प्रेमाची अक्षरे बालगीत
विषय - सदाफुली
नावच तुझे सदाफुली
आहेच तुला समर्पक
बारा ही महिने बहरून
करते तू नावाचे सार्थक
पाच पाकळ्या मोहक
गुलबाक्षी, धवल, गुलाबी रंगात
पाने पण मस्त गर्द हिरवी
शोभते रोप वेगळ्या ढंगात
जरी न तुजला असता गंध
शोभा फुलांची आगळी
कितीही फुलली फुले भवती
सदाफुली सदाहरित वेगळी
सेवन करिता नियमित
पाने पण तुझी गुणकारी
दूर करी सहज मधुमेह
अशी तुझी ख्याती न्यारी
शोभा वाढविण्या अंगणाची
नितांत भासे तुझीच गरज
कमी पाणी असता देखील
बहरते तू नेहमी सहज
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा