसिक खंत 


 







वैशाली वर्तक 


!


  
 


अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...