मोहरली लेखणी
आजचा उपक्रम
विषय --- आशेचा किरण
सर्व जग झाले दुःखी
आशेचे किरण शुन्य
काय करावे न सुचे
सा-या जनांचे मन सुन्न
सारे व्यवहार ठप्प
रहा बंदिस्त घरात
किती दिवस बसावे
भुक तर लागे पोटात
कशी मिळेल भाकर
कसा देऊ लेकरा घास
दाखव आशेचा किरण
सुचव देवा उपाय खास
जन झाले आत्म निर्भर
मिळविला आशेचा किरण
घेत काळजी कटाक्षाने
जीवनास दिले नवे वळण
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा