यारिया साहित्य कला समुह
उपक्रम
दशपदी काव्य
विषय -- पुन्हा नव्याने
स्वदेशीचा लावुया नारा , देश होण्या आत्म निर्भर
पुन्हा नव्याने वाहु द्या झरे, स्वावलंबी होईल भराभर
मशाल देऊ तेजाळून ,देशाच्या प्रगतीला तारक
वाचवू मुलीला भृण हत्येचे, न करिता पातक
नसे कोप निसर्गाचा ,पर्यावरण जतनाची मशाल
करुनी वृक्षा रोपण , वाढवूया निसर्गाची ढाल
विश्व शांतीची मशाल, तेजाळू द्या संस्कृती ची
नांदावी सुखशांती जगात, अशाच उदात्त भावनेची
विसरूनी जातीभेद ,समजून घेऊ नव्याने समतेला
संतानी पसायदानातून , दिलेला मंत्र देऊ जगताला
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा