यामिनीने वडा भाताचा प्रोग्राम नक्की केला. व-हाडी वा आम्हा नागपूरकरांचा वडा भात फार आवडीचा .अगदी चवीने खातोत.आपण एक दिवस माझ्या कडे वडा भाताचा प्रोग्राम करु या ना .! सर्व सख्या एक सुरात म्हणाल्या होss करु की . सर्व जणी संसारातून थोड्या फार मोकळ्या झालेल्या आणि महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांच्या wave lines जुळलेल्या, त्यामुळे कुठलाही प्रोग्राम यशस्वी होतोच . ठरल्या दिवशी सा-या जणी यामिनी कडे जमल्या .तिने भात करुन ठेवला होता. मग सख्यांनी वडे तळण्यास मदत केली .यामिनीने हिंग पाणी तयार करून ठेवले होते. भात व वडे पानात कुस्करुन त्यावर फोडणीचे गरम तेल , मीठ , चटणी , व महत्त्वाचे हिंग पाणी जे तयार केले होते .ते टाकले जेणे करून वडे बाधू नयेत . सर्वांनी आवडीने वडा भात व आजू बाजूचे पण पदार्थ खाल्ले .माझ्या मनात वडा भात खाता खाता भात व त्याचे विविध प्रकार बद्दल सहज विचार चक्र फिरू लागले खरच भारतीयांचे मुख्य धान्य गहू व भात .त्यातून भाताचे अगदी बालपणी पासूनचे म्हणजे अगदी infant अवस्थे पासून चे वा बाल्यावस्थेपासून चे नाते असते. अगदी सुरुवातीस भाताची पेज , भाताचे पाणी वा काही जण कांजीं म्हणतात . ती पण या भाताचीच असते, पुढे आपल्यात तर उष्टावण करतांना याच भाताला पहिला मान मिळतो..पुढे मऊ भात तूप वरण मीठ घालून आजी अथवा आईने कालविलेला भात खाऊन मुले गुटगुटीत होतात. त्या गुटगुटीत शब्दावरून आठविले .तो म्हणजे गुरगुट्या भात. गुरगुट्या भाताची चवच न्यारी असते. त्या भातावर साईचे दही , थोडे तूप मीठ टाकून खाणे म्हणजे आहाहा पंचपक्वान्ने त्या समोर फिकी वाटतात. त्यातून पावसाळ्यात रिमझीम ,वा झिरमीर पाऊस पडत असता गरम गुरगुट्या भात व त्यात मेतकूट लिंबू मीठ म्हणजे तर अप्रतिम तसेच पचनास पण हलका . साऊथ कडे गेलो की भात तर त्यांचे मुख्य अन्न .रसम् सापड्म , लेमन भात , टाॕमेटो भात , किती तरी प्रकार आढळतात. ऐवढेच काय कालचा राहिलेला भात दुस-या दिवशी जीरे , हींग , कढीपत्ता ,उडीद डाळ व त्यात कांदा टाॕमेटो टाकून फोडणीचा भात तर सकाळी न्याहरीची मजा वाढवितो. नारळी पौर्णिमेचा नारळी भात , तसेच केशर भात , पाईनेपल भात , वगैरे गोड भाताचे प्रकार पण आवडीचे असतात . पंक्तीत तर मसाले भात बरोबर बाजूला केसर भाताची मुद जेवणाची लज्जत वाढवित असते. तसेच चित्रांन (भाताचाच प्रकार ) चण्याची डाळ भिजवून , शेंगदाणे टाकून केलेला चित्रांन भात फार रुजकर लागतो. कर्नाटकातील बुत्ती भात प्रसिध्द आहेच .कित्येक ठिकाणी कर्नाटकात रेल्वे स्टेशनवर पण केळ्याच्या पूडीत बांधून मिळतो. प्रवासा जातांना मऊ भातात भरपूरदूध घालून उगीच विरजणा पुरते दही घालून तूप जी-याची हींग उडीद डाळ लाल सुकी वा सांडगी मिरची फोडणीस टाकून कालविलेला भात फारच रुचकर तर लागतोच पण प्रवासातील अबर जबर येत असालेले खाल्ला वर हा भात पोटाला व मनाला थंडक पोहाचवतो. उत्तर प्रदेशात लांब सडक सुगंधी बासमती भाताचा पुलाव सर्व देशभर प्रसिध्द आहेच. त्याचे पण किती तरी प्रकार आहेत .तसेच ओले वाटाणे भात , बिरयाणी जीरा भात हे सारे भाताचे प्रकार प्रचलित आहेतच. सध्या जसे पहेरवेशात बदल होत चालला आहे तसेच खाद्य पदार्थाचे पण अनुकरण होत आहे .चाईनीज फूड जसे लोक प्रिय होत गेले .तसे शेजवान राईस पण फार प्रचलित झाला आहे. लाल चुटूक शेजवान राईस मंचुरियन बरोबर मुले आवडीने खातात.त्यांना घरचे पदार्थ तिखट लागतात. ते चालत नाही. पण तो तिखट शेजवान भात आवडीने खातात. तर असे आजून पण अनेक भाताचे प्रकार माझ्या मनात डोकावून गेलेत. व अजूनही प्रकार आहेत .तेव्हा थोडक्यात काय खाणा-यांना काय बहाणा पाहिजे. तेव्हा वडा भात खायला घालणा-या यामिनीचे व नागपूरच्या वडा भाताचे शतदा आभार की ज्याने येवढी विचार मालिका दिली. Sent from Yahoo Mail on Android
शुक्रवार, २१ जून, २०१९
सोमवार, १७ जून, २०१९
राधा कृष्ण प्रेम ( पंचाक्षरी)
रोही पंचाक्षरी
राधा कृष्ण प्रेम
असे निराळे
जगा आगळे
राधा कृष्णाचे
प्रेम वेगळे
राधा गौळण
करी मंथन
कृष्ण कृष्णची
बोले कंकण
वेणु वाजवी
गीत लाघवी
कृष्ण मुरारी
जीवा मोहवी
हरपे ध्यान
राधेचे भान
ऐकून पावा
तृप्त ची कान
काढितो खोडी
घागर फोडी
खट्याळ भारी
लावितो गोडी
कोसी गोपिका
कष्टी राधिका
सोड आक्रूरा
बोले प्रेमिका
भक्ती प्रतिक
असे सात्त्विक
प्रेम तयांचे
सदा आत्मिक
हरीचे रूप
हे आत्मरूप
अव्दैताचे ते
उजळे दीप.
वैशाली वर्तक
राधा कृष्ण प्रेम
असे निराळे
जगा आगळे
राधा कृष्णाचे
प्रेम वेगळे
राधा गौळण
करी मंथन
कृष्ण कृष्णची
बोले कंकण
वेणु वाजवी
गीत लाघवी
कृष्ण मुरारी
जीवा मोहवी
हरपे ध्यान
राधेचे भान
ऐकून पावा
तृप्त ची कान
काढितो खोडी
घागर फोडी
खट्याळ भारी
लावितो गोडी
कोसी गोपिका
कष्टी राधिका
सोड आक्रूरा
बोले प्रेमिका
भक्ती प्रतिक
असे सात्त्विक
प्रेम तयांचे
सदा आत्मिक
हरीचे रूप
हे आत्मरूप
अव्दैताचे ते
उजळे दीप.
वैशाली वर्तक
शनिवार, १५ जून, २०१९
रोही पंचाक्षरी भक्ती रचना (विठ्ठल) 15/6/2019
रोही पंचाक्षरी
भक्ती रचना स्पर्धा
विषय -- विठ्ठल
विठूच्या गळा
तुळसी माळा
भक्ती भावाचा
मनी उमाळा
तुळसी माळा
भक्ती भावाचा
मनी उमाळा
विठ्ठल वारी
जगात न्यारी
तियेची ख्याति
जीवन तारी
जगात न्यारी
तियेची ख्याति
जीवन तारी
गोजीरे रूप
लाविता दीप
लोचनी दिसे
ते आत्मरुप
लाविता दीप
लोचनी दिसे
ते आत्मरुप
भिमेच्या तीरी
तुझ्याच दारी
आस कृपेची
सदाच भारी
तुझ्याच दारी
आस कृपेची
सदाच भारी
विठूचे ध्यान
हरपे भान
पाहता रुप
मन बेभान
हरपे भान
पाहता रुप
मन बेभान
विठ्ठल माया
कृपेची छाया
राहो मस्तक
तुझेची पाया
कृपेची छाया
राहो मस्तक
तुझेची पाया
वैशाली वर्तक.
रविवार, ९ जून, २०१९
जीवन एक संघर्ष
विषय--- जीवन एक संघर्ष
कोणास वाटे जीवन तर,
असे तीन अंकांचा खेळ .
कसे जगावे त्यात आनंदाने
तयाचा जमवावा लागे मेळ.
येई कधी दुःखाला भरती,
तर कधी आनंदाची लाट.
नसे निरंतर सदा तिमीरच,
तिमीरा नंतर प्रकाश वाट.
निसर्ग पण सहतो संघर्ष
चंद्र सूर्यास पण लागते ग्रहण
सरिता आक्रमिते विकट वाट
अवनी करे सतत भ्रमण.
यश मिळविण्या कष्ट अपार
जन्माला येताच ,सुरु संघर्ष
स्वप्न पूर्ती , करण्या साकार
महेनतच करी जीवनी उत्कर्ष
दगडला पण, मिळवण्या देवत्व
सहतो , टाकीच्या घावांचा संघर्ष
जीवन तर , आहेच संग्राम
ध्यानी ठेवा हाच एक, निष्कर्ष .
पहा आपले पंतप्रधानजी
लढले झेलीत अनेक संघर्ष
प्रेरणा देती सर्व जगाला
कसे जगावे, निष्काम सहर्ष.
वैशाली वर्तक ( अहमदाबाद )
कोणास वाटे जीवन तर,
असे तीन अंकांचा खेळ .
कसे जगावे त्यात आनंदाने
तयाचा जमवावा लागे मेळ.
येई कधी दुःखाला भरती,
तर कधी आनंदाची लाट.
नसे निरंतर सदा तिमीरच,
तिमीरा नंतर प्रकाश वाट.
निसर्ग पण सहतो संघर्ष
चंद्र सूर्यास पण लागते ग्रहण
सरिता आक्रमिते विकट वाट
अवनी करे सतत भ्रमण.
यश मिळविण्या कष्ट अपार
जन्माला येताच ,सुरु संघर्ष
स्वप्न पूर्ती , करण्या साकार
महेनतच करी जीवनी उत्कर्ष
दगडला पण, मिळवण्या देवत्व
सहतो , टाकीच्या घावांचा संघर्ष
जीवन तर , आहेच संग्राम
ध्यानी ठेवा हाच एक, निष्कर्ष .
पहा आपले पंतप्रधानजी
लढले झेलीत अनेक संघर्ष
प्रेरणा देती सर्व जगाला
कसे जगावे, निष्काम सहर्ष.
वैशाली वर्तक ( अहमदाबाद )
पहिला पाऊस
पाऊस पहिला
काळ्या ढगांनी भरलेअंबर
उडे पाचोळा दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
गडगडती मेघ अंबरात
काळ्या ढगांनी भरलेअंबर
उडे पाचोळा दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
गडगडती मेघ अंबरात
नाचती हर्षे मुले अंगणी
टप टप धारा बरसता अवनी
मोर दावी नृत्य मनोहर
झेलती पक्षी थेंब, पंख पसरुनी
टप टप धारा बरसता अवनी
मोर दावी नृत्य मनोहर
झेलती पक्षी थेंब, पंख पसरुनी
पडता धारा अवनी भिजली
तृप्त झाली पाणी पिऊनी
टप टप पागोळ्या पडती दारी
गंध मातीचा दरवळे दिशातूनी
तृप्त झाली पाणी पिऊनी
टप टप पागोळ्या पडती दारी
गंध मातीचा दरवळे दिशातूनी
जो तो जाई क्षणात भारावूनी
पहिल्या पावसाची मजाच वेगळी
वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी
कांदे भज्यांची चवच आगळी.
पहिल्या पावसाची मजाच वेगळी
वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी
कांदे भज्यांची चवच आगळी.
पाऊस पहिला राहे स्मरणात
जून्या आठवणींना आणतो पूर
घडले असूनी जरी गतकाळात
आठवांनी भरुन येतो ऊर
जून्या आठवणींना आणतो पूर
घडले असूनी जरी गतकाळात
आठवांनी भरुन येतो ऊर
वैशाली वर्तक
अष्टपैलू काव्यमंच (महिला)
अष्टपैलू काव्यमंच कला अकादमी आयोजित
उपक्रम 78
विषय - पहिला पाऊस
मजाच आगळी
काळ्या ढगांनी भरलेअंबर
उडे पाचोळा दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
गडगडती मेघ अंबरात
जो तो जाई क्षणात भारावूनी
पहिल्या पावसाची मजाच वेगळी
वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी
कांदे भज्यांची चवच आगळी
सौ वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद
सिद्ध साहित्यिक समूह
उपक्रम ४५२
- काव्य लेखन अष्टाक्षरी
विषय - आषाढ सरी
वर्षा ऋतू
मृग सरी बरसता
झाली धरा अंकुरित
तृणपाती चमकती
धरा दिसते हरित
पसरली हिरवळ
रंग धरेचा हिरवा
भासे पसरला पाचु
ऋतू म्हणती बरवा
तृप्त झाली वसुंधरा
मेघ गर्दी नभांगणी
सरी आषाढाच्या येता
पाणी पाणीच अंगणी
वाजवित ढोल ताशे
मेघ राजा बरसला
नृत्य दावी सौदामिनी
मोर आनंदे नाचला
पाणी साचे जागोजागी
नदी वाहते बेफाम
वृक्षलता चिंब झाल्या
नसे सरींना आराम
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
विषय - पाऊस
- *वर्षा धारा*
तप्त झाली वसुंधरा
मेघ गर्दी नभांगणी
आला सोसाट्याचा वारा
पाणी बरसे अंगणी
वाजवित ढोल ताशे
मेघ राजा बरसला
नृत्य दावी सौदामिनी
मोर आनंदे नाचला
चिंब झाली वसुंधरा
आल्या पावसाच्या धारा
ओल्या झाल्या वृक्षवेली
गाणी गात फिरे वारा
मुले नाचती आनंदे
गात गाणी पावसाची
टपटप झेली धारा
माळ दारी पागोळ्याची
पावसाची सर येता
मृदगंध पसरला
तृप्त जाहली अवनी
मोद भरूनी उरला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शुक्रवार, ७ जून, २०१९
लग्न विवाह बंधन
सहजीवनाचे रम्य चित्र
पाहिले मी स्वप्नातूनी
अन् माझे न मी राहिले
तुला पाहता त्या क्षणी
पाहिले मी स्वप्नातूनी
अन् माझे न मी राहिले
तुला पाहता त्या क्षणी
शुभ घडी मुहुर्तावर
साजरा करुनी लग्न सोहळा
झाले मिलन दोन जीवांचे
जमवूनी सारा गोतावळा
साजरा करुनी लग्न सोहळा
झाले मिलन दोन जीवांचे
जमवूनी सारा गोतावळा
अग्नी ब्राह्यणाच्या साक्षीने
घातले मंगळसुत्राचे बंधन
केले माझे तुझ्यात समर्पण
आनंद घेण्या सहजीवन
घातले मंगळसुत्राचे बंधन
केले माझे तुझ्यात समर्पण
आनंद घेण्या सहजीवन
अनुसरता सप्तपदी पावले
फूलले रे क्षण माझे जीवनी
फुले वसंत संसार वेलीवरी
आनंदे मी रंगले क्षणोक्षणी
फूलले रे क्षण माझे जीवनी
फुले वसंत संसार वेलीवरी
आनंदे मी रंगले क्षणोक्षणी
वैशाली वर्तक
मानवाचे पावसास पत्र
विषयः--मानवाचे पावसास पत्र
श्रीमान वरुणराजे
सविनय नमस्कार विनंती विशेष.
मी समस्त मानव जातीच्या वतीने तुजला विनंती विषयक पत्र लिहीत आहे. कारण पण , तितकेच महत्त्वाचे आहे. आजच जून महिन्यातची सुरुवात झाली.
सुर्याचा मृग नक्षत्रात याच महिन्यात प्रवेश होतो. चातक पक्षी त्या मृग नक्षत्रावर पडणा-या पावसाच्या पाण्याची आतुरतेने वाट पहात असतो. तसेच आम्ही पण तितक्याच आतुरतेने तुझ्या आगमनाची वाट पहात आहोत . तरी वेळेवर अवनीवर येण्याची कृपा दृष्टी ठेवावी..
सूर्याने ग्रीष्म ऋतुत भयंकर दाहक किरणांनी , सर्व वातावरण तप्त केले आहे. मानवाच्या अंगाची लाही लाही होत आहे. घामाच्या धारा वहात आहेत. अती गर्मीने नकोसे झाले आहे. धरणी मातेचा कण कण तप्त झाला आहे. तिची काया नुसती रूक्ष नव्हे तर, तिच्यातील जल तत्व कमी कमी होत आहे. त्यामुळे धरेला तडे पडले आहेत. तिची तडे पडलेली काया ....भेगाळलेली काया, जणू काही तहानलेल्या बाळासम तोंड उघडे ठेवून तुझ्या पावसाच्या थेंबाची वाट पहात आहे. तिची अशी दयाजनक स्थिती की , कित्येक ठिकाणी तिच्यात पाण्याचा अंश पण राहिलेला नाही . लवलेश उरला नाही. अशी स्थिती झाली आहे..शिवारे नुसती उघडी माळराने झाली आहेत. ती पण तुझ्या बरसण्याची ..चिंब पाण्यात भिजण्याची वाट पहात आहेत.
कृषीवल आकाशाकडे डोळे लावून तूझी आतुरतेने..तुझ्या पर्जन्य धारेची वाट पहात आहेत. मानवाला पंचतत्वाची गरज आहे. त्यातील एक तत्व.. म्हणजे जल . ते तू आहेस . म्हणून तर तुला जीवन असे पण म्हणतात....संबोधतात. आणि दुखःद स्थिती ही की , तुझीच कमतरता भासत आहे.
अरे पावसा , पर्जन्या तुजवरच सारी सृष्टी अवलंबून आहे .जल चर सृष्टी तुझ्यानेच तर जीवीत आहे. पशु , प्राणी यांना नदी नाले ओढे सुकल्याने जंगलातून
बाहेर धाव जलाशया कडे घ्यावी लागत आहे. गुरांना तुझ्या दुर्लभतेने पुरेसे गवत चारा .वनस्पती मिळत नाही .व मृत्यु मुखी पडण्याची वेळ येत आहे. पक्षांना पण
पाण्यासाठी जलाशय शोधावी लागत आहेत. तरी , आम्ही मानव घरोघरी पाण्याची भांडी ठेवून त्यांची सोय करतच आहोत. तरी तुझ्या सेवेची तुझ्या येण्याची अत्यंत गरज आहे.
आम्हा मानवांची तर काय कथा सांगू ? आरे , कित्येक गावात तर नद्या विहीरी आटल्या सुकल्या .पिण्याचे पाणी पण, मिळत नाही आहे. बायका मुली
उन्हाच्या कळशा , घागरी घेऊन ,कोसो अंतर चालत जाऊन ... पाण्यासाठी वण वण फिरत आहेत. कित्येक ठिकाणी 1200/1400 फूट खणून पण पाणी मिळत हाती लागत नाही आहे.. कित्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टेंकर 2/3 दिवसांनी पाणी पुरवून पुरवून देत आहे.
तुझी किंमत मानवास कळली आहे. जेथे पाणी अगदी कमी मिळते त्या लोकांच्या
डोळ्यात पाणी येत आहे. अन्न , वस्त्र , निवारा जरी मूलभूत गरजा , तरी तुझ्या शिवाय जीवन अशक्य ना रे !. तरी पुन्हा पुन्हा विनतेय. ...तू वेळेवर लवकर ये.
नुसते आकाशी काळे ढग एकत्र करून , आम्हाला बरसण्याची आस दाखवून
वरून अवनीची मजा पहात बसू नकोस .त्या मेघांना बरसण्यास सांग.
कृषीवल पहा ..त्याची शिवारे नांगरून , उन्हात काबाड कष्ट करुन , घाम गाळून , जमीन कसून तयार करतोय. पीका साठी बाजारातून बी बियाणे कर्जाने घेउन शेतीची तयारी करत आहे. शिवारात बी टाकेल, पण तू जर वेळेवर बरसला तर ....त्याची ही सारी महेनत ,पैसा उपजेल. तरी तू वेळेवर ये .जेणे करुन बिया अंकुरतील .व पोशिंद्याची महेनत फळेल.
आम्ही मानवाने काय करावे .तूच सांग आता .आम्हाला वैज्ञानिक प्रगती मागे धावण्यात तसेच .....अती लोभाने आम्ही केलेल्या चुका आता उमजल्या आहेत. ...वनांचा रानांचा -हास करुन आम्ही सिमेंटची जंगले तयार केलीत .
पावसाचे पाणी जमिनीत न मुरु देता सिमेंट चे रस्ते केले .वृक्ष कापल्याने वृक्षांची मुळे जमिनीतून पाणी शोषून... .पानातून पुन्हा बाष्प रुपाने तुला मदत रुप होतात .त्या क्रियेत झाडे कापल्याने आम्ही मानवांनीच तुझ्या बाष्प साठवण्याच्या क्रियेत व्यत्यय आणला. पण आता चूक उमजली आहे. तशी पावले पण आम्ही मानव उचलत आहोत .प्रवासात जातांना चिकू ,आंबा ,पपई तसेच इतर बिया घेउन त्या रस्त्यात टाकण्याची मोहिम पण सुरु केली आहे .जेणे करुन वृक्षाची लागवण होईल. वृक्ष वाढ होईल .व पुन्हा ही वसुंधरा हिरवी होईल.
तरी यावर्षी वेळेवर ये. तुझी आम्ही सारे मानव आतुरतेने वाट पहात आहोत.
पुन्हा सर्वत्र जलाशय पाण्याने भर. व सध्या जी बिकट परिस्थिती झाली आहे ती दूर कर नाहीतर काही वर्षा नंतर पाण्यावरुन युध्द होईल. .
तरी मानवाच्या ह्या विनंतीस मान देऊन योग प्रमाणात बरस. लहान मुले पण होड्या करुन .तुझ्या पावासाच्या पाण्यात खेळण्याची वाट पहात आहेत. टपरी वाले गरम चहा व कांदे भजीच्या गाड्या सरसावून तयार आहेत. फक्त खोळंबा आहे तो तुझा.
तुझ्यावर अवलंबित
मानव जात.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
अलिप्तता व दुर्लक्षता
अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत. .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही तो लहानाचा मोठा होतो. ...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...



