मंगळवार, २८ जुलै, २०२०

दशपदी काव्य पुन्हा नव्याने

यारिया साहित्य  कला समुह
उपक्रम
दशपदी काव्य
विषय -- पुन्हा  नव्याने

 स्वदेशीचा लावुया नारा ,  देश होण्या आत्म निर्भर
 पुन्हा  नव्याने वाहु द्या झरे, स्वावलंबी होईल भराभर

मशाल देऊ तेजाळून ,देशाच्या प्रगतीला तारक
वाचवू मुलीला भृण हत्येचे, न करिता पातक

नसे कोप  निसर्गाचा ,पर्यावरण जतनाची मशाल
करुनी वृक्षा रोपण , वाढवूया निसर्गाची  ढाल

 विश्व शांतीची  मशाल, तेजाळू  द्या संस्कृती ची
नांदावी सुखशांती  जगात, अशाच  उदात्त  भावनेची

 विसरूनी जातीभेद ,समजून  घेऊ नव्याने समतेला
संतानी  पसायदानातून  , दिलेला मंत्र  देऊ  जगताला

वैशाली वर्तक

आशेचे किरण

मोहरली लेखणी
आजचा उपक्रम
विषय --- आशेचा किरण

सर्व  जग झाले दुःखी 
 आशेचे किरण शुन्य
काय करावे न सुचे
सा-या जनांचे मन सुन्न 

सारे व्यवहार ठप्प
रहा बंदिस्त  घरात
किती दिवस बसावे
भुक तर लागे पोटात

कशी मिळेल भाकर
कसा देऊ लेकरा घास
 दाखव आशेचा किरण
सुचव  देवा उपाय खास

जन झाले आत्म निर्भर
मिळविला आशेचा किरण
घेत काळजी  कटाक्षाने
 जीवनास दिले  नवे वळण

वैशाली वर्तक

भूमंडळ सजले हे अष्टाक्षरी

काव्य स्पंदन 02 
अष्टाक्षरी काव्य रचना 
विषय - भूमंडळ  सजले हे

  शीर्षक-   **ऋतू चक्र**


निसर्गाची पहा कृपा
तोची असे एकमात्र
कधी गर्मी कधी वर्षा
त्याची सत्ता दिन रात्र

रूक्ष धरा येता वर्षा
पहा कशी बहरली
ओली चिंब धरा झाली
तृणांकुरे अंकुरली

वृक्ष  लता वेली सा-या
दिसे हिरवे सर्वत्र 
शालू हिरवा धरेचा
रंग तिचा एकमात्र

रुप भूमंडळाचे ते
बदलले पहा कसे
दिन सुगीचे ते येता
रुप नवे शोभतसे

ऋतू मागुनी ऋतू ते  
बदलत जाती जसे
निसर्गाची ही किमया
भूमंडळी  शोभतसे


वैशाली वर्तक

भास मनाचा

यारिया साहित्य  कला
रोही पंचाक्षरी
स्पर्धेसाठी
*भास मनाचा**

 शीर्षक-  *भास*
काय करावे
मन गुंतावे
या भासाने ते
किती छळावे

दिसे स्वप्नात
वसे मनात
पहावे  तर
नसे सत्यात

सदा चिंतन
मनी मंथन
कसे शमेल
अस्थिर मन

वेड जीवाला
छळे मनाला
काय करावे
अशा वेडाला

सोड हा ध्यास
न उरे भास
उगा विचार 
नको मनास

उभे ठाकले
डोळा देखले
भास मनाचा
आता नुरले

वैशाली वर्तक

सोमवार, २७ जुलै, २०२०

मशाल

उनाड वारा  साहित्य  परिवार गुणांकन स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय - मशाल

इंग्रजांच्या  जाचाला त्रासून
घेतली मशाल स्वातंत्र्याची हाती
करुनी  देशभक्तांनी  बलिदान
स्वातंत्र्य  प्राप्तीसाठी  केली क्रांती
                                               
घेतली सावित्री  बाईंनी
स्त्री शिक्षणाची हाती मशाल
प्राप्त झाले आजच्या  नारीला
प्रगती करण्या  विश्व विशाल

प्रगती केली अंतरिक्षात   
चंद्रयान फिरले चंद्राच्या कक्षात
करुनी क्रांती  भारतीय शास्त्रज्ञांनी 
दिपविली मशाल सा-या विश्वात

तशीच मशाल देऊया तेजाळून
देश प्रगती ला होईल तारक
वाचवू मुलगी शिकवू मुलगी
भृण हत्येचे न करिता पातक

नसे कोप हा निसर्गाचा
पर्यावरण जतनाची मशाल
करुनी वृक्षा रोपण सदा
वाढवूया निसर्गाची  ढाल

मागणे पण विश्व शांतीचे
तेजाळणारी मशाल संस्कृती ची
नांदावी सुखशांती जगात
अशाच  उदात्त  भावनेची


UND 208

रविवार, २६ जुलै, २०२०

रक्तदान


षडाक्षरी काव्य लेखन
विषय -- रक्तदान

रक्तदान असे 
सर्वात  मोलाचे
वाचविते प्राण
रूग्णी माणसाचे

जाता मंदिरात 
सेवा ईश्वराची
या दानाने घडे
सदा समाजाची

देऊया प्राधान्य
रक्तदाना साठी
वाचता, तो रूग्ण
पुण्य कर्म गाठी


जेव्हा रक्तदाता
करितो नेमाने
प्रतिकार शक्ती
वाढते जोमाने

हृदय यकृत
निरोगी  ठेवते
 ते  रक्तदात्यांचे
चैतन्य वाढते

वय आरोग्याचे
असते बंधन
लक्षात घेऊन    
करती पालन


वैशाली वर्तक

हसे श्रावण

पंचाक्षरी
हसे श्रावण


हसे श्रावण 
मन भावन
नव सृष्टी चे
होते सृजन

आनंदी क्षण
बेधुंद जन
श्रावण मासी
सात्त्विक  मन

ऋतु हिरवा 
असे बरवा
श्रावण हसे
नित्य गोडवा

 सण येतात
भेटी होतात
हसे श्रावण
 दिसे  थाटात

वैशाली वर्तक


गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...