मंगळवार, २८ जुलै, २०२०

भूमंडळ सजले हे अष्टाक्षरी

काव्य स्पंदन 02 
अष्टाक्षरी काव्य रचना 
विषय - भूमंडळ  सजले हे

  शीर्षक-   **ऋतू चक्र**


निसर्गाची पहा कृपा
तोची असे एकमात्र
कधी गर्मी कधी वर्षा
त्याची सत्ता दिन रात्र

रूक्ष धरा येता वर्षा
पहा कशी बहरली
ओली चिंब धरा झाली
तृणांकुरे अंकुरली

वृक्ष  लता वेली सा-या
दिसे हिरवे सर्वत्र 
शालू हिरवा धरेचा
रंग तिचा एकमात्र

रुप भूमंडळाचे ते
बदलले पहा कसे
दिन सुगीचे ते येता
रुप नवे शोभतसे

ऋतू मागुनी ऋतू ते  
बदलत जाती जसे
निसर्गाची ही किमया
भूमंडळी  शोभतसे


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...