सोमवार, ११ जानेवारी, २०२१

ललित लेख चित्रावरुन

सुंदर  डोंगर माथा  पहा  कसा सर्वत्र सजला आहे  हिरवा गार....वर्षा धारा बरसता धरेवर   झालाय  धरेचा एकच रंग...  भेटता धरेला तिचा प्रियकर  पर्जन्य ... धरा अंकुरली....  .....रानफुले पण डौलूनी हसती सभोवताली . छोट्या रोपांना पण एक वेगळेच तेज तरारले .  हिरव्या पोपटी रंगात  रान माळ हिरवळले. डोंगर उता-यावर वृक्ष डौलात उभी. जणु तट रक्षणास  उभी असलेले सज्ज  सैनिकच
      नील नभी मेघ दाटून आले ...मेघातून आदित्य मधेच  डोकावून पहात आहे. त्याची किरणे रानामाळावर पडल्याने ती सोनसळी रुपात चमकत आहेत. भासत आहे .....जणु रवीच धरेचे फोटो घेतोय की काय ...असा मधूनच प्रकाशाचा झोत येत आहे.  
      खरच निसर्गाचीच ही सारी अद्भूत किमया आहे. वर नीळे 
मेघांनी दाटलेले अंबर....मधून गाणे गात हुंदडणारा वारा...व त्याच्या तालावर पानांची  सळसळ ..ती वेगळेच गीत गात आहेत वा जणू टाळ्या वाजवून साथ देत आहेत. 
खरच निसर्गा तूच खरा चित्रकार आहे . व 
हे पाहून सहज गाण्याच्या ओळी ओठी येतात
   निळे निळे अंबर वरती
  मेघांची स्वारी जाई तयातूनी
    दाही दिशा उजळल्या रवीने
      कोणी हास्य भरले या फुला फुलातूनी
        
वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...